|
|
Savani Ravindra|Listen to Savani Ravindra's songs|watch Savani Ravindra videos
 |
 |
 |
 |
 |
|
|
|
सावनी रविंद्र
[ पं ह्र्दयनाथ मंगेशकरांची सहगायिका]
Savani Ravindra :
http://savani.maanbindu.com |
|
संगीताचा समृध्द वारसा असलेल्या कुटुंबात
सावनीचा जन्म झाला. शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता असलेले तिचे वडील डॉ. रविंद्र
घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकातील गायिका अभिनेत्री वंदना घांगुर्डे ह्या
मात्यापित्यांकदून संगीताचे पाठ घेतच तिचे बालपण स्वरमय वातावरणात गेले.आई वडीलच
संचालक असलेल्या
'नादब्रम्ह परिवार' ह्या संस्थेच्या 'सं. कट्यार काळजात घुसली' ह्या
नाटकात तीने छोट्या सदाशीवची भूमिकाही
तिने केली.सध्या
गाण्याच्या विविध कार्यक्रमातून तिने
सात-समुद्रापार देखील आपला ठसा उमटवलाय. तिच्या
सुमधुर आवाजामुळे रसिकांकडून तिला नेहमीच वरचा
`सा` व `नि` मिळत आलाय! |
|
|
|
 |
 |
 |
 |
|
 |
|
 |
 |
 |
 |
 |
 |
वडील डॉ.
रविंद्र घांगुर्डे यांच्याकडून विविध रागरागिण्यांची ओळख
करून घेतानाच सावनी नाट्यसंगीत आणि सुगम संगीतही गाऊ लागली.
वयाच्या ८ व्या
वर्षापासून तिने मराठी सुगम संगीताचे शिक्षण सुप्रसिद्ध संगीत
दिग्दर्शक पं. यशवंत देव
यांच्याकडून घेण्यास सुरूवात केली. नादब्रम्ह
परिवाराने आयोजित केलेल्या केलेल्या श्री यशंवत देव यांच्या अमृत
महोत्सवी सत्कार प्रसंगी सादर केलेल्या 'देवगाणी' या कार्यक्रमात श्रीमती आशा भोसले
यांच्या उपस्थितीत गायन करण्याची संधी तिला मिळाली. या
कार्यक्रमातील तिचे गायन ऐकून महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक
मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी तिची निवड भारताचे
माजी राष्ट्रपती
डॉ. ऎ.पी.जे. अब्दुल कलाम
यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणा-या महाराष्ट्राच्या संघात केली.
१४ नोव्हेंबर २००२ रोजी सावनीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची
भेट घेतली. याप्रसंगी यशंवत देवांनी रचलेल्य़ा गीताने आणि
सावनीच्या स्वरांनी अवघे राष्ट्रपती भवन भारावून गेले होते!
मध्यंतरी
फ़र्ग्युसन महाविद्यातर्फ़े काही निवडक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना
युरोपमध्ये पाठवण्यात आले. त्या समूहामध्ये देखील सावनीचा समावेश
होता. तिथेही तिने तिच्या गाण्यांचे कार्यक्रम सादर करून तेथील
प्रेक्षकांची वाहवा मिळवली!
'गझल का सफर',
'ब्लॅक ऍन्ड व्हाईट',
'गुलझार - बात पश्मिने कि'
यासारख्या अनेक कार्यक्रमातून तिन आपल्या स्वरांची जादू पसरवली
आहे. ब्लॅक ऍन्ड व्हाईट या कार्यक्रमाचे प्रयोग
अमेरिका, लंडन, दुबई, अबुधाबी
इथंही झाले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अजब
लग्नाची गजब गोष्ट' आणि 'भैरू
पैलवान कि जय' या चित्रपटांसाठी
तिन पार्श्वगायन केलं आहे. याशिवाय 'ती
रात्र', 'मानसन्मान',
'दांडगी
मुलं',
'पाच नार एक बेजार'
या चित्रपटांसाठीही तिन पार्श्वगायन केलं आहे. संगीताचे
कार्यक्रम, चित्रपट या बरोबरच तिचे 'आशाये'
हा हिंदी, तर 'अजूनही' आणि 'कॅनव्हास'
हे दोन मराठी अल्बम रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. सध्या ती
रवि
दाते यांच्याकड़े ग़ज़लच शिक्षण घेत आहे, तर
पं. पंढरीनाथ
कोल्हापुरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धड़े घेत आहे.
ह्या दरम्यान
तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये
बालकलाकारांना देण्यात येणारा शाहू मोडक पुरस्कार, मोरया
फ़ाऊंडेशन तर्फ़े मोरया गोसावी पुरस्कार आणि रतिलाल भावसार
पुरस्कार ह्या पुरस्कारांचा
त्यात समावेश आहे.
सध्या तिच्या
स्वतच्या: 'सूर आनंदघन'
ह्या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरचेवर होत
असतात. महाराष्ट्राबाहेरही भुवनेश्वर, दिल्ली, गुजरात, बॅंगलोर,
ओरिसा येथे तिने स्वत:चे कार्यक्रम सादर केले आहेत.
त्याबरोबर पं. यशवंत देव
ह्यांच्या देवगाणी ह्या
कार्यक्रमात आणि
इतर कार्यक्रमात ज्येष्ठ गायक
अरुण दाते, पं. सुरेश वाडकर,
रवींद्र साठे,
रविंद्र जैन, उत्तरा केळकर, श्रीधर फडके
यांच्याबरोबरही
ती गायनाचे कार्यक्रम सादर करते.
|
|
 |
 |
 |
 |
|
 |
 |
 |
 |
 |
 |
शास्त्रीय संगीतात 'विशारद'
असणा-या सावनीची ही वाटचाल चालू असतानाच आयुष्यात
ख-या अर्थाने 'मानबिंदू'
ठरावा असा एक क्षण तिच्या जीवनात आला आणि तो म्हणजे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक
भावगंधर्व पं.हृदयनाथ
मंगेशकर
ह्यांनी त्यांच्या 'भावसरगम'
ह्या कार्यक्रमात
सहगायिका म्हणून तिला गायला दिलेली संधी!
ही संधी तिला कशी काय मिळाली हा प्रश्न तिला गप्पांच्या ओघात
विचारताच तिचे पाणीदार डोळे अधिकच लकाकून
जातात आणि त्या आठवणीतच रमून
जाताना ती म्हणते,
"साधारणत: दोन एक वर्षापूर्वींची गोष्ट आहे.
ह्र्दयनाथजी पुण्यात काही कामानिमीत्त आले असताना आमच्या घरी आले
होते. तेंव्हा सलील चौधरींच्या गाण्यांविषयी
आमच्या घरी चर्चा रंगली होती.
सहज म्हणून तातनी
(वडीलांनी) माझं रेकॉर्ड केलेलं
सलील चौधरींचच 'ओ सजना' हे गाणं त्यांना ऐकवल. गाणं ऐकल्यावर ह्र्दयनाथजीनी
विचारलं, "छान आहे, पण
हे कुणी गायलयं?"
त्यावर तात उत्तरले, "सावनीने..". ह्र्दयनाथजीना
पहिल्यांदा
ते खरच वाटलं नाही, पण नंतर त्यांनीही खूप कौतूक केलं.
पण हा विषय तिथेच संपला.
त्यानंतर नादब्रम्हच्या वार्षिक
उत्सवात कार्यक्रम सादर
करण्यासाठी ह्र्दयनाथजींना आम्ही आमंत्रण दिलं होतं. तेंव्हा ह्र्दयनाथजींनीच
सांगितलं, "ठिक आहे करूया कार्यक्रम; पण ह्यावेळी सावनीदेखील
माझ्याबरोबर गाईल.."
तिथपासून त्यांच्याबरोबरच्या कार्यक्रमांचा
सावनीचा जो प्रवास चालू झाला तो आजतागायत चालूच आहे.
सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत, यापैकी कोणता प्रकार जास्त
आव्हानात्मक वाटतो, या प्रश्नांवर ती लगेच म्हणते,"हरेक
प्रकारच्या संगीतामधून मिळणारा आनंद सर्वस्वी वेगळा आहे. सुगम
संगीतामध्ये तुम्ही शब्दांना अधिक महत्व देता, तर शास्त्रीय
संगीतामध्ये सुरांना. शास्त्रीय संगीतातून मनाला मिळणाऱ्या
शांततेची तुलनाच करता येणार नाही. सध्या माझा भर सुगम संगीताच्या
कार्यक्रमांवर असला तरी, खरा कस लागतो तो शास्त्रीय संगीतातच.
त्यासाठीच तर, त्याचा बेस असणारा, `भैरव ते भैरवी` सारखा
कार्यक्रम मी आवर्जून करते."
कोणत्याही प्रश्नाला हसत-खेळत आणि दिलखुलास उत्तर देण, हा सावनीच
विशेष गुण आहे, असंच म्हणावं लागेल. त्यामुळेच तर
लतादीदींकडून
'गुणी बाळ'
अशी शाबासकी मिळवणारी सावनी आणखी ५ ते १० वर्षांनी स्वताला कुठे
पाहते, असा प्रश्न तिला विचारला. क्षणाचाही विलंब न लावता ती
म्हणते, "एक चांगली पार्श्वगायिका
होण्याच स्वप्न आहे. त्यासाठी कष्ट आणि मेहनतीची तयारी आहेच.
चित्रपट, अल्बम, लाइव्ह शो अशा प्रत्येक प्रकारात आपली ओळख
निर्माण व्हावी असं निश्चित वाटतं. त्यासाठी मला आशाताईंच एक
वाक्य नेहमी प्रेरणा देत. त्या म्हणतात, आपल्याला प्रत्येक
व्यक्तिरेखेप्रमाणे आवाज काढता आला पाहिजे. त्याच वेळी आपल्या
आवाजाची ओळखही राहिली पाहिजे. त्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न
करणं, हेच माझं काम आहे."
|
|
 |
 |
 |
 |
|
 |
|
 |
|
 |
|