Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
  Maanbindu.com - Sampadakiya by Yogesh Pitale

आज मानबिंदूचं नवीन रुप सादर होतय! तुमच्यापैकी बरेचजणांनी मानबिंदूला या आधी भेट दिली असेल किंवा काही जण प्रथमच भेट देत असतील. ही वेब साईट चालू करण्यामागचे माझे विचार  सांगणारा हा लेख ..


 योगेश पितळे : संकेतस्थळ संकल्पना व निर्मिती

View Orkut Profile | FaceBook Profile

... इंजिनिअरींग पूर्ण झाल्यावर एका मोठ्या सॉफ़्टवेअर कंपनीत नुकताच ट्रेनी म्हणून जॉईन झालो होतो.वेब टेक्नोलॉजीवरचं तिथलं ट्रेनिंग छान चालू होतं. नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. तितक्यातच आम्हाला आनंदाची बातमी कळली की आमच्या कंपनीने १ बिलियन US dollars चा टर्नओव्हर नुकताच ओलांडला. मी, माझे कंपनीतले मित्र, मैत्रिणी सगळेच खुप खूष झालो. इंजिनिअरींग झाल्यानंतर पहिलीच नोकरी आणि ती ही इतकी उत्तुंग कामगिरी करणा-या कंपनीत! आम्हा सगळ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. इंजिनिअर होण्यासाठी आजवर घेतलेली मेहनत सार्थकी लागल्या सारखं वाटत होतं! हा आनंद सगळ्यांबरोबर शेअर करण्यासाठी आमच्या पुणे विभाग प्रमुखांनी आम्हाला एका ऑडीटोरीअम मध्ये एकत्र बोलावलं आणि इतकी उत्तुंग कामगिरी कशी करता आली ह्याची माहिती दिली. त्यावेळी आम्हाला कळलं की कंपनीच ९०% उत्पन्न US मधून आणि उरलेलं १० टक्के UK आणि इतर देशातून येतं. त्यानंतर प्रश्नोतरांची एक फ़ेरी चालू झाली. माझ्यासारखे नवीन जॉईन झालेले ट्रेनी त्यांना कुतूहल असलेल्या प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारत होते. माझ्या मनात एकच प्रश्न रेंगाळत होता, "अरे, ही कंपनी इथे काम करते, इथलं टॅलंट वापरते, मग भारतात आपले हाय एंड सोल्युशन्स वापरून तिने इथे एका टक्क्याचाही बिझनेस करू नये?".
 मला न राहवून हा प्रश्न मी ही प्रमुखांना विचारला, " Sir, why doesn't our company use our technical capabilities and core competency to work here in India? It would empower people here with the latest & high end technology and make their life much better ?" त्यांनी उत्तर दिलं ,"Its simple dear, It does not make any business sense! Profit margins here would be quite low. If we use that time and expertise in US market we would do quite well and that's precisely what we have done! Today we are US 1 billion $ company!". त्यांच उत्तर तर्कशुद्ध बुद्धीला नक्कीच पटणारं होतं. तरीही एक प्रश्न राहून राहून सतावत होता की मग इकडे कामं कुणी करायचं आणि केंव्हा? त्या लोकांना High End Solutions देताना इथे दुर्लक्ष करून आपण असेच मागसलेले रहाणार का? .. आणि हे का तर  Just becuase it does not make business sense ? प्रॉफ़िट मार्जिन्स कमी आहेत म्हणून ? तेंव्हा खूप वाटलं," अरे यार, काहीतरी चुकतय, 'काहीतरी' केलं पाहीजे!"

 पण कालांतराने हा प्रश्न मनातच राहून गेला. नवीन कंपनीत, नवीन कामात इतकं काही अजून शिकायचं होतं की इतर सगळ विसरायला व्हायचं. नवीन Softwares लिहिण्यात, त्यातले क्लिष्ट प्रोब्लेम्स सोडवण्यात सुरूवातील डोकं प्रचंड जड व्हायचं. घरी गेल्यावरही आणि स्वप्नातही(!) तेच दिसायचं. एके दिवशी ठरवलं आता रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहीजे नाहीतर काही खरं नाही. लहानपणापासूनच गाण्याची आवड होती, पण कधी शिकलो नव्हतो, म्हटलं चला गाणं शिकूया. पुण्यालाच रहायचो तिकडे गाण्याचा क्लास सुरू केला. सुरूवात केली अगदी सा रे ग म पासून! पण त्या नुसत्या सुरातही मजा वाटू लागली आणि आयुष्याला एक वेगळ वळण मिळालं ते इथे! माझे गुरू डॉ. रविंद्र घांगुर्डे हे स्वत: पट्टीचे  गायक, पं वसंतराव देशपांडे हा विषय घेऊन त्यांनी संगीतात PHD मिळवलेली!. खुद्द लतादीदींच्या हस्ते त्यांना आनंदमयी हा पुरस्कार मिळालेला! त्यांची मुलगी सावनी रवींद्र पं. ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या मैफ़िलीत गाणारी. माझं भाग्य म्हणून मला इतक्या उंचीच्या कलाकारांकडे थोडफ़ार शिकण्याचं आणि त्यांनी ऐकण्याचं भाग्य लाभलं! त्यातच गाण्यातल्या रुचीमुळे ऑर्कुटवर माझी प्राजक्ता सावरकर ह्या (आत्ताच्या) मैत्रिणीची ओळख झाली. ती ही गेले १४ वर्ष गाणं शिकत होती आणि ऑल इंडीया रेडीओची ग्रेडेड गझल आर्टीस्ट होती आणि. माझ्या सुदैवानेच म्हणाना आमच्याच बिल्डींगमध्ये प्राजक्ता पालव ही चित्रकारही रहायची. तिचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्र प्रदर्शनं भरलेली! मला योगायोगानेच भेटलेले हे तीनही तरुण कलाकार आणि त्यांची कला थक्क करणारी होती आणि त्यांचा वयाच्या मानाने त्यांनी आयुष्यात खुप लवकरच Mile Stones गाठलेले. पण एक गोष्ट मला राहून राहून वाटत होतं की त्यांना खरचं खूप प्रसिद्धी मिळावी, कारण ते सगळेजण खरच Deserving होते! पण  अजून तरी तसं काही झालं नव्हतं. पुन्हा एकदा वाटून गेलं," अरे यार, काहीतरी चुकतयं, 'काहीतरी' केलं पाहीजे!"

..हे चालू असतानाच ऑर्कुटवर मानबिंदू नावाने सुरू केलेल्या कम्युनिटीला चांगला प्रतिसाद मिळत होता.मराठी माध्यमात शिकल्यामुळे मातृभाषेबद्दल विशेष प्रेम आणि आपुलकी होती. म्हणूनच ऑर्कुटच्या कम्युनिटीवर नियम ठेवला होता, जे काही लिहाल ते फ़क्त मराठीत लिहा. त्यामुळे तिथे टीपीकल गेम्स वगैरे चालू झाले नाहीत आणि चांगले सदस्य कम्युनिटीला लाभले जे सातत्याने उत्तम लिहित होते. त्यांच्या लेखनाला अजून प्रोत्साहन मिळावं म्हणून मध्यंतरी मानबिंदू ही वेबसाईट सुरू केली होती! त्यालाही कालांतराने १५०० ते २००० लोकं भेट देऊ लागली. हे सगळ होता होता कंपनीमध्येही ३ वर्ष पूर्ण होत आलेली. मी आणि माझ्या बरोबरच्या टीमने बनविलेल्या सॉफ़्टवेअरर्स वर मिलीयन डॉलर्सचे व्यवहार होत होते! नुकतीच पावणे दोन कोटीचं बजेट असलेली ऑनलाईन शेअर ट्रेडींगची वेबसाईटही बनवून झाली होती. तिथे माझ्या हाताखाली ३-४ जण काम करत होते. एकंदरीत वेब टेक्नोलॉजीमध्ये येव्हाना ब-यापैकी मास्टरी आलेली !

   मग ठरवलं! ते 'काहीतरी' करायची आता वेळ आली आहे! आपण ३ वर्षात मिळवलेला सगळा अनुभव इथे वापरायचा.. मानबिंदूसाठी! टेक्नोलॉजीच्या माध्यमातून कलाकारांच्या कलेचं दर्शन लोकांना घडवायचं! इथल्या कलाकारांना इंटरनेटद्वारे जगभर पोहोचवायचं! लहानपणापासून मराठी नाटकं, चित्रपट पहात आलोय त्यांना मानबिंदू तर्फ़े जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न  करायचाय! मग केली सुरूवात; गेले पाच-सहा महीने ऑफ़ीसमधलं काम सांभाळून रात्री १-२ वाजेपर्यंत जागून मानबिंदूचं हे रुप बनवलं. तरीही अजून  वाटतयं, की ही तर फ़क्त सुरूवात आहे. इथे अजून बरच काही करता येण्यासारखं आहे, ती क्षितीजंही डोळ्यासमोर दिसत आहेत पण तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागेल!

   Meanwhile चांगल्या गोष्टीत अडथळे यायचेच, ते येतच आहेत. यशापयाशाचा हा लपंडाव  चालू आहे आणि त्यावर जिद्दीने मात करणं ही चालूच आहे.चालायचच! मध्यंतरी कुठेतरी एक वाक्य  वाचलं होतं, " कौन केहता है, आसमां मे सुराग नही होता, एक पत्थर तो तबियत से उछालो यार !"

... माझ्यामते माझं तसच काहीसं चालू आहे, गगनभरारीसाठी एक झेप तरी घेतली आहे. पण आता सतत खाली खेचणा-या गुरुत्वाकर्षणाच्या सीमा ओलांडून ती किती उंचीवर जाते,हे पहायचं आहे! तुमचं कौतुक, सहकार्य आणि पाठिंबा हे या गुरुत्वाकर्षणाच्या सीमा ओलांडण्यासाठी मला लागणारं इंधन आहे. तुम्ही ते वेळोवेळी आणि पुरेसं दिलत की मोहीम फ़त्ते झालीच म्हणून समजा! :)

लोभ असावा किंबहुना तो वृद्धींगत व्हावा ही सदीच्छा!

धन्यवाद.

य़ोगेश पितळे

[ Email : yogayog02[at]yahoo.co.in | yoursyogesh[at]gmail.com ]

[ Visit Orkut Profile ]

 
 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker