चित्रकलेत आपली वाटचाल करत असलेल्या तुषारने १९९६ साली जे.जे स्कूल ऑफ़ आर्ट्स
मधून बॅचलर ऑफ़ फ़ाईन आर्ट्स ही पदवी प्राप्त केली आहे. सध्या ठाण्यास वास्तव्यास
असलेला तुषार यानंतर चित्रकलेत गेली अनेक वर्षे उल्लेखनिय कामगिरी करत असून तो
सध्याच्या यशस्वी आणि प्रतिभावंत चित्रकारांपैकी एक आहे
राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्या
तुषारची अनेक ठिकाणी चित्रांची प्रदर्शने भरली असून त्यातली काही
महत्वाची प्रदर्शने ह्या प्रमाणे आहेत.
आंतरराष्ट्रीय
स्तरावरील प्रदर्शन
कॉन्टेम्पररी इंडियन आर्ट ग्रूप शो, A/R कॉन्टेम्पररी गॅलरी,
मिलन, इटली (सप्टेंबर २००७)
राष्ट्रीय
स्तरावरील प्रदर्शने
ऑगस्ट आर्ट गॅलरी, दिल्ली
(ऑगस्ट २००७)
हार्मनी आर्ट शो, नेहरू
सेंटर (अप्रिल २००७)
रॉक ग्रूप शो, किताब महल (डिसेंबर
२००६)
यंग कॉल ग्रूप शो, टाओ
आर्ट गॅलरी (जुलै २००६)
क्वोटेबल स्टेन्सिल ग्रूप
शो, टाओ आर्ट गॅलरी (डिसेंबर २००५)
आर्ट ऍन्ड सोल गॅलरी (जून
२००५)
मुंबई शांघाय ग्रूप शो,
कलाकृती गॅलरी (मे २००५)
बियॉन्ड ह्युमन हॅबिटॅट
ग्रूप शो (फ़ेब्रुवारी २००५)
तुषारशी त्याच्या
कामाविषयी गप्पा मारत असताना
तो म्हणतो,
"माझं काम हे
मुख्यत्वे आयुष्याच्या दर्शनी भागावर असतं. त्यातही माणूस आणि
माणसाच्या (त्या एखाद्या व्यक्तिशी) निगडीत असलेल्या वास्तुरचना
ह्या नेहमीच माझ्या चित्रांचा केंद्रबिंदू राहील्या आहेत.आपण सहज
म्हणून कुठल्याही वस्तूकडे पाहिल्यास, पहिल्याच दृष्टीक्षेपात ती
वस्तू किंवा परिस्थीती एखाद्या 'नजरेतून' कशी पाहिली जाते हे
दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याबरोबरच त्या वस्तुच्या
अनुषंगाने मनात आलेले संबद्ध आणि बरेचदा असंबद्ध विचारही
रंगवण्याचा माझा प्रयत्न असतो.त्यामुळे मी काढलेल्या कुठल्याही
चित्रामध्ये केवळ त्या वस्तूचं भौतिक अस्तित्वच नव्हे तर त्याही
पलीकडे घेऊन जाणार वास्तव दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो;ज्यालाच
इंग्रजीत आपण
metaphysical reality असं म्हणतो."
तुषारचा हा विचार तिच्या चित्रांकडे
बारकाईने पाहिल्यास नक्कीच जाणवतो!