आजच्या तरुणाईमध्ये अनेक कलाकार दडलेले आहेत. जे कलेच्या
क्षितीजावरचे उगवते तारे आहेत आणि उद्याचे
सेलिब्रिटीजसुध्दा! असं टॅलेंट शोधून त्यांना रसिकांसमोर
आणणं खास यासाठी हे सदर! संगीत, अभिनय,चित्रकला अशा कलेच्या
विविध प्रांतात मुक्त मुसाफ़िरी करणा-या अनेक तरुण
कलाकारांना या सदरातून तुमच्या भेटीस आणत आहोत! ह्या
सदरातील काही चेहरे, काही नावं अगदी परीचयाची तर काही अगदी
अनोळखी.. पण प्रत्येकामधला कलाकार तितकाच अप्रतिम ! ह्या सदरात तुम्हाला मिळणार आहे या कलाकारांविषयी सर्व
माहिती ज्यात असेल त्यांचा
छोटासा परिचय, त्यांचा इथपर्यंतचा
प्रवास कसा झाला
याची माहिती, त्यांचाशी सहजच
मारलेल्या गप्पाटप्पा आणि
त्यांच्यातल्या कलेची छोटीसी झलक म्हणजेच गायकांची काही
ऑनलाईन गाणी, चित्रकारांची पेंटींग्स इत्यादी,इत्यादी!
कोणत्याही कलाकाराला हवी असते ती रसिकांची पसंतीची पावती,
मनसोक्त दाद आणि टाळ्यांचा कडकडाट! म्हणूनच कलेसाठी झोकून
दिलेल्या या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं खास
यासाठीच हे सदर!
... एक सांगायचच राहीलं!
तुम्हाला या कलाकरांविषयी वाटतं ते तुम्ही आता या
कलाकारांपर्यंत पोहोचवू शकता या कलाकारांच्या पानावर
असलेल्या
'अभिप्राय लिहा' या सेक्शनमधून! चला तर मग भेटूया
या तरूण कलाकारांना..