Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 


तुमचं नाटक/कार्यक्रम इथे ?
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Marathi Show Ek Paus Kadhicha Online,SMS booking | Maanbindu.com

Ek Paus Kadhicha

 
Share Buzz

कार्यक्रमाचे ह्या पुढील प्रयोग : येत्या सात दिवसात या कार्यक्रमाचे कुठेही प्रयोग नाहीत. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या.

 
Ek Paus Kadhicha poster

Star cast of Ek Paus Kadhicha

निर्मिती: सुरभि

निर्माता : आलाप भागवत

संहिता आणि संकल्पना : स्पृहा जोशी

संगीत: मयुरेश माडगांवकर

संगीत संयोजन : आनंद सहस्त्रबुद्धे, मिथिलेश पाटणकर

गायक : आलाप भागवत, यशोदा बुधकर

निवेदन : स्पृहा जोशी, सुबोध खानोलकर

काव्य : मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, विक्रम भागवत, सदानंद डबीर, योगेश जोशी, ना.धो महानोर, तेजस रानडे आणि शंकर वैद्य

 

Introduction to Ek Paus Kadhicha

पाऊस आणि कविता यांचं नातं तसं पूर्वीपासूनचच. पण हे नातं एका अगदी वेगळया स्वरूपात उलगडून दाखवलय एक पाऊस कधीचा या सांगितीक मैफीलीत! एक पाऊस कधीचा या मैफीलीत एक वेडाखुळा..बेफिकीर,स्वच्छंदी..पण तितकाच मनस्वी,हळवा पाऊस त्याच्यासारख्याच हळव्या, बेधुंद कवितेच्या प्रेमात पडतो..आणि आकाराला येते त्यांची एक अनोखी प्रेमकहाणी! 


पाऊस (सुबोध खानोलकर) आणि कविता (स्पृहा जोशी) यांच्यातल्या तरल, मनस्वी संवादाने सजलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या सहजीवनात येणा-या प्रत्येक टप्प्यावर आधारीत  १८ गाणी आहेत. त्यांच्यातला बंध, फुलत गेलेलं नातं आणि जगावेगळा प्रवास..आणि त्याबरोबरच संगीताची साथ एक पाऊस कधीचा या अनोख्या मैफीलीत आपल्याला अनुभवायला मिळते!  
 

Speciality of Vichha majhi puri kara

या कार्यक्रमाची संकल्पना आणि मांडणी हेच खरतर या कार्यक्रमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल! कविता आणि पाऊस यांचं नातं सांगत सांगत नवीन गाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आगळावेगळा आणि म्हणूनच स्पृहणीय आहे!

एक लफडं न विसरता येणारं या व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट संगीत आणि पार्श्वसंगीताचा राज्य नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळालेल्या मयुरेश माडगांवकर याचंच सुमधूर संगीत या कार्यक्रमाला लाभलं आहे. आलाप भागवत आणि यशोदा बुधकर यांच्या सुरेल गायकीने सुंदर वातावरणनिर्मीती होते. कार्यक्रमाची सूत्र सांभाळताना स्पृहा जोशी आणि सुबोध खानोलकर केलेला संयत अभिनय कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवतो.


 

Online booking of Viccha Majhi puri kara

येत्या सात दिवसात या कार्यक्रमाचे कुठेही प्रयोग नसल्याने ऑनलाईन बुकींग उपलब्ध नाही. कृपया आपल्या सवडीनुसार मानबिंदूला पुन्हा एकदा भेट द्या!

 

एक पाऊस कधीचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर बोरीवली येथील नाट्यरसिक जयंत पोंक्षे यांनी व्यक्त केलेली मनस्वी प्रतिक्रीया


पाऊस हा खरतर कवींचा सगळ्यात आवडता ऋतू. म्हणूनच पावसावर अनेक कविता आजपर्यंत मराठी साहित्यात झाल्या आहेत आणि या पुढेही होतील. साहित्यात कविता आणि पावसाचे हे नाते अगदी साहित्याच्या आरंभापासूनचे. या नात्याची आपल्याला पहिली ओळख होते ती लहानपणी ऐकलेल्या बडबडगीतातून, "ये रे ये रे पावसा"  पासूनच. पुढे "भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल काय " चा टप्पा ओलांडत तारुण्याच्या वाटेवर आपणही जलधारांनी अंगे भिजल्या "ऐश्या ललनांची" स्वप्ने पाहत मोठे होतो. पावसाचे असे अनेक आविष्कार आपण कवितेतून अनुभवलेले असतात. आपल्यासाठी तरी कविता... संपूर्ण वाचा. 

Abhipray on Vichha Mazi puri kara


 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker