Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists : Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 


तुमचं नाटक/कार्यक्रम इथे ?
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
JAI HO- A R RAHMAN LIVE IN PUNE ON 31 MAY

ए. आर. रेहमान लाईव्ह !! रविवार ३१ मे २००९,  संध्याकाळी ६.३० ते १०.३०, बालेवाडी स्टेडीयम, पुणे

 
Share

SMS Maanbindu jaiho to 5676775 to receive updates about the event

SocialTwist Tell-a-Friend

 


 

सहभागी गायक:
ए. आर. रेहमान, हरीहरन, जावेद अली, राशीद अली, राजा हसन, बेनी दयाळ, मोहम्मद असलम, रुपकुमार राठोड आणि अन्य

सहभागी गायिका:
राधा मंगेशकर, चित्रा, साधना सरगम, सुझॅन, विवियन चैक्स, निती मोहन, सायोनारा, रैहाना, तन्व आणि अन्यी

सहभागी वादक :
नवीन (बासरी), केथ पीटर्स, संजीव, राशीद अली ( गिटार), असद (सितार)
आणि अन्य

 

३१ मे रोजी झालेल्या या कॉन्सर्टच्या निमित्ताने ८ मे रोजी MIT collage campus मध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. खुद्द ए. आर. रेहमान तिथे येणार असल्याची खबर त्याच्या चाहत्यांना आधीच मिळाल्याने सुमारे ३००० हून अधिक चाहत्यांनी तिथे एकच गर्दी केली होती आणि पत्रकार परिषदऐवजी त्या जागेला मिनी - कॉन्सर्टचं रूप आलं होतं!! या प्रसंगी रेहमानने जय-हो वर्ल्ड टूरचा खास झेंडा हवेत फ़डकवला आणि त्याच्या या कॉन्सर्टबद्दल अधिक माहिती सुद्धा दिली! त्याच्या चाहत्यांनी उत्साहाने केलेलं त्याचं स्वागत पाहून त्यालाही भरून आलं होतं, तो म्हणाला, "तुमच्या सारख्या चाहत्यांचा पाठींबा आणि देवाने दिलेले आशीर्वाद या मुळेच मला सतत नवीन करण्याची प्रेरणा मिळते.  पुणे हे शहर भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न पं. भिमसेन जोशी यांच्या घरासारखं आहे आणि यामुळे या वर्ड टूर चा पहिला लाईव्ह शो पुण्यामध्ये करताना मला विशेष आनंद होतोय! "
Photographs Video Clip

   

हा कॉन्सर्ट हा रेहमनाच्या जय हो या वर्ल्ड टूरचा एक भाग असून या कॉन्सर्ट्च्या निमित्ताने ऑस्कर जिकंल्यानंतर रेहमान प्रथमच लोकांसमोर आला होता. सुमारे ६० हून अधिक दिग्गज कलांवत या कार्यक्रमात सहभागी झाले. न भूतो न भविष्यती अशा रंगलेल्या या सोहळ्यासाठी साधारणत: ५ ते ७ हजाराहून जास्त चाहते यावेळेस बालेवाडी स्टेडियमवर जमले होते. या शोसाठी उभारण्यात आलेला रंगमंच तर डोळ्याचे अक्षरश: पारणे फ़ेडणारा होता. साधारणत: ३० ते ४० फ़ूट लांबीची LCD स्क्रीन, गाण्यांनुसार बदलणारी त्यावर दिसणारी छायाचित्रे आणि एकंदरीतच प्रकाशयोजना अनुभवताना जवळपास प्रत्येक गाण्याला एक वेगळा रंगमंच पाहिल्याचा आभास होत होता! ३१ मे रोजी बालेवाडी स्टेडीयमवर रंगलेल्या या सोहळ्यात साधारणत: ३५ गाणी सादर केली गेली. यामधली रोझा चं टायटल ट्रॅक, ऐ हैरथे नाझनी, पप्पू कान्ट डान्स, जय हो आणि वंदे मातरम या गाण्यावर चाहत्यांची स्टेडियम अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. रंगमंचावरील भारतररत्न लतादीदींची उपस्थिती आणि त्यांनी जमलेल्या चाहत्यांशी साधलेला संवांद हे या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य ठरलं. या कार्यक्रमात खालील गाण्यांचा समावेश होता.

 • वेलकम स्पीच
 • मौसम ऍंड एस्केप (स्लमडॉग मिलीयनर)
 • ओ साया (स्लमडॉग मिलीयनर) तन्वी, ए. आर.रेहमान
 • अथिरडी (सिवाजी) ए. आर. रहमान, सायोनारा
 • तु मुस्कुरा (युवराज)
 • रोजा जानेमन (रोजा) साधना सरगम, हरीहरन
 • मसकली (देल्ही ६) राजा हसन
 • जिया से जिया (कनेक्शन्स) ए आर रेहमान
 • ओरू कोडई (सिवजी)
 • लिक्वीड डान्स (स्लमडॉग मिलियनर)
 • गुझारीश (गझनी) जावेद अली
 • नेत्रु इल्लथा (पुडीया मुघलम) चित्रा
 • मलारगले (लव्हबर्ड्स) हरीहरन
 • कभी कभी (जाने तु) राशीद अली
 • रेहना तु (देल्ही ६) ए. आर .रेहमान
 • रिंगा रिंगा (स्लमडॉग मिलियनर) सायोनारा, निती मोहन
 • गॅंगस्टा ब्लूझ (स्लमडॉग मिलियनर)
 • न्यू (न्यू) - ब्लेझ
 • ये देल्ही मेरा यार - देल्ही ६
 •  कलाभंडार(देल्ही ६)
 • असीमंशा शाहशा, रुक्मणी मेडले
 • लतिकास थीम - सुझॅन
 • क्वाजा जी (जोधा अकबर) - ए. आर रेहमान
 • अर्झियां (देल्ही ६) जावेद अली,राजा, मोहम्मद असलम, रेहमान)
 • कन्नलाने (बॉम्बे)
 • ए हैरथे (गुरू) हरीहरन, ए. आर. रेहमान, साधना सरगम
 • वाजी वाजी (सिवजी) हरीहरन, साधना सरगम
 • मुस्तफ़ा मुस्तफ़ा ए. आर. रेहमान
 • युवा -ए आर रेहमान
 • पप्पु कान्ट डान्स (जाने तु)
 • ए बचु सुझॅन
 • उर्वशी उर्वशी (ए. आर. रेहमान)
 • टॅक्सी टॅक्सी
 • अन्था
 • जय हो (स्लमडॉग मिलियनर)
 • वंदे मातरम
या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा कॅमेरा अथवा  कुठल्याही प्रकारचं लाईव्ह रेकॉर्डींग करण्यास परवानगी नव्हती. तरीही रेहमानच्या चाहत्यांनी आपल्या मोबाईलद्वारे हे अविस्मरणीत क्षण बंदीस्त करून ठेवलेच! चला पाहूया एक झलक!

या कॉन्सर्ट्च्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न हे लता मंगेशकर मेडीकल फ़ाउंडेशन आणि आळंदी-देहू विकास परीसर समिती यांना मदत म्हणून देण्यात आलं! लता मंगेशकर मेडीकल फ़ाउंडेशन तर्फ़े पं. ह्र्द्ययनाथ मंगेशकर यावेळेस उपस्थित होते. ते म्हणाले, " लता मंगेशकर मेडीकल फ़ाउंडेशन तर्फ़े दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चालवलं जातं. यंदा पावसाळ्यानंतर याच नावाने दुसरं हॉस्पिटल सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि रेहमानने यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे."

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मार
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
  मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  Abhijeet  |  
  जय हो!!!!!
[ May 24, 2009 5:12 AM ]

  Rishika  |  
  I am very excitted to watch this show!!
[ May 24, 2009 3:05 AM ]

  ajinkya thakare  |  
  ग्थ्घ र्त्स्क़्स्क़्सोक़्स ््य्७३२६७र ज्य्ज्फ्द्स्न्फ ब्फ्जे
[ Sep 19, 2009 3:38 AM ]

  Kanak Thakare  |  
  चन उपक्रम्
[ May 30, 2009 1:10 AM ]

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker