नाटकाचे ह्या पुढील प्रयोग :सध्या या नाटकाचे आगामी प्रयोग कधी आणि कुठे आहेत
हे अजून ठरलेले नाही. लवकरच ही माहिती या पानावर प्रसारीत करण्यात येईल!
तसच या नाटकाच्या सर्व प्रयोगांचे ऑनलाईन तिकीट बुकिंग लवकरच या पानावर सुरू
होत आहे!
प्रा. प्रदीप ढवळ
यांच्या नरेंद्र ते विवेकानंद- एक झंझावात ह्या
कादंबरीवर आधारीत.. लेखक
आणि दिग्दर्शक :
अशोक समेळ
निर्मीती: ऋग्वेद आणि कोकण कला अकादमी नेपथ्य : राजन भिसे गीते : प्रा. अशोक बागवे
संगीत : डॉ. विद्याधर ओक
प्रकाशयोजना : राघू बंगेरा कलाकार : संग्राम समेळ,
आमदार संजय केळकर आणि अन्य [
संपर्क : हर्षला लिखिते- 93206 80113]
Close
नवनवीन आणि दर्जेदार नाट्कं आपल्या रंगभूमीवर सातत्यानं येत असतात! पण बरेचदा
आपलं आवडतं नाटक आपल्या जवळच्या नाट्यगृहात आणि आपल्या सवडीच्या वेळेला कधी आहे, हे
नेहमीच पेपरमध्ये पहायला आपल्याला वेळ मिळतोच असं नाही. म्हणून SMS Alerts ही खास
सोय ’मानबिंदू’ खास तुमच्यासाठी आणली आहे! तुमच्या जवळचं नाट्यगृह कुठलं आहे, तुमचे
सुट्टीचे दिवस कुठले आहेत आणि त्या दिवशी सहसा तुम्हाला कधी वेळ असतो हे तुम्ही
आम्हाला कळावायचं आहे आणि ह्या निवडीनुसार एखाद नाटकं त्यावेळेत, त्याठिकाणी
असल्यास मानबिंदूतर्फ़े SMS पाठवून कळविण्यात येईल. ही सोय मानबिंदूच्या सदस्यांसाठी
पूर्णत: मोफ़त आहे. मराठी नाटक किंवा किंबहूना रंगमंचावर सादर केले जाणार दर्जेदार
कार्यक्रम अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत हा या मागचा प्रांजळ हेतू आहे. SMS
Alerts साठी रजिस्टर करण्यास तुम्हाला मानबिंदूचे सदस्य असणं आवश्यक आहे. सदस्य
होण्यासाठी कृपया इथे क्लिक करा...
संन्यस्त ज्वालामुखीचा प्रारंभ स्वामी विवेकांनंद उपाशीपोटी शिकागोला एका दगडावर
बसले असताना मिसेस हेल त्यांना आपल्या घरी घेऊन येते आणि मग फ़्लॅशबॅकला सुरूवात होते
अशा दृश्यांनी होतो. त्यातूनच
विवेकानंदांच्या लहानपणापासूनच्या जीवनाचे दर्शन
आपल्याला घडू लागते. त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ओळख होण्यास सुरूवात होत
असतानाच त्यांच्या मोठेपणाची आपल्याला चाहूल लागते. त्यांच्या बोलण्यातून विद्वत्ता
पदोपदी जाणवू लागते.हळूहळू स्वामी
विवेकानंदांना, लोकमान्य टिळक हरिदास असे अनेक जण भेटतात.
मग एके दिवशी स्वामी रामकृष्ण परमहंसांची आणि त्यांची
गाठ पडते. विवेकानंद त्यांचे शिष्यत्व पत्करतात आणि तिथून नाटकाचा पुढचा प्रवास सुरू
होतो...
नाटक पहाताना नाटककार अशोक समेळांनी अनेक घटनांना प्राधान्य दिलेलं आहे आणि
नाटकाचे कथानक एका सुत्रात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे विशेष जाणवतं!
संवादातील चढउतार, उत्कर्षबिंदू त्यांनी नीटसपणे
केंद्रीत केले आहेत.त्यांनी निवड केलेली कलाकारांची निवड उत्तमच!
या नाटकात सुमारे ३५ कलावंत काम करत असून सर्वच
कलाकारांनी नाटकाच्या यशात हातभार लावला आहे. संग्राम समेळ ह्यांनी विवेकानंद उत्तम
वठवलाय. संजय केळकरांचा रामकृष्ण परमहंस हुबेहुब त्या व्यक्तिरेखेसारखा. त्यांची
संवाद साधण्याची लकब, देहबोली इतकी सहजरीत्या त्यांनी साकार केली आहे की संग्राम
समेळ आणि त्यांचे प्रवेश पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. डॉ. विद्याधर ओक यांनी अशोक
बागवे यांच्या गीतांना दिलेल्या चाली श्रवणीय असून अमोल बावडेकरांच्या गायकीतून एक
वेगळाच माहोल तयार होतो! ह्या सगळ्यांमुळे नाटक पूर्ण वेळ खुर्चीला खिळवून ठेवतं हे
नक्की..