शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक
अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारताचा आणि
विशेषत: सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण
हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र! अजूनही भारतातला ग्रामीण वर्ग
अप्रगतच आहे. गावाच्या प्रमुखांमध्ये असलेला; पिढ्यानपिढ्या चालत आलेला राजेशाही
दर्प, लोभ हा आजही तसाच आहे आणि त्यायोगे ग्रामीण जनतेची होणारी पिळवणूक ही आजही
वस्तुस्थिती आहे!
चांगले संस्कार उत्तम व्यक्तीमत्व निर्माण करतात! आजूबाजूच्या लोकांवर आणि
परीसरावर प्रेम करणे त्यांना लहानपणीच शिकवल्यास कोणत्याही परिस्थीतीत स्वार्थ
बाजूला ठेवून समाज सुधारण्याची अशांची धडपड सुरू होते. त्यानिमीत्ताने उत्तम
संस्काराच्या पारंब्या त्यांना फ़ुटायला लागतात आणि समाज आदर्शाच्या जमिनीमध्ये घट्ट
रोवला जातो!
अशाच काही गोष्टीचा शोध कोटणीस सिने क्रिएशन्स निर्मीत पारंबी या चित्रपटाच्या
निमीत्ताने आपल्या समोर येणार आहे. शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास
खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि
सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.
सामाजिक जागृती करणा-या आणि सुशिक्षीत तरूणांच्या मनाला हात घालणा-या
पारंबी या चित्रपटाच्या विषयाबरोबरच चित्रपटाचं संगीत
हे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्टय आहे. अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेली आणि
बेला शेंडे, अवधूत गुप्ते, अमेय दाते, ज्ञानेश्वर मेश्राम यांसारख्या गायकांनी
गायलेली रॉक, प्रेम आणि अध्यात्म अशा विविध प्रकारची गाणी चित्रपटाच्या कथानकाशी
समरस होत अगदी परिणामक पद्धतीने आपल्या मनावर प्रभाव टाकतात.
पारंबी या चित्रपटाच्या निमीत्ताने, कोल्हापूरमधी
नरसोबाची वाडी या देवस्थानात देखील बरेच वर्षांनी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण
झालय!
पारंबी चित्रपटच्या प्रिमीअरची १० तिकीटे आणि १०० ऑडीओ CD जिंकण्याची सुवर्णसंधी!
पारंबी या चित्रपटाचा प्रिमीअर शो तुम्हाला या चित्रपटाच्या तारे तारकांसमेवत
पहायचाय का? ...किंवा अशोक
पत्कींच संगीत असलेली आणि बेला शेंडे, अवधूत गुप्ते, ज्ञानेश्वर मेश्राम यांसारख्या
नामवंत गायकांनी गायलेली पारंबी या चित्रपटाची ऑडीयो CD तुम्हाला हवी आहे का? यासाठी
तुम्हाला फक्त इतकच करायचय
:
मानबिंदूच्या फेसबुक पेजचे सदस्य व्हायचय!
तुमचे नाव, इ-मेल आयडी, पत्ता आणि संपर्क क्रं आम्हाला कळवायचं आहे
या पानाची आम्ही खास तुमच्यासाठी तयार केलेली एक वेगळी लिकं इंटरनेटवर (फेसबुक,
ट्वीटर्, इ-मेल किंवा ब्लॉगद्वारे) जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवयाची आहे
तुम्हाला दिलेल्या लिंकद्वारे या पानाला किती लोकांनी भेट दिली याची आम्ही
नोंद ठेवू आणि याप्रकारे सर्वाधिक लोकांपर्यंत हे पान पोहोचवण्यास मदत करणा-या
पहिल्या पाच सिनेरसिकांना प्रिमीअरची दोन तिकीटे आणि चित्रपटाच्या तारे, तारकांना
भेटण्याची संधी मिळेल;
तसच पहिल्या १०० जणांना या चित्रपटाच्या गाण्याची CD FREE देण्यात
येईल!
यासाठी आत्तापर्यंत 109 जणांनी रजिस्टर आणि शेअर केलय. त्यांचा
मदतीने हे पान 827 वेळा पाहिलं गेलय! सहभागी व्यक्तिंचं लाईव्ह
रॅंकिंग इथे
पहायला मिळेल!