
Nadikathi : Marathi Audio book written by Vasanti Muzumdar. Narrated by Swati Subramaniam, Sumukhi Pendse, Ajit bhure, Shruti Muzumdar, Sanjay Mone.
आजच्या धावपळीच्या जगात बरेचदा असं होतं की आवड असूनही चांगलं साहित्य आपल्याला वेळ नसल्यामुळे वाचायला मिळत नाही किंवा ब-याच ज्येष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वेही वाचणं शक्य होत नाही. तसच इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अनेक मुलांनाही मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. अशा सगळ्या लोकांपर्यंत चांगलं मराठी साहित्य पोहोचावं यासाठी "ऑडीओपुस्तक" ही संकल्पना तुमच्यासमोर सादर होत आहे. जेणेकरून चांगलं साहित्य तुम्ही मिस करणार नाही आणि तुम्हाला ते कधीही आणि कुठेही "ऐकता" येईल. "ऑडीओपुस्तक- ऐकाल तर वाचाल!"

वासंती मुझुमदार

स्वाती सुब्रमण्यम

सुमुखी पेंडसे

अजित भुरे

संजय मोने

श्रुती मुझुमदार
श्रेयनामावली
- लेखिका : वासंती मुझुमदार
- अभिवाचन : स्वाती सुब्रमण्यम, सुमुखी पेंडसे, अजित भुरे, श्रुती मुझुमदार, संजय मोने
- संकल्पना, निर्मीती: स्वाती सुब्रमण्यम
- वितरण : मानबिंदू म्युझिक
प्रस्तावना
वासंती मुझुमदार यांच्या नदीकाठी या ललितलेख संग्रहावर आधारीत हे ऑडीओपुस्तक
आपल्या भेटीस आणताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. या ऑडीओपुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ
कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर २०१२ रोजी झालं. नदीकाठी या मुळ
पुस्तकाची प्रस्तावनाही त्यांनीच लिहिली आहे. यांनी. त्या प्रस्तावनेत ते लिहितात,
"मनावर कसल्याही हेतूचे ओझे न बाळगता, नदीकाठी उगवलेल्या हिरव्याकोवळ्या गवतातून
हिंडून यावे तसा प्रसन्न अनुभव वासंती मुझुमदार यांचे हे ललित लेखन वाचताना येतो.
त्या चित्रकार आहेत. त्यामुळे रंगरेषांचे उपजत वरदान त्यांना लाभलेले आहे. त्यांचे
हे लेखन वाचताना कुंचल्याची लेखणी केंव्हा होते आणि लेखणीचा कुंचला केंव्हा होतो
हेच कळत नाही. इथे माणसे, प्राणी, पक्षी, झाडे, घरे,नदी, फुले यांचे थक्क करून
सोडतील असे तपशील आढळतात.पण हे तपशील व्यक्तित्वशून्य गर्दी करत नाहीत. यातील
प्रत्येक तपशील जिव्हाळ्याच्या व्यक्तीने सांगून जावे तसे हृदगत सांगून जातो. एखादे
झाड फुलांनी पानांनी गच्च भरून यावे तसे हे पुस्तक ललित लेख प्रतिमांनी बहरून आले
आहे. या प्रतिमा चिकटवलेल्या नाहीत ; अनुभवाच्या फांदीफांदीतून त्या रुजून आल्या
आहेत.वासंती मुझुमदार यांनी निसर्गाचे केलेले चित्रण हे केवळ रंगरेषांची रम्य क्रीडा
नाही : या चित्रणातून मैत्र जीवाचे प्रकटले आहे. हे लेखन वाचताना आपल्याला आपले
बाळपण भेटते, आठवणींची हिरवी पोपटी पालवी हळूवार स्पर्शून जाते. डोळे आहेत, ते
सगळेच पाहतात. पण या पहाण्यात प्राण नसतो. वासंती मुझुमदार यांचे पाहणे हे अंतरीचे
उमलणे आहे, याचा प्रत्यय लेखन वाचताना ओळीओळीतून येतो. रानांच्या झाडांच्या गर्दीत
आपण एकटे उभे असताना डोळ्यांना झरा कुठे दिसतच नाही; पण दुरून कुठेतरी येणारा त्याचा
संथ शांत आवाज मात्र जाणावतो. वासंती मुझुमदार यांचे पुस्तक वाचताना दृश्य
परिसरापल्याड वाहणारा चैतन्याचा शांत प्रवाह कुठूनतरी ऐकू येत रहातो!"
तुमच्या आवडीच्या निवडक कथा खरेदी करा
इथे नदीकाठी या ऑडीओपुस्तकातील सगळ्या कथांची साधारण ४ ते ५ मिनिटची एक झलक तुम्ही ऐकू शकता आणि तुम्हाला आवडलेल्या एक/अनेक संपूर्ण कथा (MP3 फाईल्स) ऑनलाईन पेमेंट नंतर लगेचच डाऊनलोड करून घेऊ शकता!
  |
![]() |
  Shopping cart |
सध्या तुम्ही एकही कथा निवडलेलीं नाही. तुमच्या आवडीच्या कथा खरेदी करून मराठी साहित्यास प्रोत्साहन द्या! |
|
|
|
|
|
|
|
  |
या अल्बमचं सरासरी मानांकन : |  
![]() ![]() ![]() ![]() ![]() |
(4.11 with 45 votes in 1417 plays) | |
Free Download
या ऑडीओपुस्तकाबद्दल अधिक माहिती देणार "मनोगत" इथून Free Download करा!
वेबवर अन्यत्र उपलब्ध
लवकरच मानबिंदू म्युझिक तर्फे हा अल्बम वेबवर अन्यत्र खालील ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल!

"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने ३५० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!

Order Audio book CD - COD
(Pay Cash on Delivery)
महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅश ऑन डिल्हिवरीसाठी पद्धतीने CD घरपोच मिळवा. किंमत रु १९०/- .
INSTANTLY Download All MP3 tracks
(Pay Online)
नदीकाठी हे ऑडीओपुस्तक खरेदी करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि सर्वात जलद असा पर्याय आहे. या ऑडीओपुस्तकातील सगळ्या कथांचे MP3 tracks तुम्ही ऑनलाईन पेमेंट नंतर लगेचच डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मोबाईल, USB, किंवा संगणकावर ऐकू शकता! या ऑडीओपुस्तकामध्ये एकूण ७ कथा असून त्यांच्या एकत्रित कालावधी १० तास ५७ मिनिटे आहे. आजच या सर्व कथा डाऊनलोड करा!
Order Audio Book CD Online
(Pay Online)
भारतामध्ये कुठेही या ऑडीओपुस्तकाची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता! महाराष्ट्रामध्ये कुरीयरसाठी 40 रुपये आणि महाराष्ट्राबाहेर भारतात कुठेही कुरीयरसाठी 60 रुपये अधिक लागतील.
(टीप : भारताबाहेर CD कुरीयर केली जात नाही.)