Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 
तुमचं नाव इथे?
 
 
 
 
 
 

 

Advertisement

 
 
 
 
 
 
"Sangeetkar: Gandhaar Sangoram (Maanbindu.com)"
 

gandhaar
SocialTwist Tell-a-Friend

गंधार संगोराम [प्रायोगिक नाटकांसाठी संगीत दिग्दर्शन]
Gandhaar Sangoram : http://gandhaar.maanbindu.com 

मूळचा पुण्याचा असलेला गंधार संगोराम  सध्याच्या उगवत्या संगीतकारांपैकी एक आहे.  संगीत हे काही जणांच्या रक्तातच असतं असं म्हणाना! म्हणूनच की काय, सध्या कुठे वयाचं विसावं वर्ष ओलांडणा-या गंधारला गिटार (इलेक्ट्रिक आणि अकॉस्टीक), सतार, बासरी, हार्मोनियम, किबोर्ड, व्हायोलीन, माऊथ ऑर्गन, पियानीका आणि अन्य लहान सहान वाद्य धरून  तब्ब्ल १९ वाद्यं वाजवता येतात!
संगीताचं बाळकडू त्याच्यामध्ये लहानपणापासून रुजलेलं! त्याचे आजोबा डॉ.श्रीरंग संगोराम हे स्वत: उत्तम संगीत समीक्षक आणि वडील मुकुंद संगोराम (संपादक, लोकसत्ता) हे ही संगीताचे उत्तम जाणकार! आजोबांनी संगीतावर लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास केल्याने संगीतातले बारकावे समजण्यास गंधारला त्यांची खूप मदत झाली असं तो म्हणतो.इयत्ता सहावीत असताना त्याने त्याची पहिली चाल केल्याचंही त्याला व्यवस्थित आठवतं. संगीताचा बारकाईने अभ्यास अणि त्यात इतकी वाद्यं वाजवण्याची कला अंगभूत असताना त्याची पावले संगीत दिग्दर्शनाकडे वळली नसत तरच नवल!
गंधारने आत्तापर्यंत ब-याच प्रायोगिक नाटकांसाठी संगीत दिग्दर्शन केलय! त्यात
चारु आरो ई, परका , शरम गयी तो, Logging Out आणि T for temptation ह्या मराठी नाटकांचा प्रामुख्याने समावेश करावासा वाटतो. ह्या व्यतिरिक्त  द.मा. मिरासदारांनी लिहिलेल्या दळण ह्या एकांकीकेलाही त्यांने संगीत दिलयं. ह्या सर्व एकांकिकांनी हाताळलेले विषय  हे वेगवेगळ्या भाषांमधले आणि त्याहूनही वेगवेगळ्या काळातले असल्याने ख-या अर्थाने वैविध्यपूर्ण संगीत देण्याची संधी गंधारला मिळाली.
'दळण' ह्या  कथेसाठी त्याने केलेलं 'एक होता मास्तर' हे गाणं, शरम गयी तो ह्या मुस्लीम कुटुंबावर आधारीत नाटकात त्याने संगीतबद्ध केलेली कव्वाली आणि त्याने स्वत: लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं 'Just green' हे इंग्रजी गाणं; ह्या सर्वच रचना एकमेकांहून सर्वस्वी भिन्न तरीही तितक्याच सुंदर आहेत! ह्या व्यतिरिक्त त्याने अनेक लघुचित्रपटांना आणि जिंगल्स साठीही संगीत दिलय. '
सायकल' ह्या १९६० च्या सुमारासच्या एका कथेवर आधारीत असलेल्या एकांकीकेसाठी गंधारला 'सवाई संगीतकार' हा पुरस्कार मिळालाय!ह्या व्यतिरिक्त पु.लं देशपांडे करंडकासाठी सलग दोन वर्ष सर्वोत्कृष्ट संगीत आणि लूज कंट्रोल आणि उत्तररात्र ह्या व्यावसायिक नाटकासाठी संगीत दिग्दर्शन हे गंधारच्या इथपर्यंतच्या वाटचालीतले 'मानबिंदू' ठरले आहेत.

मध्यंतरी CNN-IBN ह्या वृत्तवाहीनीने 'सलाम महाराष्ट्र' ह्या कार्यक्रमात गंधारची तब्बल एक तास मुलाखत घेतली होती. उत्तरोतर रंगलेल्या ह्या मुलाखतीत गंधारने अनेक प्रश्नांना अतिशय सुरेख उत्तरं दिली आणि त्याबरोबरच त्याने वर उल्लेखिलेल्या  त्याच्या  सगळ्याच रचना स्वत: गिटारच्या साथीने सादर केल्या होत्या! संगीतरसिकांसाठी एक मेजवानी ठरणारी ही मुलाखत आम्हाला तुमच्यासमोर पूर्णत: सादर करणं शक्य नसलं तरी ह्या मुलाखतीची काही क्षणचित्रं आम्ही खास तुमच्यासाठी आणत आहोत. ती तुमच्या पसंतीस उतरतील ह्याची आम्हाला खात्री आहे !

 मुलाखतीची सुरूवात आणि सहावीतील पहिली चाल

Just Green
गंधारने लिहिलेलं, चाल लावलेलं आणि गायलेलं गाणं

एक होता मास्तर
(
दळण ह्या एकाकीकेचं मराठी गाणं)

शरम गयी तो
(
शरम गयी तो ह्या नाटकातील कव्वाली)

Logging Out
(नाटकासाठीची आवडती ट्यून)

ह्या व्यतिरिक्त गंधारने चाल लावलेली अजून काही गाणी!

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मार
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
  मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  तुषार तळवलकर  |  
  गंधार, मित्रा सुटलाच आहेस की :-)
[ Feb 1, 2009 8:44 AM ]

  Mandar Joshi  |  
  एक होता मास्तर छान वाटलं! भविष्यासाठी शुभेच्छा .
[ Jan 8, 2009 10:34 PM ]

  ramesh ovhal  |  
  mala tula contact karayache ahe kase karoo Please reply
[ Mar 25, 2010 11:10 AM ]

  Ashish Shreenivas Keskar  |  
  शरम गया तो छान वाटले.... तुला खूप शुभेच्छा !
[ Jan 16, 2009 12:45 PM ]

  Gandhaar  |  
  ध् न्यवाद् !!!
[ Jan 13, 2009 9:36 AM ]

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker