
Musicology : Hindi Music album Sung by Tejrup Kulkarni, Vaishali Samant. Lyrics & Composed by : Tejrup Kulkarni
म्युझिकॉलॉजी - हिंदी अल्बम । गायन : वैशाली सामंत, तेजरुप कुलकर्णी । गीत, संगीतकार : तेजरुप कुलकर्णी
Credits
श्रेयनामावली
- Composed by: Tejrup Kulkarni
- संगीतकार : तेजरुप कुलकर्णी
- Sung by: Tejrup Kulkarni, Vaishali Samant
- गायन : वैशाली सामंत, तेजरुप कुलकर्णी
- Lyrics by: Tejrup Kulkarni
- गीतकार : तेजरुप कुलकर्णी
- Music Arranged by: Vaibhav Kulkarni, Jay Kumar Guru
- संगीत संयोजन: वैभव कुलकर्णी, जय कुमार गुरू
- निर्माता : अमित कुलकर्णी
- Produced by: Amit Kulkarni
- प्रकाशन संस्था: मानबिंदू म्युझिक (सर्व हक्क सुरक्षित)
- Released by: Maanbindu Music (All rights reserved)
We at Maanbindu Music feel really exicited to present our first sensational hindi music album Musicology featuring young & aspiring pop artist Tejrup Kulkarni. This album contains 9 sizzling numbers that will surely touch your heart. Musicology also features two special songs by queen of pop songs Vaishali Samant out of which one is solo and other is a duet.
The duet Geet Gate Rahe Hum requires a special mention here as it has come out just brilliant. Its a blend of sweet sounding Vaishali Samant and rusty rock voice of Tejrup Kulkarni. Do listen to it from following list. Another distinguishing feauture of this album is its brilliant lyrics (hard to find these days!) for all 9 songs. Tejrup Kulkarni has taken great efforts in lyrics writing and in compositions and the same is evident when you listen to all songs from Musicology.
When we asked Tejrup to speak about Musicolgy he said,"Musicology is a dream! Dream of a person who wants to make music that is timeless, global and iconic. People ask me how did you think of name Musicology? The story is little funny. A general question asked to young people of my age is, what you do? To which answer generally comes as BSC In mathematics, or doing something in microbiology, zoology, geology etc. I decided that this is my art and so it will be called as MUSICOLOGY".(he smiles)
Then he adds,"My Music is made to touch the heart of every person around. It will move him internally and then will help him finding world as a better place. Finding new improved perspective about living life. I just cant wait where I could go live and entertain more and more people and see them smiling and being entertained. This is my first step towards that dream.. that journey. Let's hope for the best" Amen,say we!
हिंदी पॉप संगीताच्या क्षितीजावर चमकण्याची क्षमता असणारा तरुण मराठी गायक, गीतकार आणि संगीतकार तेजरुप कुलकर्णी याचा म्युझिकॉलॉजी हा पहिला हिंदी अल्बम मानबिंदू म्युझिक तर्फे तुमच्यासमोर आणताना आम्हाला खूप आनंद होतोय. तेजरूप कुलकर्णी बरोबरच मराठी पॉप विश्वाची सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिने देखील या अल्बममध्ये दोन गाणी गायली असून त्यातलं एक गाणं सिंगल असून दुसरं ड्युएट आहे.
"गीत गाते रहे हम" हे गाणं ड्युएट गाणं खूप अप्रतिम झालय आणि म्हणूनच गाण्याचा इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो. कानाला अतिशय गोड वाटणारा वैशालीचा आवाज आणि तेजरुप कुलकर्णीचा रॉक स्टाईलचा आवाज हा मिलाफ खासच जमून आलाय. खाली असलेल्या विभागामध्ये हे गाणं जरुर ऐका. या अल्बमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्याच गाण्यांसाठी लिहिले गेलेले अप्रतिम शब्द (जे हिंदी गाण्यांमध्ये हल्ली अभावानेच आढळतात)! प्रत्येक गाणं लिहिताना, ते चालीत बांधताना तेजरूप कुलकर्णीने विशेष मेहनत घेतली आहे आणि ही मेहनत प्रत्येक गाणं ऐकताना आपल्याला जाणवत रहाते.
तेजरुपला या अल्बमबद्दल विचारलं असता तो म्हणतो, " म्युझिकॉलॉजी हे माझं स्वप्न आहे. माझं संगीत कालातीत, जागतिक दर्जाचं आणि स्वत:चा ठसा उमटवणारं असावं असं मला वाटतं आणि त्याप्रमाणे ते बनविण्याचा माझा प्रयत्न असतो. म्युझिकॉलॉजी हे नाव कसं सुचलं याचीही एक वेगळी गम्मत आहे. साधारणत: माझ्या वयाच्या सगळ्याच मुलांना हा प्रश्न विचारला जातो की तू काय करतोस? त्यावर सहसा तुम्हाला, मी मायक्रोबायोलॉज, झुऑलॉजी किंवा जिऑलॉजी मध्ये बी. एस. सी करतोय असं काहीतरी उत्तर येतं. मला वाटलं की म्युझिक हे माझं क्षेत्र आहे, त्यात मी वेगवेगळे प्रयोग करतो. त्या अनुषंगाने माझ्या अल्बमचं नाव म्युझिकॉलॉजी असच हवं असं मला वाटतं". आणि यावर तो हसतो.
त्यापुढे तो म्हणतो, "माझं संगीत हे प्रत्येकाच्या हृदयाला साद घालेल असं आहे. ते प्रत्येकाला विचार करायला लावेल आणि आपल्याला वाटतं त्यापेक्षा जग हे अधिक सुंदर आहे याची जाणीव ते करून देईल. मला तर कधी एकदा स्टेजवर जाऊन परफॉर्म करतोय आणि माझ्या गाण्यांनी लोकांच मनोरंजन करून त्यांना आनंद देतोय असं झालय. ते माझं स्वप्न आहे आणि हा अल्बम ही त्या स्वप्नाची... त्या प्रवासाची.. पहिली पायरी आहे."
या प्रवासासाठी तेजरूप कुलकर्णी यास आपण सगळे अनेक शुभेच्छा देऊया!
Tejrup Kulkarni has penned down the journey of album Musicology. Here it is, in his own words,
"I started my journey as a guitarist. After just 3 months of learning I could do it pretty well. In fact so well that I had an offer from local marathi music group to play guitar for their 3 days long show. The show featured many songs from the legendary hindi marathi playback singers. The practice sessions for the show lasted for about 6 months.That was a great learning experience for me nonetheless that also built my base as a musician. Soon I had another offer from other group 'Vedh Yuva pratishthan' to take the responsibility of music department of their shows. I got a chance to become a music arranger then. Eventually I ended up working a lot in that field. I also assisted Mr.Ashok patkiji and many Reknowned singers later on.
In 2009 With the increased demand of my music services I started my own studio named "Creative Studios". Creative studios was a success too. It went well for 2 years,2009 to 2011 and did many important projects for my city Akola. As time progressed, in 2011, I Started feeling myself being typecasted in the similar projects of recording and similar live shows . So I decided that I should create a platform which gives me more liberty to experiment with music.
I started exploring myself. I started thinking how much can I push myself? Can I write concepts for songs? Can I write lyrics for songs? can I compose? can I sing ? Can I explain music arrangement ? Can I Present my music being on screen? The answer was YES! The work on Musicology began there. In May 2012 I completed 7 Original beautiful songs for Musicology and 3 superb music videos. Meanwhile I was also fortunate to meet Vaishali ji. I asked her if she could sing couple of songs in my album. She didn't say yes immediately. She called me in a recording studio after some days. She first listened to my compositions there. She liked it. She also gave her valuable suggestions for me to improve and more importantly agreed to sing for Musicology then. I was extermely happy that day. She has sung two songs in Musicology
Now as this album is released I am really happy about it. I just cant wait where i could go live and entertain more and more people and see them smiling and being entertained. Let's hope fr the best !
with all my love
Tejrup Kulkarni."
तेजरुप कुलकर्णीने "म्युझिकॉलॉजी" या अल्बमच्या निर्मीतीपर्यंतचा प्रवास स्वत:च्या शब्दात लिहिला आहे. तो लिहितो..
"मी माझ्या करीयरची सुरुवात गिटारीस्ट म्हणून केली. गिटार वाजवायला सुरूवात केल्यापासून पहिल्या ३ महिन्यातच मला गिटार वाजवणं उत्तमरीत्या जमू लागलं. माझं वाजवणं ऐकून एका स्थानिक म्युझिक ग्रूप कडून मला एका ३ दिवस चालणा-या कार्यक्रमासाठी बोलावणं आलं. या कार्यक्रमाची रंगीत तालीमच त्यांनतर जवळपास ६ महिने सुरू होती. या निमित्ताने मराठी हिंदीतल्या अनेक उत्तमोत्तम संगीतकारांची गाणी गिटारवर वाजवण्याची संधी मला मिळाली आणि एक कलाकार म्हणून माझा पाया तिथे मजबूत झाला. त्यानंतर "वेध युवा प्रतिष्ठान" या ग्रूपचं अख्ख म्युझिक डिपार्टमेंट माझ्याकडे सोपवण्यात आलं. ती माझ्यासाठी खूप मोठी जवाबदारी होती पण संगीत संयोजन शिकण्याची संधी मला तिथे मिळाली. त्यानंतर मी इतरही अनेक कार्यक्रमांसाठी संगीत संयोजन केलं. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कीं बरोबर काम करण्याची संधीही कालांतराने मला मिळाली.
मी करत असलेल्या कामाचा व्याप वाढू लागल्याने मी २००९ साली अकोल्यामध्ये क्रिएटीव्ह स्टुडीओ नावाचा एक स्टुडीओ मी सुरू केला. तो ही खूप चांगल्या रीतीने चालला. २००९ ते २०११ दरम्यान अकोला शहरातील अनेक महत्वाची कामं मी केली. पण दोन वर्षांनी मला ही कामं देखील एककल्ली वाटू लागली, त्यात तोच तोच पणा जाणवू लागला. मला संगीतात नवनवीन प्रयोग करून पहायचे होते आणि त्यासाठी एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म असण्याची आवश्यकता मला वाटू लागली.
मग मी स्वत:चा शोध घेणं सुरू केलं. मी स्वत:च्या मर्यादा कितपत ओलांडू शकतो याचा विचार मी करू लागलो. मी एखाद्या गाण्यासाठी आवश्यक संकल्पना लिहू शकेन का? गाणं लिहू शकेन का? ते संगीतबद्ध करू शकेन का? ते गाऊ शकेन का? मी त्याचं संगीत संयोजन समजावून सांगू शकेन का? मी स्वत:च संगीत कॅमे-याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू शकेन का? असे अनेक विचार मनात येऊ लागले आणि या सगळ्याचच उत्तर मनातून "हो" असं आलं. म्युझिकॉलॉजीचा प्रवास तिथून सुरू झाला. यानंतर जवळपास एका वर्षाने यातल्या एक एक पाय-या पार करत मे २०१२ पर्यंत ७ सुंदर गाणी आणि त्यातल्या गाण्यांचे ३ म्युझिक व्हिडीओज मी तयार केले. एके दिवशी माझी वैशाली सामंतजींशी भेट झाली. तेंव्हा तुम्ही माझ्या अल्बममध्ये गाऊ शकाल का असं मी त्यांना विचारलं. त्यांनी लगेच होकार नाही दिला. काही दिवसांनी मला रेकॉर्डींग स्टुडीओमध्ये बोलवून आधी त्यांनी माझ्या चाली ऐकल्या. तेंव्हा त्यांना त्या आवडल्या, त्यांनी काही महत्वाच्या सूचना देखील दिल्या आणि मग सर्वात महत्वाचं म्हणजे म्युझिकॉलॉजीमध्ये गाण्यासाठी होकार देखील दिला. मी त्या दिवशी खूप खूष होतो. त्यांची दोन गाणी या अल्बममध्ये आहेत.
आता हा अल्बम रीलीज झाल्यावर मला त्याचा खूप आनंद आहे. मी कधी एकदा लोकांसमोर जाऊन त्यातली गाणी सादर करतोय आणि त्यांना आनंद देत त्यांच मनोरंजन करतोय असं झालयं. लेट्स होप फॉर द बेस्ट :)
तेजरूप कुलकर्णी"
Download Noraml quality MP3 tracks
You can download all 9 songs from this album with Normal Quality (128KBPS ) MP3 format at special concessional price.
या अल्बममधील सगळ्या नऊ गाण्यांचे Normal Quality MP3 songs (128KBPS ) सवलतीच्य किमतीत येथून डाऊनलोड करा.
 
Download High Quality MP3 tracks
You can download all 9 songs from this album with High Quality (320KBPS) MP3 format at special concessional price.
या अल्बममधील सगळ्या नऊ गाण्यांचे High Quality Tracks (320KBPS ) सवलतीच्या किमतीत येथून डाऊनलोड करा.
 
Order A CD Online
भारतामध्ये कुठेही या अल्बमची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता!
You can order a CD of Musicology anywhere across India by courier. Additional courier charges apply.
निवडक गाणी ऐका आणि खरेदी करा
Listen and download seleceted songs
या अल्बममध्ये असलेल्या एकूण ९ गाण्यांपैकी काही निवडक गाणी खास
मानबिंदूच्या रसिकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत!
Out of 9 beatiful songs present in this album, we are presenting selected few songs for you to enjoy. You might buy one or all of them.
  |
![]() |
  Shopping cart |
You haven't chosen a song yet! Buy the songs you love and encourage this artist to serve you more. सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या! |
|
|
|
|
|
|
|
|
Average rating for album :या अल्बमचं सरासरी मानांकन : |
![]() ![]() ![]() ![]() ![]() |
(4.6 with 45 votes in 162 plays) | |
Download FREE karaoke (Music) MP3 tracks
We all have a hidden singer in ourselves but not always there are musicians to accompany us. That's why we at Maabindu Music are providing you FREE DOWNLOAD of Karaoke(music) tracks so that you would be able to sing your favorite song from this album anywhere, that too with original music!
प्रत्येकामध्ये कुठेतरी एक गायक/गायिका दडलेली असते असं आम्हाला नेहमी वाटत आलय! पण प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ करण्यासाठी वादक कलाकार असणं जवळपास अशक्य आहे. म्हणूनच मानबिंदू म्युझिक तर्फे या अल्बममधील सगळ्या गाण्यांचे Karoake(music) tracks आम्ही इथे Free Downloading साठी उपलब्ध करून देत आहोत; जेणेकरून तुम्हाला या अल्बममधील तुमची आवडती गाणी कुठेही सहज गाता यावीत आणि ती सुद्धा Original म्युझिकसह! ( ७ गाण्यांचे Karoake ट्रॅक्स CD मध्येही समाविष्ट आहेत!)
|
|
|
|
|
|
|
|
Available in following Stores across Mumbai and Pune
मानबिंदू म्युझिकतर्फे हा अल्बम मुंबई, पुणे येथे खालील दुकानांमध्ये उपलब्ध आहे.
|
Order CD - COD
(Pay Cash on Delivery)
महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅश ऑन डिल्हिवरीसाठी पद्धतीने CD घरपोच मिळवा. किंमत रु १९०/- .
You can order the CD by Cash on Delivery method across Maharastra. Charges Rs. 190/- only.
वेबवर अन्यत्र उपलब्ध
Also Available On
"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने ४७० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!
Musicology has also been made available online on following other websites by Maanbindu Music



On more than 470 websites with Maanbindu Music Shopee
"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने ३५० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!