Maanbindu menu 1
Maanbindu menu 2
 
 
 
Share
राठी चित्रपटांना सध्या खूप चांगले दिवस आले आहेत. केवळ कथानकच नाही तर जोडीला तांत्रिकदृष्ट्याही उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मीती सध्या होतेय आणि त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळतोय. हे चित्र खरच खूप सुखावह आहे! श्वास नंतर मराठी चित्रपटांनी जणू कात टाकली. त्यानंतर वळू, मातीच्या चुली, टिंग्या, क्षण, गोजिरी असे अनेकानेक उत्तम चित्रपट इथे येऊन गेले आणि अजूनही अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती सध्या चालूच आहे! या नवीन चित्रपटांची ओळख करून देण्यासाठी आणि पर्यायाने मराठी चित्रपट अधिकाधिक सिनेरसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सदर ! 'मानाबिंदू'च्या इतर सदरांना मिळत असलेल्या इतर सदरांइतकच प्रेम तुम्ही ह्या ही सदरावर कराल अशी आमची अपेक्षा आहे.. जाणून घेऊया श्रेयस तळपदे आणि सुबोध भावे ह्यांना काय सांगायचय 'मराठी चित्रपटांबद्दल' सिनेरसिकांना ..
.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शीत पिपाणीहा चित्रपट विशेष चर्चेत आहेत तो "मालगुडी डेज" ची आठवण करून दिल्याबद्दल जर्मन अभिनेत्री क्रिस्टीन, मकरंद अनासपुरे, चंद्रकात कुलकर्णी, वैभव मांगले, क्रांती रेडकर, हेमांगी कवी असे कसलेले अभिनेते असलेल्या या चित्रपटाबद्द्ल बरीच उत्सुकता आहे. ..अधिक वाचा
.
शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र पारंबी हा चित्रपट निर्माण करतो..अधिक वाचा
.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काही रुग्णांना आपला जीव गमावायला लागल्याच्या बातम्या मध्यंतरी वर्तमानपत्रातून वाचायला मिळाल्या होत्या. विक्रम गोखले दिग्दर्शीत आघात हा चित्रपट देखील याच विषयावर भाष्य करतो!..अधिक वाचा
.
निवडुंग, महानंदा या सारखे गाजलेले चित्रपट आणि महाश्वेता सारख्या अतिशय लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शन केल्यानंतर दिग्दर्शक महेश सातोस्कर, अरूणा जोगळेकर आणि संगीत दिग्दर्शक भावगंधर्व पं. ह्रदयनाथ मंगेशकर ही अतिशय यशस्वी त्रयी कस या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आली आहे...अधिक वाचा
.
आपल्या सर्वांच्याच परिचयाचा असणारा संगीतकार अवधूत गुप्ते झेंडा या चित्रपटाद्वारे प्रथमच चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात प्रवेश करतोय आणि तसं करणारा तो मराठीतला पहिलाच संगीतकार ठरलाय..अधिक वाचा
.
दिलीप प्रभावळकर लिखित 'बोक्या सातबंडे' या कथासंग्रहावर आधारीत असलेला असलेला हा चित्रपट निषाद ऑडीयो व्हिजुअल्स या संस्थेने निर्मीत केलाय! हा खट्याळ पण निरागस बोक्या आपण आत्तापर्यंत नभोनाट्य, पुस्तक संग्रह आणि दूरदर्शन मालिकांमधून यापूर्वीही अनुभवलाय...अधिक वाचा
.
हल्लीच्या तद्दन विनोदी चित्रपटांपेक्षा हा चित्रपट एक वेगळा आणि शेतक-यांच्या आत्महत्येसारखा महत्वाचा विषय घेऊन लोकांपुढे येतो आणि तो तितक्याच परिणामकारक पद्धतीने लोकांपुढे मांडतो हेच गाभ्रीचा पाऊस या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य!..अधिक वाचा
.
मराठी अस्मितेचा मुद्दा जोर धरत असताना 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात परिस्थीतीमुळे गांजलेल्या मराठी माणसांना उभारी द्यायला, त्यांच्या मनातला स्वाभिमान जागृत करायला प्रत्यक्ष शिवाजीराजे अवतरतात अशी कथा निर्माण करण्यात आली आहे..अधिक वाचा
.
'हे लग्न होणारच' असं सांगणारा हा चित्रपट अर्थातच गुंफ़लाय तरुणाईच्या जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेविषयी. .दिप्ती श्रेयस तळपदे ह्यांची निर्मीती असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत तुषार दळवी, शिल्पा तुळसकर, सुबोध भावे, संतोष जुवेकर आणि सई ताम्हणकर यांनी...अधिक वाचा


 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..