Advertisement
पण फक्त मराठीच नव्हे तर हिंदी, बंगाली, आसामी, गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि ओरिया अशा अनेक भाषांत त्याच्या सुरील्या आवाजाची जादू रसिकांवर पसरली आहे. सध्याच्या नविन पिढीवरच नाही, तर जुन्या पिढीच्या ओठी पण हल्ली त्याचीच गाणी आढळत आहेत
दूरदर्शनच्या `राग एक रंग अनेक` या कार्यक्रमाच निवेदन त्याने केलय. त्याशिवाय सध्या तो `मी मराठी` वरील प्रसिद्ध ताक धिना धिन या कार्यक्रमाचंही सूत्रसंचालन करतोय. राजेंद्र तलक दिग्दर्शित `सावली` या मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिकाही केली होती. त्यामुळेच त्याच वर्णन `व्हर्सटाइल` या एकाच शब्दात करता येऊ शकेल.
"सध्या मराठी संगीत वेगळ्या वाटेने जातय, अनेक नवनवीन प्रयोग इथे केले जात आहेत. एकंदरीतच आजच्या मराठी संगीताबद्दल तुला काय वाटतं? ""हो नक्कीच! मराठी संगीत खूप बदलयतं पण तरीही त्याच्या दर्जा तोच आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सहसा जुनी गाणीच म्हटली जायची. पूर्वीच्या पिढीला बाबूजींच्या गाण्याचा जसा एक नॉस्टेल्जिया होता, तसं आता नवीन मराठी गाण्यांच्या बाबतीत घडू लागलय! फक्त नवीन मराठी गाण्यांचे कार्यक्रमही होतात आणि ते हाऊसफुल्लही असतात. अगदी हल्लीचं उदाहरण सांगायचं झाल्यास 'तिच्या डोळ्यातील गाव' हा माझा नवीन अल्बम नुकताच रिलीज झाला आणि पहिल्याच आठवड्यात त्याच्या सुमारे ३००० सीडीज विकल्याही गेल्या. त्यामुळे आत्ताचं संगीत हे नक्कीच लोकांना आवडतय असं मी म्हणेन आणि या सगळ्याच श्रेय फक्त मराठी मध्ये काम करणा-या आणि त्यात मोलाची भर घालणा-या सगळ्याच नवीन गायकांच आणि संगीतकारांच आहे असही मला वाटतं"
"आत्तापर्यंतच्या तुझ्या वाटचालीमध्ये Turning Point कुठला आहे असं तुला वाटतं?" "माझे गुरू, श्री. सुरेश वाडकर यांच्याकडे मी १९९१ पासून गाणं शिकायला सुरूवात केली आणि अजूनही शिकतोय. त्यांच्याकडे गाणं शिकायला जाणं हा माझ्या आयुष्यातला Turning Point आहे असं मला वाटतं.."
"बरं असं सांग, साधारणत: सगळ्याच यशस्वी लोकांच्या कारकिर्दीत निराशेचे काही क्षण येतात, तुझ्या आयुष्यात असे काही क्षण आलेत का आणि आले असल्यास तू त्यांना कसा सामोरा गेलास?" [..असं म्हणताच कॉफी ठेवलेल्या लाकडी टेबलाला स्पर्श करत स्वप्नील चट्कन म्हणतो ] "Touch Wood !! पण माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यात असे क्षण नाही आले की ज्यावेळेला मी खूप 'Depressed' वगैरे होतो... पण तरीही अगदीच सांगायचं झाल्यास एक क्षण असा होता ज्यावेळी मला खूप वाईट वाटलं. तो असा की २००३ आणि २००४ साली माझ्या अल्बम्सना झी गौरव पुरस्कार मिळाले होते आणि त्यानंतरच्या वर्षी माझा राधा ही बावरी या नुकत्याच रिलीज झालेल्या अल्बमला साधं नॉमिनेशनही नव्हतं मिळालं. ते गाणं माझ्या खूप जवळचं होतं, त्यामुळे खूप वाईट वाटत होतं! पण त्यानंतर ते गाणं किती लोकप्रिय झालं हे सगळ्यांना माहितच आहे. त्यामुळे त्याचं समाधान मला खूप जास्त आहे! मेहनत सार्थकी लागल्या सारखं वाटतं. शेवटी रसिकांच्या पसंतीस उतरणं हीच खरी सुखावून जाणारी गोष्ट आहे! "
आत्तापर्यंतच्या स्वप्निलच्या गाण्यांमुळे आणि त्यांना मिळणा-या प्रतिसादामुळे तो रसिकांच्या पसंतीस स्वप्नील उतरलाय ही गोष्ट तर निर्विवाद आहेच, पण यापुढेही तो अशीच गाणी गाऊन त्याच्यावर निस्सिम प्रेम करणा-या त्याच्या सगळ्या फॅन्सना असंच मोहवत राहील अशी अपेक्षा करूया!
गीत: मंद हालणारी झाडी, अल्बम : झुला, संगीत : अभिजीत राणे
गीत : काळ देहासी आला खाऊ, संगीत : श्रीनीवास खळे