Maanbindu New Marathi Movies
Maanbindu menu 1
Maanbindu menu 2
 
         
 
 
New Marathi Movie : Zenda by Avdhoot Gupte
 

कलाकार : पुष्कर श्रोत्री, राजेश शृंगारपुरे,संतोष जुवेकर, सिद्दार्थ चांदेकर, सचित पाटील, चिन्मय मांडलेकर, तेजश्री प्रधान, नेहा जोशी, शुभांगी गोखले, उज्ज्वला जोग, सुनील तावडे, अतुल तोडणकर, राहुल नेवाळे, मेघना एरंडे, श्रीरंग गोडबोले | दिग्दर्शक : अवधूत गुप्ते |पटकथा/संवाद : सचिन दरेकर |कथा/संगीत : अवधूत गुप्ते | गीतकार : गुरू ठाकूर, अवधूत गुप्ते, अरविंद जगताप | गायक : ज्ञानेश्वर मेश्राम, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, निहीरा जोशी, वैशाली सामंत | पार्श्वसंगीत : प्रसाद साष्टे | नृत्य दिग्दर्शक : दिपाली विचारे | कार्यकारी निर्माता : हेमेंद्र कुलकर्णी | निर्माता : अवधूत गुप्ते, अतुल कांबळे

 

 

झेंडही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या आजच्या तरुणाची! आजचा तरुण हा जितका हुशार, टेक्नोसॅव्ही आहे तितकाच संवेदनशीलही. मग तो मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातला असो की विदर्भ, मराठवाड्यातल्या लहानशा खेड्यातला! समाजातल्या प्रत्येक घटनेवर, प्रत्येक चढाउतरावर तो त्याच्या पध्दतीने रिऍक्ट होत असतो. लहानातल्या लहान घटनेची नोंद त्याच्या कोवळ्या मनावर होत असते. या अशाच वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातल्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारे चार नायक आदित्य महाजन, उमेश जगताप, संतोष शिंदे आणि अविनाश मोहितयांच्याभोवती या चित्रपटाची कथा गुंफ़ली आहे...

यातल्या प्रत्येक नायकाची स्वप्नं वेगळी आणि प्रत्येकाच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पनाही वेगळ्या आहेत! एकमेकांशी अर्थाअर्थी संबंध नसलेल्या या चौघांच्याही आयुष्यात एक समान दुवा आहे आणि तो म्हणजे राजकारण! खरतर भारतातल्या इतर राज्यांपेक्षा प्रगतीपथावर असलेल्या महाराष्ट्र राज्याचं राजकारण हा एक वेगळाच विषय आहे. आपला प्रत्यक्ष संबंध असो वा नसो, राजकारण आणि त्यात होणा-या बदलांचा आपणा सामान्य माणसांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात घडलेल्या एका मोठ्या घटनेचा या चार नायकांवर झालेला परिणाम आणि त्या घटनेचे या चौघांच्याही जीवनात उमटलेले पडसाद, बदललेल्या परिस्थीतीमधून बदलत गेलेली स्वप्नं आणि त्यांच्या आयुष्यात आलेली स्थित्यंतर या सगळ्याचं प्रतिबिंब म्हणजेच .. झेंडा!

आपल्या सर्वांच्याच परिचयाचा असणारा संगीतकार अवधूत गुप्ते या ; चित्रपटाद्वारे प्रथमच चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात प्रवेश करतोय आणि तसं करणारा तो मराठीतला पहिलाच संगीतकार ठरलाय. त्यातही या नवीन वळणावर,त्याने पदार्पणातच निवडलेला विषय हा खूप धाडसी समजला जातोय किंबहुना या विषयामुळेच अनेकांच्या मनात चित्रपट पहाण्याची उत्सुकता ताणली जातेय यातही वाद नाही!

या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सारेगमप मधल्या डेंजर झोनचा संस्थापक म्हणून एकेकाळी प्रसिद्ध झालेल्या आळंदीच्या ज्ञानेश्वर मेश्राम याने गायलेल चित्रपटाचं टायटल ट्रॅक,  विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती!

जगण्याच्या वारीत मिळेना वाट
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं, आपलीच नाती
तरी कळपाची, मेंढरास भिती!
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?

हे अरविंद जगताप यांचे शब्द आणि अवधूतच संगीत आणि ज्ञानेश्वर मेश्रामची आर्त साद टायटल ट्रॅकामध्ये खासच परिणाम साधून जातेय! याव्यतिरीक्त अवधूत गुप्ते हा रॉक संगीताचा फ़ॅन आहे संगीत हे ही सर्वज्ञात आहेच. मध्यंतरी सारेगमप मध्ये, "मला मराठीमध्ये रॉक संगीत आणायचं आहे" असंही त्याने म्हटलं होतं,किंबहुना त्याची झलक आपल्याला त्यापूर्वीच प्रदर्शीत झालेल्या सनई चौघडे मधील कांदेपोहे या गाण्याने दिलीही होती आणि आता या ही चित्रपटात तो "सावधान सावधान, वणवा पेट घेत आहे" हे अजून एक रॉक गाणं घेऊन तो आपल्यासमोर आलाय .

स्वप्नील बांदोडकर आणि अवधूतने गायलेलं हे गाणंदेखील खासच जमून आलय आणि तरुणाईला चित्रपटाकडे खेचण्यासाठी ते एक प्रमुख आकर्षण ठरलय! म्हणूनच या गाण्याच्या आणि/किंवा एकंदरीच चित्रपटाच्या निमित्ताने आजकल अवधूत रॉक्स असं म्हटल्यास ते फ़ारसं वावगं ठरू नये! :-)

* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने मराठीत टाईप करण्यास येथे टिचकी मारा
नाव :
ई-मेल :
अभिप्राय :  
( मराठी - इंग्रजी मध्ये बदलण्यासाठी CTRL+M वापरा. )
 Remaining Characters : 1024
[ मानांकन देण्यासाठी ता-यांवर टिचकी मारा ]  
 
मानांकनानुसार सर्वोत्कृष्ट  आणि नुकतेच आलेले अभिप्राय    [ सर्व अभिप्राय पहा ]
  Mohan Dhokare  |  
  ज़र झेंडा! विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती! ह्या गान्याचे फ्क्त संगीत मिलाले तर क्रुपया मा़झे मेल वर पाटवा. बाकि साइट झक्कास आहे.......
[ Nov 9, 2010 3:29 PM ]

  Mohan Dhokare  |  
  ज़र झेंडा! विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती! ह्या गान्याचे फ्क्त संगीत मिलाले तर क्रुपया मा़झे मेल वर पाटवा. बाकि साइट झक्कास आहे.......
[ Nov 9, 2010 3:27 PM ]

  Dhananjay Jog  |  
  झक्कास ! भन्नाट !! तोडलंस लेका अवधूता !!!
[ Jul 23, 2010 11:50 AM ]

  Asawari  |  
  Songs are good!! All the best to avdhoot da!
[ Jan 28, 2010 6:47 PM ]

  Swapnil  |  
  chaan vatla chitrapat pan utkrushta nahi mhanta yenar..!! end was too different..!! Title track khup apratim ahe..!! pan titke prabhavi vaparle nahi..!! Yavar zhale gelele vaad mhanje jyanni vaad kele tyanna tyat satyata janavli ase vatle..!! debute direction was good..!! vinakaran 2-3 hindi gani ghalun CD complete keli ahe ase vatle..!! tyatle Jaljale he hindi gane chaan vatle..!! Patil Aala was not dat much good...!! Overall good cinema..!!
[ Feb 12, 2010 1:03 PM ]

 

Advertisement


 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..