Maanbindu New Marathi Movies
Maanbindu menu 1
Maanbindu menu 2
 
         
 
 
Bokya-Satbande - New marathi movie written by Dilip Prabhavalkar
 
SocialTwist Tell-a-Friend
  • कलाकार : दिलीप प्रभावळकर, चित्रा नवाथे, शुभांगी गोखले, विजय केंकरे, माधवी जुवेकर, ज्योती सुभाष, आलोक राजवाडे आणि बोक्या - आर्यन नार्वेकर आणि त्याची गँग [ निशा सातपुते, अभिषेक सराफ़, रोहीत पाठक, पार्श्व पंचवाडकर, विघ्नेश कुलकर्णी, अथर्व कर्वे, मिहीर जोशी, पराग बर्वे, तनिष्क पैठणकरम हितेश तनुजा,  चिन्मय पटवर्धन, रिद्धी काशीकर, पार्थ वाईकर गौरव जोशी, श्रुती कुलकर्णी, कोमल पाटसकर, हृषिकेश कुलकर्णी ]
  • लेखक : दिलीप प्रभावळकर
  • दिग्दर्शन : राज पेंडुरकर
  • संगीत : शैलेंद्र बर्वे
  • गायक : अवधूत गुप्ते, सुरेश वाडकर, शैलेंद्र बर्वे, जितेंद्र जोशी
  • छाया : अमलेंदु चौधरी
  • निर्माती : कांचन सातपुते
 

खरं म्हटल्यास दिलीप प्रभावळकर लिखित बोक्या सातबंडे या पात्राची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरज नाही कारण हा खट्याळ पण निरागस बोक्या आपण  आत्तापर्यंत नभोनाट्य, पुस्तक संग्रह आणि दूरदर्शन मालिकांमधून यापूर्वी अनुभवलाय. जस-जशी माध्यमांमध्ये आधुनिकता येत गेली तसं बोक्या हे पात्र देखील आणखी प्रगत होत गेलं आणि मिश्किल आणि खट्याळ लेखनशैलीतून उभं केलेलं बोक्या सातबंडे हे चतुरस्त्र पात्र आज २००९ सालात तुमच्याशी सिनेमा या हुकूमी माध्यमातून संवाद साधण्यासाठी सज्ज झालंय!

या सिनेमाचं एका ओळीत कथानक म्हणजे बोक्याचं चिमुकलं भावविश्व. आई, बाबा, आजी, दादा, शेजारचे बेलवंडी आजी आजोबा, त्याचं मित्र मंडळ यांच्यामदतीने आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींना तो स्वत:च्या परीने समजून घेतो आणि त्यावर स्वत:ला जमेल तसा मार्ग काढायचा प्रामाणिक प्रयत्नही करतो. मग कधी गमती घडतात तर कधी साहसाचे प्रसंगही उद्भवतात. यात खूप घडत नसलं तरी छोट्या छोट्या प्रसंगातून एक गमतीदार गोफ विणला जातो

हे सगळं खरं; पण बोक्‍या कोण? तो आहे अभिनेता संजय नार्वेकरचा मुलगा आर्यन... आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्याने मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण केलं आहे. त्याचं झालं असं की "बोक्‍या सातबंडे'मधल्या बोक्‍याच्या निवडीकरिता निर्मात्या कांचन सातपुते यांनी एक स्पर्धा ठेवली होती. जवळपास पाचशे मुलांची स्क्रीन टेस्ट त्यांनी घेतली, पण त्यातून योग्य मुलगा काही त्यांना मिळाला नाही. तरीही त्यांचा शोध सुरू होता... आणि अचानक त्यांना आर्यन दिसला. तोच आपला बोक्‍या, अशी त्यांची ठाम धारणा झाली आणि संजय नार्वेकर व असिता नार्वेकर यांच्याशी विचारविनिमय करून, आर्यनला विश्‍वासात घेऊन चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवत त्याने बोक्या सातबंडे हे कॅरेक्टर सहज साकारलं. चला पाहूया २००९ सालातल्या बोक्याची एक झलक....

मूळ बोक्या सातबंडे या पाच भागांच्या या कथासंग्रहामधील काही निवडक भागातील तीन गोष्टींचा समावेश या चित्रपटाच्या कथानकात आहे.बरेचदा होतं असं की एखादं पुस्तकी पात्र लोकप्रिय होतं तेव्हा प्रत्येक वाचकाच्या कल्पनाविश्वाप्रमाणे ते आकार घ्यायला लागतं. मग त्याचा सिनेमा होतो, तेव्हा आपल्या मनातली व्यक्तिरेखा सिनेमात कशी दिसते हे पहाण्याच्या उत्सुकतेने ते वाचक सिनेमाला जातात. भट्टी व्यवस्थित जमलेली नसेल तर प्रेक्षकांच्या मनातल्या चित्राला धक्का बसण्याचा मोठा धोका असतो. पण सुदैवाने, बाल कलाकार आर्यन नार्वेकर आणि आलोक राजवाडे हे बोक्या आणि विजूच्या व्यक्तिरेखेत बऱ्यापैकी यशस्वी झाल्येत. खरं म्हणजे बोक्याचा वाट्याला आलेले खुसखुशीत संवाद आणि त्याचा अतिशय नैसगिर्क वावर ही केमिस्ट्री मस्त जुळून आलीय. त्यामुळे आर्यनने उभा केलेला बोक्या सहज आवडून जातो. रंजक आणि तरीही वेळोवेळी गांभीर्यानं विचार करायला भाग पाडणारा चित्रपट; अधेमध्ये अंतर्मुख करणारा आणि पण त्याच वेळी बच्चे कंपंनीच्या धमाल विश्वाची अनोखी मेजवानी घेऊन आलेलाही हा एक चित्रपट अस याचं सुयोग्य वर्णन करता येईल! या चित्रपटात आजच्या भावविश्वातील खोडकरपणा, गमतीजमती, मनोरंजन तर आहेच आहे, पण मोठयांनीही काही प्रसंगातून आपल्या पाल्याचं भावविश्व जाणून घ्यावं असंही बरच काही आहे. म्हणूनच हा चित्रपट घरातील लहानमोठ्यांनी आवर्जून पहावा असाच आहे..

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मारा
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
( मराठी - इंग्रजी मध्ये बदलण्यासाठी CTRL+M वापरा. )
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  abhijeet nadgouda  |  
  खुपच च्हान आहे हो
[ Oct 20, 2010 5:33 PM ]

  madhavi mosamkar  |  
  खुप मस्त मूव्हि आहे.मला अतिशय.........
[ Jul 17, 2010 2:29 PM ]

  Nilesh  |  
  मी या चित्रपटाची DVD शोधत आहे.मला टी कोठे मीलू शकेल?
[ Mar 24, 2010 11:57 AM ]

  chetan  |  
  खरच खुप छान वाटत आहे हा चित्रपट . . . मला खुप अभिमान वाटतो की मराठी चित्रपट अत कुठे कमी पडत नहीं आहेत . . . अणि आशय वेबसाइट च्या मध्य मान्द्वारे मराठी चित्रपटांची प्रसिध्ही करने जरुरीचे आहे . . . मी खरच खुप खुप आभारी आहे आपला. धन्यवाद !!!
[ Jul 18, 2009 2:30 AM ]

  asita narvekar  |  
  बोक्य सत्बंडे परिवाराकडून प्रेक्षकांचे मानपूर्वक आभार .आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहित करते या पुढे देखिल चांगले चित्रपट देण्याचे प्रयत्न नक्की करू.....thanks
[ Jul 11, 2009 11:18 AM ]

 

Advertisement

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..