स्नेहा प्रॉडक्शन
प्रस्तुत
आणि
कनक चित्र
निर्मीत
कस
हा वेगळ्या धाटणीचा
चित्रपट लवकरच
प्रदर्शित होतोय. रुपेरी पडद्यावर गेल्या
अनेक दिवसात काही दर्जेदार चित्रपट
प्रदर्शित झाले
आहेत आणि नवलाईने नटलेले हे चित्रपट वाखाणलेही जाऊ
लागले आहेत. याच पंक्त्तीत बसणारा आणि या आधीही
दर्जेदार चित्रपट देणा-या कलाकार/ तंत्रज्ञांनाची टीम
असणारा
कस
हा एक
लक्षवेधी चित्रपट आहे!
चित्रपटाचं कथानक थोडक्यात
सांगायचं झाल्यास, ही कथा आहे अरुंधती मोडक नावाच्या
एका सुशिक्षित आणि सुजाण स्त्रीची! तिच्या आयुष्यात
येणा-या एका अवघड वळणावर तिच्यासमोर अनेक पर्याय उभे
रहातात आणि त्यातील एक निवडताना निरपेक्ष उत्कट प्रेम,
कठोर आत्मसन्मान आणि समाजाची चौकट या विविध पैलूंवर एक
व्यक्ती म्हणून तिचा जो
कस
लागतो तो या चित्रपटाच्या
माध्यमातून दाखविण्यात आला आहे!
अगदी दिग्दर्शकांच्या शब्दातच सांगायचं झाल्यास, ते
या प्रकारे सांगता येईल.
कस आहे 'आजच्या
' स्त्रीची कथा! अरुंधती मोडकची कथा.
एका सुशिक्षित सुजाण स्त्री
समोर आयुष्याच्या एका वळणावर उभ्या रहाणा-या पर्यायांची
कथा.
अरुंधती आणि
तिचं कुटूंब.
नवरा श्रीरंग, नणंद ललिता, बहीण
आरती, अरुंधतीचा मित्र राज यांच्या नात्यामध्ये कोणती
वादळं निर्माण करतं ते अवघड वळण आणि कोणता पर्याय
निवडतो प्रत्येकजण त्याची कथा!
निरपेक्ष उत्कट प्रेम, कठोर
आत्मसन्मान, आणि समाजाची चौकट या अग्निरेखेवरून जाणारा
हा प्रवास
अरुंधतीचा, तुमचा, माझा..
कस!
तुम्हाला हे पान आवडल्यास :
निवडुंग, महानंदा
या सारखे गाजलेले चित्रपट आणि
महाश्वेता
सारख्या
अतिशय लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शन केल्यानंतर दिग्दर्शक
महेश सातोस्कर, अरूणा जोगळेकर
आणि संगीत दिग्दर्शक
भावगंधर्व
पं. ह्रदयनाथ मंगेशकर
ही अतिशय यशस्वी त्रयी कस
या
चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आली
आहे आणि खरं म्हणजे यातच
सारं काही आलय! त्यातच
आशाताई, राधा मंगेशकर
आणि
स्वप्नील बांदोडकर यांनी
गायलेल्या
नवीन गाण्यांची उत्सुकताही आहेच!
भार्गवी चिरमुले
आणि राधा मंगेशकर
यांचा तर हा पहिलाच चित्रपट;
त्यामुळे त्यांच्याकडूनही खूप अपेक्षा आहेत! या
व्यतिरीक्त निलम
शिर्के, प्रसाद ओक, राजेश
शृंगारपुरे,भार्गवी चिरमुले आणि
आनंद अभ्यंकर यासारखे 'कस'लेल्या अभिनेत्यांनी या चित्रपटात
केलेली अप्रतिम कामं, इतके दिग्गज
एकत्र आल्यामुळे
चित्रपटाचं संगीत,
विषयाचा दर्जा
आणि त्याची हाताळणी या
सगळ्याच बाबतीत चित्रपट 'कस'दार
असणार
आहे यात शंकाच नाही आणि म्हणूनच सिनेप्रेमींसाठी हा
चित्रपट म्हणजे पहाणं
सगळ्या अर्थाने एक 'ट्रीट' ठरेल हे नक्की!
कस या
चित्रपटाचा वर दिलेला व्हिडीयो पहा, खालील एकाच
प्रश्नाचं उत्तर द्या आणि या चित्रपटाची तिकीटे मिळवा
अगदी FREE*!
कस या चित्रपटाची
नेमकी कथा काय असेल असं तुम्हाला वाटतं?
* फक्त निवडक
विजेत्यांनाच
ब-याच
दिवसांनी पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं नवीन संगीत आणि
त्यातच आशाताई, राधा मंगेशकर, स्वप्नील बांदोडकर सारख्या
गायकांची गायकी अशी दुहेरी फीस्ट संगीत रसिकांना या
चित्रपटाच्या निमित्ताने
अनुभवता येणार आहे!