Maanbindu Music Shopee | Great way to EARN from Marathi Blog & Website
मानबिंदूच्या
'उत्पन्न मिळवा', या विभागात तुमचं स्वागत! नवीन मराठी संगीताचा इंटरनेटवर प्रभावीपणे प्रसार व्हावा यासाठी मानबिंदूतर्फे
आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो
आहोत आणि त्यासाठी आम्ही
वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले आहेत. खाली दिलेल्या या उपक्रमात तुम्हीही
सहभागी होऊ शकता आणि
नवीन मराठी संगीताच्या ऑनलाईन विक्रीतून
उत्पन्न मिळवू शकता!
मराठी संगीताच्या प्रसारासाठी मानबिंदूने तयार केलेले फेसबुकवरचे मराठी
संगीत ऍप्लीकेशन हे पहिले पाऊल होते
[अधिक माहिती इथे].
आता
मानबिंदू
म्युझिक शॉपी
द्वारे इंटरनेटवर सर्वत्र मराठी संगीताचा सर्वत्र प्रसार करण्यास आम्ही
सज्ज झालो आहोत आणि आम्हाला गरज आहे ती तुमच्या मदतीची!
मराठीतल्या सर्व संकेतस्थळावर आणि ब्लॉग्सवर नवीन मराठी संगीत उपलब्ध झाल्यास
नवीन मराठी संगीताचा प्रभावीपणे प्रसार होईल असं आम्हाला जाणवलं. मराठी संगीताच्या
ऑनलाईन विक्रीतून संकेतस्थळ/ब्लॉग्स चालविणा-या काही उत्पन्न निर्मीतीचा नवा
स्त्रोत मिळू शकेल का याचाही विचार आम्ही केला
आणि आम्हाला सांगण्यास आनंद होतो की या सगळ्या
गोष्टी आम्ही
मानबिंदू
म्युझिक शॉपीच्या
रुपाने आता सगळ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
मानबिंदू म्युझिक शॉपीची वैशिष्ट्ये
याप्रमाणे..
मानबिंदू म्युझिक शॉपी तुमच्या ब्लॉग आणि वेबसाईटवर अगदी काही क्षणातच सुरू
करता येते आणि यासाठी कुठल्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.
मानबिंदू म्युझिक शॉपी तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर
सुरू करण्यासाठी तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळाचं नाव मानबिंदूवर रजिस्टर करायचं आणि आम्ही
दिलेल्या ४-५ ओळी तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर
जशाच्या तशा कॉपी-पेस्ट करायच्या..
हो! फक्त इतकच
करणं आवश्यक आहे!
मानबिंदू म्युझिक शॉपी मध्ये नवीन अल्बम्समधील
दोन गाणी एका कडव्यापर्यंत ऐकण्याची, त्यांचे
रिंगटोन्स डाऊनलोड करण्याची,त्यांचे युट्यूब वरील व्हिडीयोस पहाण्याची,
त्यांच्या गायक/गीतकार/संगीतकारांबद्दल माहिती मिळवण्याची, फेसबुक/ट्वीटर वर शेअर
करण्याची आणि
आवडलेले सगळे अल्बम्स ऑनलाईन खरेदी करण्याची सुविधा आहे.
'नवीन मराठी संगीत' किंवा नवीन मराठी गाणी नावाच्या एका
खास स्वतंत्र विभागातसुद्धा
मानबिंदू म्युझिक
शॉपी तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर
सुरू करता येईल. जेणेकरून तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळाला भेट देणा-या व्यक्तींना
अधिक चांगल्याप्रकारे संगीताचा आनंद घेता येईल. यासाठी 500
पिक्सेल्स आणि 700 पिक्सेल्स अशा रुंदीला जास्त असणा-या
आकारामध्ये
मानबिंदू म्युझिक
शॉपी
उपलब्ध आहे!
मानबिंदू म्युझिक शॉपी तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळाच्या रंगसंगतीशी सुसंगत
होण्यासाठी ५ विविध रंगात उपलब्ध आहे, निळा, हिरवा, केशरी, गुलाबी आणि कुठल्याही
रंगसंगतीला सुसंगत होण्यासाठी
पारदर्शी!
मानबिंदूतर्फे
यानंतर इंटरनेटवर प्रकाशित केलं जाणारं नवीन मराठी संगीत
आपोआप मानबिंदू म्युझिक शॉपी मध्ये अपडेट केले जाईल.
एकदा शॉपी सुरू केल्यानंतर तुम्हाला
काहीही करण्याची तसदी घ्यावी लागणार नाही.
मानबिंदू म्युझिक शॉपी Asynochronus पणे लोड होत असल्याने तुमच्या पानाच्या लोडींग मध्ये व्यत्यय
येणार नाही.
सर्वात महत्वाचं म्हणजे
मानबिंदू म्युझिक शॉपी मधून तुम्हाला उत्पन्न मिळवण्याची
देखील सोय आहे!
तुमच्या या सेवेसाठी तुमच्या पेजवरून होणा-या संगीताच्या विक्रीचा
१०% भाग तुम्हाला
मानधन म्हणून मिळणार आहे आणि या योजनेच्या पहिल्या ५०० सभासदांना रु. ५० ते
रु.२०० इतका जॉईनींग बोनस देखील मिळणार आहे!* ..आहे ना आनंदाची गोष्ट! :-)
या उपक्रमामध्ये सहभागी होऊन तुम्ही मराठी
संगीताच्या प्रसाराला हातभार लावू शकता आणि सोबत उत्पन्नही मिळवू शकता
[अटी आणि शर्ती]. यासाठी
तुम्हाला फ़क्त दोन गोष्टी करणं आवश्यक आहे.
मानबिंदू म्युझिक शॉपी तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर सुरू करा.
संकेतस्थळासाठी:
मानबिंदू म्युझिक शॉपी | Get Code
या विभागाला भेट द्या आणि तुमच्या आवडत्या आकाराच्या/रंगाची
मानबिंदू
म्युझिक शॉपी
निवडून Preview and Get Code या बटनावर क्लिक करा.
त्याखाली तयार झालेल्या
मानबिंदू
म्युझिक शॉपीचा कोड
घेऊन योग्य फाईल्समध्ये योग्य जागी पेस्ट करा आणि ती फाईल सर्व्हर वर अपलोड करा!
ब्लॉगसाठी*:
मानबिंदू म्युझिक शॉपी | Get Code
या विभागाला भेट द्या आणि तुमच्या आवडत्या आकाराच्या/रंगाची
मानबिंदू
म्युझिक शॉपी
निवडून Preview and Get Code या बटनावर क्लिक करा.
त्याखाली असलेल्या
या बटनावर क्लिक करा.आणि
ब्लॉगर वर लॉगिन करून
तुमच्या मानबिंदू
म्युझिक शॉपी
तुमच्या ब्लॉगवर
काही क्षणातच सुरू करा
*टीप : सध्या wordpress.com च्या
wordpress वर होस्ट केलेल्या (free) ब्लॉग्सवर एक्स्टर्नल जावास्क्रिप्ट
समाविष्ट करण्याची सुविधा नसल्याने wordpress वरील ब्लॉग्सवर
मानबिंदू म्युझिक
शॉपी सध्यातरी सुरु करता येणार नाही. यासाठी नवीन पर्याय भविष्यात येण्याची शक्यता आहे.
तरीही एकदा यासाठी
गुगलमध्ये
असे सर्च करून पहावे
.
पण wordpress च्या स्वतंत्रपणे होस्ट केलेल्या ब्लॉग्सवर
Javascript सुरू करण्यासाठीचे काही प्लगिन्स उपलब्ध आहेत.ते इंस्टॉल केल्यास मानबिंदू म्युझिक
शॉपी
सुरू करता येऊ शकेल. यासाठी वरील प्रकारे सर्च केल्यास
त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते
एका पानावर 'एका
आकाराची एकच शॉपी' सुरू करता येईल
चांगल्या परिणामांसाठी मोठ्या आकाराची (प्राधान्यक्रमे
768x300, 250x600,200x600,336x280,) मानबिंदू म्युझिक शॉपी
सुरू करा
उभ्या आकाराची मानबिंदू म्युझिक शॉप(
250x600, 200X600) तुमच्या
वेबपेजच्या वरील भागात आणि सहसा उजव्या बाजूस असावी.
उदाहरणादाखल
मानबिंदूच्या ब्लॉगवर सुरू केलेली ही म्युझिक
शॉपी
पहा.
मानबिंदू म्युझिक शॉपी - Code Generator
रंग निवडा :
आकार निवडा:
तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर जाहीरातीसाठी असलेल्या जागेसाठी
200 X 600
250 X 600
768 X 325
336 X 280
300 X 250
250 X 250
200 X 200
तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर एका स्वतंत्र
विभागासाठी
450px
700px
ही म्युझिक शॉपी सुरू करण्यासाठी या सूचनांचे पालन करा
ब्लॉगसाठी: खाली असलेल्या बटनावर
क्लिक करा आणि ब्लॉगर अकांउट मध्ये लॉगिन करून ब्लॉगवर Widget च्या रुपाने शॉपी सुरू करा.
(वरील प्रक्रीयेत काही अडथळा आल्यास कृपया
खाली दिलेला कोड कॉपी करावा आणि या सूचनांचे पालन करावे )संकेतस्थळासाठी:: : खाली
दिलेला कोड जसाच्या तसा संकेतस्थळावर कॉपी-पेस्ट करा. NOTE : Do not alter the code in ANY way to be eligible for earning!
लॉगिन झाल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर तुमच्या एक किंवा अनेक
ब्लॉग्सची लिस्ट असेल. तुम्हाला ज्या ब्लॉगवर
मानबिंदू म्युझिक शॉपी सुरु करायची असेल त्या ब्लॉगशी संबंधीत
असलेल्या
Designया लिंकवर क्लिक करा.
यानंतर उघडलेल्या पानावर तुमच्या ब्लॉगचा Layout दिसेल.
त्यात अनेक ठिकाणी
Add a Gadget
ही लिंक असेल. या सर्व जागांवर मानबिंदू म्युझिक शॉपी सुरू
करता येईल. या लिंकवर क्लिक करा
यांनतर उघडणा-या पानावर वेगवेगळ्या प्रकारच्या गॅजेट्सची लिस्ट असेल.
त्यातून
HTML/JAVASCRIPT
हा प्रकार निवडा.
यानंतर उघडण्या-या पानावर तुमच्या आवडीच्या रंगाच्या आणि साईझच्या मानबिंदू म्युझिक शॉपीचा कोड पेस्ट करा आणि सेव्ह करा!
मानबिंदू म्युझिक शॉपी या
उपक्रमामध्ये सहभागी होणा-या व्यक्तीस खालील अटींशी संलग्न रहाणे बंधनकारक
राहील
ब्लॉगसाठी :- तुम्ही ब्लॉगर
खात्यामध्ये लॉगिन करण्यासाठी वापरत असलेला ई-मेल आयडी आणि मानबिंदूवर खाते
तयार करण्यासाठी वापरलेला ई-मेल आयडी एकच असावा, जेणेकरून तुम्हीच त्या
ब्लॉगचे मालक आहात हे
गरज पडल्यास भविष्यात पडताळता येऊ शकेल.
संकेतस्थळासाठी :- तुम्ही Domain Name
रजिस्टर करताना वापरलेला ई-मेल आयडी आणि मानबिंदूवर खाते तयार करण्यासाठी
वापरलेला ई-मेल आयडी एकच असावा, जेणेकरून तुम्हीच त्या संकेतस्थळाचे मालक
आहात हे गरज पडल्यास भविष्यात पडताळता येऊ शकेल.
मानबिंदू म्युझिक शॉपी सुरू करण्यासाठी
मानबिंदूने दिलेल्या कोडमध्ये कुठलाही बदल केल्यास
तुम्हाला या योजनेत सहभागी होण्यास अपात्र ठरवले जाईल.
मानबिंदू म्युझिक शॉपी
मध्ये असलेल्या खरेदी करा या लिंकवर क्लिक केल्यावर ऑनलाईन पेमेंट पूर्ण
करण्यासाठी ग्राहकाला मानबिंदूवर आणले जाईल. Reffering Site या
शीर्षकाअंतर्गत तुमच्या ब्लॉग/संकेस्थळाचे नाव या पानावर आढळेल आणि ते
आमच्या डेटाबेसमध्ये साठवले जाईल. अशा प्रकारे तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून
खरेदी गेलेल्या प्रत्येक
व्यवहाराची नोंद मानबिंदूवर केली जाईल
आणि प्रत्येक विकलेल्या गेलेल्या
संगीतासाठी तुम्हाला त्या संगीताच्या
किमतीच्या १०% इतके मानधन मिळेल,
या योजनेत
सहभागी होणा-या पहिल्या ५०० सभासदांना
जॉईनिंग देखील बोनस दिला जाईल.
यासाठी तुमच्या सध्याच्या Page
Rank [?]
चा निकष वापरला जाईल.जॉईनिंग बोनस ठरविण्यासाठी
Bonus=(50+ (PageRank x 50)) Rs हे सूत्र वापरले जाईल. तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळाचा
Page Rank तुम्हाला
इथे समजू शकेल. तथापि अगदी नव्याने तयार केल्या गेलेल्या
संकेतस्थळांना/ब्लॉग्सना जॉईनिंग बोनस देण्याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी
मानबिंदूकडे राहील.
तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून सुरू
होऊन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या गेलेल्या सर्व व्यवहार आणि त्यासाठी
तुम्हाला मिळालेलं मानधन याची माहिती तुम्ही मानबिंदूवर लॉगिन करून कधीही
पाहू शकता. यासाठी लॉगिन
करून नंतर
येथे क्लिक करा.
एक व्यक्ती कितीही ब्लॉग/संकेतस्थळे
या योजनेसाठी नोंदवू शकते. तथापि जॉईनिंग बोनस फक्त एकाच संकेतस्थळासाठी
देण्यात येईल.
जॉईनिंग बोनस वगळता त्या संकेतस्थळ/ब्लॉग
साठीचे
तुमचे एकूण मानधन रु. २५० च्या वर गेल्यावर
आणि तुम्ही ब्लॉगचे/संकेतस्थळाचे मालक असल्याचे पडताळून पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या भारतात
असलेल्या बॅंकेच्या खात्याबद्दल माहिती विचारण्यात येईल. तुम्ही दिलेल्या
या खात्यावर तुमचं मानधन ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात येईल.
भविष्यात गरज पडल्यास या अटी आणि
शर्तींमध्ये बदल करण्याचे आणि/किंवा नवीन अटी/शर्ती लागू करण्याचे सर्व
अधिकार मानबिंदू स्वत:कडे राखून ठेवत आहे. या योजनेत सहभागी होणा-या
व्यक्तींना या अटी आणि शर्तींशी बांधील रहाणे बंधनकारक राहील.
अभिप्राय लिहा
 
मानबिंदू म्युझिक शॉपी तुमचे अभिप्राय जाणून
घेण्यास आम्ही उत्सुक आहोत! तुम्हाला काही सूचना द्यायच्या असल्यास, बदल सुचवायचे
असल्यास किंवा वरील प्रक्रियेत काही अडथळे येत असल्यास ते आम्हाला इथे जरूर कळवा..
 
मराठी संगीताच्या प्रसारासाठी आम्ही तयार केलेल्या या
Cause मध्ये सहभागी व्हा!