'रंगमंच' या शब्दातच बरच काही दडलेलं आहे. आपल्या
जीवनातले अभिनय, संगीत, नृत्य, कविता अशा विविध कलांचे रंग
ज्या मंचावर सादर होतात, तो
'रंगमंच'! पण तरीही
रंगमंच म्हटलं की पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं ते नाटक!
मग ते व्यावसायिक
असो, प्रायोगिक
असो किंवा संगीत नाटक.
या प्रत्येक प्रकारच्या नाटकाचा स्वत:चा असा एक वेगळा बाज
आहे,एक वेगळी खासियत आहे आणि म्हणूनच या तीनही प्रकारची
नाटकं पहाणं हा स्वत:मध्ये एक खूप वेगळा अनुभव असतो! अशाच काही
अगदी निवडक नवीन नाटकांची झलक बघणार
आहोत रंगमंच या विभागात! ह्या व्यतिरिक्त रंगमंचावर
सादर होणा-या अनेक संगीत मैफ़िली, एकपात्री कार्यक्रम हे
सुद्धा तुमच्या आवर्जून भेटीस आणण्याचा आमचा
प्रयत्न असेल..
नवीन संगीतकारांची मेलोडीयस गाणी रसिकांपर्य़ंत पोहोचवण्याचा उद्दीष्टाने मानबिंदू
म्युझिक तर्फे "आमची गाणी
- मेलोडीयस गाण्यांची अविस्मरणीय ट्रीट" या कार्यक्रमाची निर्मीती करण्यात आली
आहे. डोळयांच पारणं फ़ेडणारं सँड ऍनिमेशन या कार्यक्रमात आपल्याला पहाता येणार असून
कार्यक्रमाच सूत्र संचालन आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे.
चला जाणून घेऊया अधिक "आमची
गाणी - मेलोडीयस गाण्यांची अविस्मरणीय ट्रीट" बद्दल..