Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 


तुमचं नाटक/कार्यक्रम इथे ?
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Marathi Natak Vichha Majhi puri kara| Online,SMS booking | Maanbindu.com

vichha majhi puri kara

नाटकाचे ह्या पुढील प्रयोग : येत्या सात दिवसात या नाटकाचे कुठेही प्रयोग नाहीत. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या.

 
vichha majhi puri kara poster

Star cast of Vichha Majhi puri kara

निर्मीती: नाट्यसंपदा

निर्माता : प्रभाकर पणशीकर

लेखक : वसंत सबनीस

दिग्दर्शक: अरूण होर्णेकर

नृत्य दिग्दर्शक : नरेंद्र पंडीत

पार्श्वगायिका : दिप्ती आंबेकर

कार्यकारी निर्माता : अनंत पणशीकर

प्रमूख भुमिका - अरुण होर्णेकर, रजनी देशभ्रतार, अरूण होर्णेकर, वसंत सकपाळ, सुनील अष्टेकर, प्रकाश पवार, संजय मोहिते आणि दिगंबर नाईक

 

Introduction to Vichha Majhi puri kara

वसंत सबनिस लिखित "विच्छा माझी पुरी करा" हे नाटक नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेतर्फे पुन्हा रंगभूमीवर आणण्यात आलय."छपरी पलंगाचा" या मूळ वगावर हे नाट्य आधारीत आहे! अवघा रंग एकची झाला, वेटींग फोर गोदो, सखाराम बाईंडर यासारख्या दर्जेदार नाटकांच्या निर्मीतीनंतर या नाटकाची निर्मीती नाट्यसंपदेने केली आहे. प्रख्यात मराठी चित्रपट अभिनेते दिवंगत दादा कोंडके आणि राम नगरकर या द्वयीनी हे नाटक एकेकाळी महाराष्ट्रभर गाजवलं होतं, आता दिगंबर नाईक आणि संजय मोहिते या नाटकाची धुरा सांभाळणार आहेत! फैय्याजनी या नाटकाठी पार्श्वगायन केलेलं पाडाला पिकलाय आंबा हे गाण आजही तितकच लोकप्रिय आहे! अत्यंत लवचिक फॉर्म असलेल्या या लोकनाट्यात त्या त्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील घटनांवर विनोदी पण मार्मिक टिकाटीप्पणी केली जाते.आत्तापर्यंत या नाटकाचे "सैय्या बने कोतवाल" या नावाने भोजपुरी हिंदीमध्ये आणि "टेम्प्ट मी नॉट" या नावाने इंग्रजीमध्ये यशस्वी प्रयोग झालेले आहेत!


 

Speciality of Vichha majhi puri kara

एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे! 

 

Online booking of Viccha Majhi puri kara

येत्या सात दिवसात या नाटकाचे कुठेही प्रयोग नसल्याने ऑनलाईन बुकींग उपलब्ध नाही. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या!

 

"विच्छा माझी पुरी करा" या नाटकाबाबतची परीक्षणे, माहिती अनेक वृतपत्रांमधून. चला पाहूया विच्छा माझी पुरी करा बाबत कुणी काय म्हटलय!

वृत्तवाहीन्यांमधूनही "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाबाबत माहिती/बातम्या प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आल्या. चला पाहूया एक झलक!


स्टार माझा वगनाट्य पुन्हा रंगमंचावर

झी मराठी 'हाऊसफुल्ल'

ई-टीव्ही" विच्छा माझी पुरी करा" नव्या ढंगात

 

Abhipray on Vichha Mazi puri kara


 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker