Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 
तुमचं नाव इथे?
 
 
 
 
 
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Savani Ravindra - Pt. Hridaynath Mangeshkar's co-artist
 
 

सावनी रविंद्र [ पं ह्र्दयनाथ मंगेशकरांची सहगायिका]
Savani Ravindra : http://savani.maanbindu.com 

  SocialTwist Tell-a-Friend
संगीताचा समृध्द वारसा असलेल्या कुटुंबात सावनीचा जन्म झाला. शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता असलेले तिचे वडील डॉ. रविंद्र घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकातील गायिका अभिनेत्री वंदना घांगुर्डे ह्या मात्यापित्यांकदून संगीताचे पाठ घेतच तिचे बालपण स्वरमय वातावरणात गेले.आई वडीलच संचालक असलेल्या 'नादब्रम्ह परिवार' ह्या संस्थेच्या 'सं. कट्यार काळजात घुसली' ह्या नाटकात तीने छोट्या सदाशीवची भूमिकाही तिने केली.

वडील डॉ. रविंद्र  घांगुर्डे यांच्याकडून विविध रागरागिण्यांची ओळख करून घेतानाच सावनी नाट्यसंगीत आणि सुगम संगीतही गाऊ लागली. वयाच्या ८ व्या वर्षापासून तिने मराठी सुगम संगीताचे शिक्षण सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पं. यशवंत देव यांच्याकडून घेण्यास सुरूवात केली. नादब्रम्ह परिवाराने आयोजित केलेल्या केलेल्या श्री यशंवत देव यांच्या अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी सादर केलेल्या 'देवगाणी' या कार्यक्रमात श्रीमती आशा भोसले यांच्या उपस्थितीत गायन करण्याची संधी तिला मिळाली. या कार्यक्रमातील तिचे गायन ऐकून महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी तिची निवड भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ऎ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणा-या महाराष्ट्राच्या संघात केली. १४ नोव्हेंबर २००२ रोजी सावनीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. याप्रसंगी यशंवत देवांनी रचलेल्य़ा गीताने आणि सावनीच्या स्वरांनी अवघे राष्ट्रपती भवन भारावून गेले होते! 

मध्यंतरी फ़र्ग्युसन महाविद्यातर्फ़े काही निवडक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना युरोपमध्ये पाठवण्यात आले. त्या समूहामध्ये देखील सावनीचा समावेश होता. तिथेही तिने तिच्या गाण्यांचे कार्यक्रम सादर करून तेथील प्रेक्षकांची वाहवा मिळवली!

ह्या दरम्यान तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये बालकलाकारांना देण्यात येणारा शाहू मोडक पुरस्कार, मोरया फ़ाऊंडेशन तर्फ़े मोरया गोसावी पुरस्कार आणि रतिलाल भावसार पुरस्कार ह्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

सध्या तिच्या स्वतच्या: 'सूर आनंदघन' ह्या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरचेवर होत असतात. महाराष्ट्राबाहेरही भुवनेश्वर, दिल्ली, गुजरात, बॅंगलोर, ओरिसा येथे तिने स्वत:चे कार्यक्रम सादर केले आहेत. त्याबरोबर पं. यशवंत देव ह्यांच्या देवगाणी ह्या कार्यक्रमात आणि इतर कार्यक्रमात ज्येष्ठ गायक अरुण दाते, पं. सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रविंद्र जैन, उत्तरा केळकर, श्रीधर फडके यांच्याबरोबरही ती गायनाचे कार्यक्रम सादर करते.

शास्त्रीय संगीतात 'विशारद' असणा-या सावनीची ही वाटचाल चालू असतानाच आयुष्यात ख-या अर्थाने  'मानबिंदू'  ठरावा असा एक क्षण तिच्या जीवनात आला आणि तो म्हणजे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक भावगंधर्व पं.हृदयनाथ मंगेशकर  ह्यांनी त्यांच्या 'भावसरगम'  ह्या कार्यक्रमात सहगायिका म्हणून तिला गायला दिलेली संधी!

ही संधी तिला कशी काय मिळाली हा प्रश्न तिला गप्पांच्या ओघात विचारताच तिचे पाणीदार डोळे अधिकच लकाकून जातात आणि त्या आठवणीतच रमून जाताना ती म्हणते, "साधारणत: दोन एक वर्षापूर्वींची गोष्ट आहे. ह्र्दयनाथजी पुण्यात काही कामानिमीत्त आले असताना आमच्या घरी आले होते. तेंव्हा सलील चौधरींच्या गाण्यांविषयी आमच्या घरी चर्चा रंगली होती. सहज म्हणून तातनी (वडीलांनी)  माझं रेकॉर्ड केलेलं सलील चौधरींचच 'ओ सजना'  हे गाणं त्यांना ऐकवल. गाणं ऐकल्यावर   ह्र्दयनाथजीनी विचारलं, "छान आहे, पण हे कुणी गायलयं?" त्यावर तात उत्तरले, "सावनीने..". ह्र्दयनाथजीना पहिल्यांदा ते खरच वाटलं नाही, पण नंतर त्यांनीही खूप कौतूक केलं. पण हा विषय तिथेच संपला. त्यानंतर नादब्रम्हच्या वार्षिक उत्सवात कार्यक्रम सादर करण्यासाठी ह्र्दयनाथजींना आम्ही आमंत्रण दिलं होतं. तेंव्हा ह्र्दयनाथजींनीच सांगितलं, "ठिक आहे करूया कार्यक्रम; पण ह्यावेळी सावनीदेखील माझ्याबरोबर गाईल.."  

 तिथपासून त्यांच्याबरोबरच्या कार्यक्रमांचा सावनीचा जो प्रवास चालू झाला तो आजतागायत चालूच आहे.सध्या पं.हृदयनाथ मंगेशकरां बरोबर 'भावसरगम' चे तिने ५० हून अधिक कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्याबरोबरच  'अमृताचा घनु' आणि 'शिवकल्याण राजा' या ह्र्दयनाथजींच्या कार्यक्रमातही ती गाते.

 
Share
सावनीने तिच्या मंजुळ आवाजात गायलेली काही निवडक गाणी तुमच्या भेटीस आणत आहोत. तुम्हाला ती वारंवार ऐकावीशी वाटतील ह्याची आम्हाला खात्री आहे

मराठी गाणी

हिंदी गाणी


[ भावगंधर्व पं, ह्र्दयनाथ मंगेशकर यांच्यासह ]

तरुण आहे रात्र अजूनी

जीवलगा राहीले दूर घर माझे

   
   

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मार
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
[ एखादा शब्द अडतोय? किबोर्ड पहा ]
  मराठीत लिहा (F12 - मराठी-इंग्रजीत बदलण्यासाठी)
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  Prasad Ghadi  |  
  namaskar Mi Prasad, 'Tarun ahe ratra ajuni' he maz khup awadat song. tuhmi khup chan mhatal ahe. Tumchya barobar Voilin var Shree Ramakant Paranjape he maze School che sir. tyna pahun khup aanad zala. Tumhi ashich chan chan gani mahanat raha...tumhala manapasun subheccha...
[ May 21, 2009 6:59 AM ]

  sameer  |  
  मधुर......!!!!!
[ Jan 17, 2009 2:20 AM ]

  Deepak Pathak  |  
  उदयोन्मूख कलाकाराना प्रोत्साहन देण्याची कल्पना 'मानबिंदू' च्या रुपाने सकाराल्याबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन! आई-वडिलांचा सांगितीक वारसा यशस्वीपणे पुढे नेणारया सवानिला उत्कृष्ट आवाजाची देणगी लाभली आहे. अत्यन्त परिश्रमाने अणि मनापासून संगीताची साधना करत, तीची यशस्वी वाटचाल सुरु आहे. नावाला साजेल असे 'सा' पासून 'नी' पर्यंत 'सप्त्सूरांची' सुरेल उधलन करणारया सवानिला तिच्या सुनिश्चित उज्जवल भावितव्यासाठी मनापासून शुभेच्छा!!! - दीपक
[ Mar 18, 2009 1:17 PM ]

  Ganesh Suradkar  |  
  hi tumchi side khup chan aahe,ya goshtine aanand zala aajun tari marathi aahe.
[ Mar 18, 2009 1:16 PM ]

  anil  |  
  हार्दीक अभिनन्दन व शुभेच्ह्आ
[ Mar 18, 2009 1:16 PM ]

 
 

अभिप्राय लिहा । संपर्क  । अटी आणि शर्ती । मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप

Connect with us on :  Facebook | Orkut | Twitter | Youtube

@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer
@ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission  Protected by Copyscape Online Copyright Checker