Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 


तुमचं नाटक/कार्यक्रम इथे ?
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Marathi Show Aamachi Gani Online,SMS booking | Maanbindu.com

Aamachi Gani

कार्यक्रमाचे ह्या पुढील प्रयोग : येत्या सात दिवसात या कार्यक्रमाचे कुठेही प्रयोग नाहीत. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या.

संपर्क : ९९६०२ ८१०५५

Aamachi Gani poster
 

Online booking of Aamachi Gani

येत्या सात दिवसात या कार्यक्रमाचे कुठेही प्रयोग नसल्याने ऑनलाईन बुकींग उपलब्ध नाही. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या!

 

Introduction to Aamachi Gani


नवीन संगीतकारांची मेलोडीयस गाणी रसिकांपर्य़ंत पोहोचवण्याचा उद्दीष्टाने मानबिंदू म्युझिक तर्फे "आमची गाणी - मेलोडीयस गाण्यांची अविस्मरणीय ट्रीट" या कार्यक्रमाची निर्मीती करण्यात आली आहे. संगीतकार अभिजीत राणे, प्रशांत कदम आणि केदार विभास या संगीतकारांचे नवीन मराठी अल्बम्स मानबिंदू म्युझिकतर्फे गेल्या काही वर्षात प्रकाशित करण्यात आले होते आणि याच अल्बम्समधल्या अत्यंत निवडक मेलोडीयस गाण्यांचे सादरीकरण "आमची गाणी"या कार्यक्रमातून होणार आहे.

गाण्यांचा कार्यक्रम म्हटलं की सहसा तिथे नाच हा असतोच. पण टीपीकल काही न करता नाविन्य जपण्याची परंपरा मानबिंदूने आपल्या कार्यक्रमातही कायम राखली आहे. म्हणून नाचाऐवजी डोळयांच पारणं फ़ेडणारं सँड ऍनिमेशन या कार्यक्रमात आपल्याला पहाता येणार आहे.विवेक पाटील या तरुण कलाकाराने हे सॅंड ऍनिमेशन्स केले असून नुकतीच विवेकची निवड कलर्स वाहिनी वर "इंडिया गॉट टॅलेन्ट"या कार्यक्रमासाठीही झाली आहे.

"आमची गाणीया कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे कार्यक्रमाच सूत्र संचालन आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे. निवेदना बरोबरच ती तिच्या काही निवडक कविता देखील या कार्यक्रमात सादर करणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी निवडक रसिकांना आपल्या मनातले प्रश्न देखील स्पृहाला विचारायची संधी मिळणार आहे.

 

Speciality of Vichha majhi puri kara

या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही "आयटम सॉंग्स" या कार्यक्रमात सादर केली जाणार नाहीत. आयटम सॉंग्स ऐकताना स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पहाण्याचा एक दृष्टीकोन  नकळत ऐकणा-याच्या मनावर होत असतो आणि त्याने समाजातील विकृतीला खतपाणी मिळत असतं. हे थांबवण्यासाठी संगीत क्षेत्रातील व्यक्तींनीच पुढाकार घेऊन आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. मानबिंदू म्युझिकने या बाबतीत पहिलं पाऊल पुढे केलं असून या कार्यक्रमात आयटम सॉंग्स सादर न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


या कार्यक्रमाचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीचा १५% भाग हा "राजयोग फाऊंडेशन" या आर्थिक दुष्ट्या निम्न स्तरातील लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवणा-या सेवाभावी संस्थेस मदत म्हणून देण्यात येणार आहे.


 

Abhipray on Aamachi Gani


 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker