Maanbindu New Marathi Movies
Maanbindu menu 1
Maanbindu menu 2
 
         
 
 
New Marathi Movie : Gabhricha Paus - The Damned Rain | Official Marathi Website
 
 THE DAMNED RAIN

कलाकार : सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष, वीना जामकर, अमन अत्तर, मुकुंद वसुले | लेखक दिग्दर्शक : सतीश मन्वर | सिनेमटॉग्राफी : सुधीर पळसने | एडीटर : सुचित्रा साठे | साउंड डिझाईन : अनमोल भावे | संगीत : दत्तप्रसाद रानडे | गीत : दासू | पार्श्वसंगीत : मंगेश धाकडे | कार्यकारी निर्माता : नितीन प्रकाश वैद्य | निर्माता : प्रशांत मधुसुदन पेठे

महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाचं स्वत:च असं खास वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी तो भाग प्रसिद्ध असतो. तसंच विदर्भातला काही भाग (कु)प्रसिध्द आहे तिथे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्यांमुळे! गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट नेमका आधारला आहे याच विषयावर...

दोन लहान मुलं गावात भटकत आहेत अशा दृश्याने चित्रपटाची सुरूवात  होते. त्यातला एक आहे सायकलवर आणि दुसरा सायकलवर बसायला मिळावं या आशेने त्याच्यामागे पळतोय! पळता पळता ते एका झाडापाशी येऊन थबकतात. सहजच इकडे-तिकडे पहाता त्यांना त्याच झाडावर एक माणूस गळफ़ास लावून लटकलेला दिसतो आणि चित्रपट त्याच क्षणाला विषयाला हात घालतो...

चित्रपटात यानंतर आपल्याला एका कुटुंबाची ओळख होते! या कुटुंबाच्या कर्त्या पुरूषाची, किस्नाची, भूमिका साकार केली आहे गिरीश कुलकर्णी यांनी आणि त्याच्या पत्नीचं, अल्काचं, काम केलय सोनाली कुलकर्णीने! या कुटूंबात एक आजी, किस्नाची आई पूर्णा (ज्योती सुभाष) असून ती कुटूंबातली सर्वात समजुतदार व्यक्ती आहे. किस्ना आणि अल्काला सहा वर्षाचा छोटा मुलगा दिनूही आहे. दिनू हा निरागस असला तरी अतिशय हुशार असून तो आपल्या आईशी प्रामाणिक आहे!

गावात घडणा-या एकूणच आत्महत्या आणि त्याची कारणं लक्षात घेता अल्कालाही आपला नवरा आत्महत्या करेल की काय अशी भिती असते. पण किस्नाला त्याच्याकडे या नजरेनं पाहिलं जातय याची कल्पनाही नसते. अल्का तिच्या सासूला ही भिती बोलून दाखवते आणि दिनूच्या मदतीने, त्याची इच्छा आणि समज नसतानाही, आपल्या नव-यावर सतत नजर ठेवायचा प्रयत्न करते...

अशा एकंदरीत धरतीवर हा चित्रपट आधारला असून पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल!

 
हल्लीच्या तद्दन विनोदी चित्रपटांपेक्षा हा चित्रपट एक वेगळा आणि शेतक-यांच्या आत्महत्येसारखा महत्वाचा विषय घेऊन लोकांपुढे येतो आणि तो तितक्याच परिणामकारक पद्धतीने लोकांपुढे मांडतो हेच या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य! ...असं असलं तरी या चित्रपटात बरेचसे हलकेफुलके क्षणही आहेत जे चित्रपटाचे रंग आणखी खुलवतात! सगळ्याच अभिनेत्यांचा भूमिका त्यांनी खूप ताकदीने चित्रपटात साकारल्या आहेत.

या चित्रपटाला लाभलेलं संगीत हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल! गाण्यांचे शब्द फ़ार सुंदर लिहिले असून ते शेतक-यांची सद्यस्थिती फ़ार परिणामकारक पद्धतीने मांडतात! गावरान बाजाचं संगीत या निमित्ताने आपल्या खूप दिवसांनी ऐकायला मिळतं. या चित्रपटाचं एडीटींगही खूप अप्रतिम झालय त्यामुळे कुठलाही सीन लांबलेला किंवा कंटाळवाणा वाटत नाही.

रोटरडॅम, नेदरलॅंड इथे प्रिमियर झालेल्या या चित्रपटाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलयं. त्यात खालील पुरस्कारांचा समावेश आहे!

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : BMM Convention, Philadephia
  • पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट आतंरराष्ट्रीय चित्रपटासाठीचा महाराष्ट्र शासनातर्फे संत तुकाराम पुरस्कार
  • स्पेशल ज्युरी पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे
  • हबर्ट बाल्स फ़ंड : रोटरडॅम इथे झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये, वितरणासाठी दिला जाणारा पुरस्कार ( १०,००,००० रु. ). जगातल्या ३७७ चित्रपटांपैकी केवळ ३१ चित्रपटांना हा निधी देण्यात आला आहे! हा पुरस्कार मिळवणारा हा भारतातला पहिला चित्रपट आहे,
  • व्ही. शांताराम पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन, सर्वोत्कृष्ट एडिटींग

या व्यतिरीक्त खालील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल्ससाठी या चित्रपटाची ऑफिशियली निवड झाली आहे.

  • कैरो ईंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टीव्हल, ईजिप्त.
  • वॉरसॉ इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, पोलंड
  • इंडियन फिल्म फेस्टीव्हल, लॉस एन्जलिस
  • डर्बन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, साउथ अफ़्रीका
  • वॅनकुवेर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, कॅनडा
  • ट्रानिलविनीया इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, रोमानिया
  • अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल,
  • Bollywood & Beyond, Germeny
  चित्रपटाविषयी अधिक माहिती /  संबंधीत बातम्या

 

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मारा
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
( मराठी - इंग्रजी मध्ये बदलण्यासाठी CTRL+M वापरा. )
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
सध्या एकही अभिप्राय नाही!
 

Advertisement

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..