Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 


तुमचं नाटक/कार्यक्रम इथे ?
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Marathi Natak Avagha Rang Ekachi Zala| Online,SMS booking | Maanbindu.com

Avagha Rang Ekachi Zala

नाटकाचे ह्या पुढील प्रयोग : येत्या सात दिवसात या नाटकाचे कुठेही प्रयोग नाहीत. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या.

 
Share Buzz
 
Avagha Rang Ekachi Zala poster

Star cast of Avagha Rang Ekachi Zala

निर्मीती: नाट्यसंपदा

निर्माता : प्रभाकर पणशीकर

लेखक : डॉ. मीना नेरुरकर

दिग्दर्शक: अशोक समेळ

नेपथ्य : बाबा पार्सेकर

कार्यकारी निर्माता : अनंत पणशीकर

प्रमूख भुमिका - अमोल बावडेकर, जान्हवी पणशीकर, गौतम मुर्डेश्वर, योगिता रानडे, रश्मी मोघे, प्रसाद सावकार

 

Introduction to Avagha Rang Ekachi Zala

नाटकाची कथा थोडक्यात अशी : अप्पा वेलणकर हे एक कीर्तनकार. परंपरेने आलेली त्यांच्या घराण्यातली ही कला जोपासणारे कलावंत. अतिशय  कडव्या विचारांचे पण प्रेमळ असे हे व्यक्तिमत्व आहे! त्यांच्या पुढच्या पिढीलाही कलेची उपजत जाण आहे. त्यांचा मुलगा सोपान तरूण पिढीचा प्रतिनिधी. अभिजात कीर्तन पद्धतीत नवीन प्रयोग करणारा तरूण कलाकार! त्याला कीर्तनामध्ये नवीन प्रयोग करण्याची प्रबळ इच्छा आहे आणि त्यावरूनच आप्पा आणि सोपान या पिता-पुत्रांमध्ये वाद आहेत. आप्पांची कन्या मुक्ता हिला जातिबाह्य मुलाशी प्रेमविवाह करण्याची इच्छा आहे, पण अप्पांचा त्याला कडवा विरोध आहे. आप्पांचे मोठे चिरंजीव ज्ञानेश यांचाही याच कारणावरून अप्पांशी मतभेद झाल्याने तो त्यांचापासून वेगळा झालेला असतो. अशा कडव्या विचारांच्या अप्पांकडे जेनी ही अमेरीकन मुलगी कीर्तन हा कलाप्रकार शिकायला येते! जेनीचं कीर्तनाचं जाण आणि अभ्यास यामुळे अप्पा प्रभावित होतात. कीर्तनाचं शिक्षण घेता घेता अप्पा आणि जेनी मध्ये प्रेमळ आजोबा नातीचं नातं तयार होतं आणि अप्पांच्या विचारसारणीत हळू हळू बदल घडू लागतो. यानंतर अप्पा, त्यांची मुलं आणि एकंदरीत परिस्थीतीमध्ये जे नाट्य तयार होतं त्याचं चित्रण अवघा रंग एकचि झाला या नाटकात करण्यात आलं आहे!


 

Speciality of Avagha Rang Ekachi Zala

या नाटकातलं संगीत हे या नाटकाचं खास वैशिष्टय आहे. यांनी गाण्यांना दिलेल्या चाली सुमधुर आहेत. कीर्तनकाराच्या पदांमधून वारकरी संगीताचा नाद डोकावतो. पाश्चात्त्य ठेक्यावरच्या चालीही ठेका धरायला लावणाऱ्या आहेत. 'पिल्लू जाय दिगंतरा' या अशोक बागवेंच्या सुंदर रचनेला दिलेली चाल आर्त आहे आणि 'अवघा रंग एकचि झाला' ही भैरवीही जमून गेली आहे. अमोल बावडेकर आणि स्वरांगी मराठे या युवा कलावंतानी, प्रसाद सावकारांसारख्या जुन्या जाणत्या गायक अभिनेत्याने या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. पण सध्या स्वरांगी मराठेने या नाटकातून एक छोटासा ब्रेक घेतला असून तिची जागा आता गौरव महाराष्ट्राची स्पर्धक रश्मी मोघे हिने घेतली आहे. वयपरत्वे सावकारांच्या गाण्यावर काही मर्यादा आलेल्या दिसतात. पण त्या सांभाळूनही ते गाण्यांची पेशकश झकास करतात. सावकारांच्या असण्याने नाटकावर खेळकर प्रसन्नतेचा शिडकावा झाला आहे. अमोल बावडेकर (सोपान) आणि रश्मी मोघे (जेनी) या दोघांनीही भूमिकेचं बेअरिंग सांभाळण्यात आणि रंगमंचीय गायकीत गांभीर्यपूर्वक सहजता दाखवली आहे. जान्हवी पणशीकर (आई) आणि सुरूची आडारकर (मुक्ता) यांनी त्यांना योग्य साथ दिली आहे. या नाटकात भारतीय, पाश्चिमात्य व इतर संगीत कलाकृतींचा उत्तम मेळ घातला गेल्याने हे नाटक थोरांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आवडतय! म्हणूनच काय या नाटकाचे भारत आणि अमेरिकेत मिळून ३०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
 
 

Online booking of Viccha Majhi puri kara

येत्या सात दिवसात या नाटकाचे कुठेही प्रयोग नसल्याने ऑनलाईन बुकींग उपलब्ध नाही. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या!

 

Abhipray on Vichha Mazi puri kara


 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker