आता उजाडेलया अप्रतिम अल्बमद्वारे
ओंकार घैसास या तरूण संगीतकाराने संगीतक्षेत्रात आपलं
पदार्पण केलय! या अल्बमचं लोकार्पण चित्रपट सृष्टीतले
सुप्रसिद्ध दिग्दर्शक
श्री केदार शिंदे आणि सुप्रसिद्ध संतूर वादक पं.
उल्हास बापट यांच्या शुभहस्ते
करण्यात आलं. कलाक्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित
होते. या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची १० गीते असून
सूर आनंदघन,
उजाडेल तरी न का
ही गीते तसच कै. श्री सुरेश
भटांनी लिहिलेली
जगून मी पाहिले कितीदा
ही गझल आणि शास्रीय अंगाने जाणारं, तीनतालात बांधलेलं
बरसत आल्या अमृत धारा
या गाण्यांचं सुरेशजींनी आपल्या
स्वरांनी सोनं केलय! या
व्यतिरीक्त झी मराठी महागायिका
वैशाली माडेने
गायलेलं, स्पृहा जोशीने लिहिलेलं
खुळे मन माझे
हे गीत आणि मंदार आपटेसह
तिने गायलेलं
आता उजाडेल
हे टायटल ट्रॅक; या गाण्यांचा खास उल्लेख इथे करावासा वाटतो!
पं. उल्हास बापट, श्री केदार शिंदे आणि श्री. सुरेश वाडकर,
'आता
उजाडेल' बद्दल आपलं मत व्यक्त करताना
सुरेश वाडकर, वैशाली माडे
सारखे
प्रसिद्ध गायक; मंगेश
पाडगावकर, सुरेश भट, आरती प्रभू, स्पृहा जोशी
असे गीतकार;
संतूरसाठी पं. उल्हास बापट,
गिटारसाठी मनीष कुलकर्णी,
बासरीवर विजू तांबे
अशी सगळी
नामवंत मंडळी या अल्बमशी जोडली गेल्याने हा अल्बम
मल्टीस्टारर
आणि अप्रतिम दर्जाचा झालाय ! त्यातच या अल्बमचं मिक्सींग हिंदी
सिनेसंगीतासाठी
नावाजलेल्या
यशराज स्टुडीओमध्ये
केलं गेलयं आणि ते ही अनेक फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या
विजय दयाळ याच्या
हस्ते; त्यामुळे आधीच सुंदर असलेल्या या
गाण्यांना चार चांद लागले आहेत हे नक्की!
हा अल्बम तुम्ही खालील
पर्यांयांसह ऑनलाईन खरेदी करू शकता.
[ Go to top ]
Online Payment Options
संगीतकार
ओंकार घैसास अल्बमबद्दल आपलं मत
व्यक्त करताना
ओंकार घैसासचा हा संगीतकार म्हणून पहिलाच अल्बम असल्याने
या अल्बमच्या त्याच्या काही खास आठवणी आहेत! गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात
आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय
निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलेल्या सुरेशजींनी त्याने
संगीतबद्ध केलेली चार गाणी गाणं, किंबहुना नावाप्रमाणेच सुरांचा
ईश असल्याने एकाच दिवसात चारही गाण्यांच रेकॉर्डींग पूर्ण करणं
हा अनुभवच त्याच्यासाठी
खूप संस्मरणीय होता.
हे कमीच म्हणून की काय, सुरेशजींनी त्याच्या चालींच कौतुकही करणं हे
देखील त्याला तितकच अनपेक्षित होतं!
विजू तांबे यांनी बाहेर गावाहून येऊन अंगात ताप असताना देखील
जीव ओतून वाजवलेला बासरीचा प्रत्येक भावपूर्ण पीस, पं. उल्हास बापट यांच संतूर वादन
सुरू असताना श्रावणातल्या हिरव्यागात
प्रसन्नतेचा
आभास निर्माण
करणारं स्टुडीओतलं
वातावरण अशा अनेक भावना ओंकारने
अल्बमच्या प्रकाशनाच्या वेळेस व्यक्त केल्या! या मंतरलेल्या दिवसाच्या आठवणी ओंकारने
ह्रदयाचे बोल या आपल्या ब्लॉगवर सविस्तर लिहिल्या आहेत!