Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 
तुमचं नाव इथे?
 
 
 
 
 
 
 
 

Advertisement

 
 
 
 
 
Prajakta Palav : Painter with internationl recognition
  PrajktaPalav

प्राजक्ता पालव [ आंतराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार ]
Prajakta Palav : http://prajakta.maanbindu.com 

SocialTwist Tell-a-Friend

मुंबईच्या प्राजक्ताने जे.जे स्कूल ऑफ़ आर्ट्स मधून मास्टर ऑफ़ फ़ाईन आर्ट्स ही पदवी प्राप्त केली आहे.यानंतर चित्रकलेत गेली अनेक वर्षे उल्लेखनिय कामगिरी करत असून महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ़ इंडिया,मिड डे, हिंदुस्थान टाईम्स, यासारख्या अग्रगण्य वृत्तपत्रांनीही तिचं वेळोवेळी कौतुक केलं आहे!
प्राजक्ताच्या यशस्वी कारकिर्दीची सुरूवात १९९९ साली जे.जे स्कूल ऑफ़ आर्ट्स तर्फे तिला मिळालेल्या 'Best Panel award' आणि २००० साली मिळालेल्या 'Best Portrait Award' ह्या पुरस्कारांपासून झाली.यानंतर २००५ साली काशी आर्ट गॅलेरी (कोची) तर्फ़े दिल्या जाणा-या आणि ह्या क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या आणि 'Kashi Visual Art Award' ह्या पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. ह्याच वर्षी N.G.M.A. तर्फ़े तिला 'Future Artist Award' हा पुरस्कार सुद्धा तिला मिळाला.

यादरम्यान २००१ ते २००७ ह्या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलेरी (मुंबई) , ललित कला (दिल्ली), Gallery Barry Keldoulis (Australia), Vadera And Grassower Art Gallery(London), बजाज आर्ट गॅलेरी (मुंबई), N.G.M.A (मुंबई) ह्यासारख्या प्रतिष्ठीत ठिकाणीही तिच्या चित्रांची प्रदर्शने भरविण्यात आली आणि त्यालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला..

प्राजक्ताशी तिच्या कामाविषयी गप्पा मारत असताना ती म्हणते,
"
माझं काम हे आदर्श आणि सत्य ह्याबद्दल आहे! रोजच्या जीवनात आपल्याला चांगलं तेच बघायाची आणि इतरांना दाखवायची सवय असते, पण ज्या गोष्टी 'छान' ह्या शब्दांतर्गत मोडत नाही, त्यांना आपण या शब्दाच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न करतो; मग ते कपाटावरील ठेवलेलं सामान असो किंवा कोप-यातली रचून ठेवलेली रद्दी असो. ह्या गोष्टी मुळत: सुंदर नसतात, पण आपण त्यांची मांडणी/रचना त्या वस्तू जास्तीत जास्त छान दिसाव्यात अशा पद्धतीने करतो.सोप्या शब्दात, Bitter things are also part of life which we normally try to represent in sweeter manner! माणसांची ही 'वृत्ती'  मला रंगवायला आवडते!!"
 प्राजक्ताचा हा विचार तिच्या चित्रांकडे बारकाईने पाहिल्यास नक्कीच जाणवतो! त्यात अजून एक वाखणण्याजोगी गोष्ट दिसते, ती म्हणजे चित्रातल्या प्रत्येक वस्तूला, ती वस्तू बनविण्यास ज्या material चा वापर केला गेला आहे, त्याला रंगांच्या मदतीने दिला गेलेला एक सुंदर Feel ! प्लॅस्टीकची/नायलॉनची एखादी बॅग, स्टीलचं कपाट, व्हेलवेटचं एखादं आवरण हे त्या त्या वस्तूपासूनच बनलेलं आहे हे सामान्य नजरेलाही स्पष्ट दिसतं आणि ही कलात्मकता पाहून सहजच आपण म्हणून जातो, "वाह! क्या बात है!"
 

 
Share Buzz

प्राजक्ताची काही चित्रे खास तुमच्यासाठी इथे देत आहोत !

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker