Gandh halke halke:Marathi music album|Download MP3 songs:Maanbindu.com
गंध
हलके हलके या अल्बममधील
'धुंदीत प्रिया' या गाण्यासाठी मधुरा दातार हिला बिग ९२.७ या FM
वाहिनीच्या 'सर्वोत्कृष्ट
पार्श्वगायिका' या पुरस्कारासाठी नामांकन
मिळाले
आहे!
वादन
पं. उल्हास बापट, विजय तांबे,
उमेश चिपकर, जितू ठाकूर
कोरस
संगीत मोरजकर,
सुजाता पटवा, सोनल नाईक
"गंध हलके हलके" या अल्बमचं एका छोट्याशा Punch Line
मध्ये वर्णन करायचं झाल्यास
गाणी 'ती'च्या
मनातली असं करता येईल! अल्बमच्या
नावाप्रमाणेच
या अलगद भावनांचं अगदी
हलकं फुलकं
रूप या अल्बममधल्या सगळ्याच गाण्यांमध्ये दिसतं!
ऐन तारुण्यातलं,
'कोणी हळूच यावे, माझ्या मनी फुलावे, आणि ओंजळीत घ्यावे, गंध हलके
हलके!
' असं सांगणारं
हळुवार प्रेमगीत, पावसाची ओली चाहूल लागताच
'नभं
कसं दूर दूर निळं-काळं घनभर दिसतंय गं, मन माझं थेंब थेंब
होऊन सारं भिजतय गं' हे
पाऊसगाणं ही गाणी आपल्या गोड आवाजात
बेला शेंडेंने या अल्बममध्ये गायली आहेत.
कवयित्री प्राजक्ता पटवर्धन
हिचा जरी
पहिलाच अल्बम असला तरी तिने लिहिलेल्या गीतांचं विशेष
कौतुक होतय.
पाऊस ओला
हे गाणं रेकॉर्ड करताना संगीता
चितळे आणि पौलमी पेठे
विशेषत:
'तुझी
आठवण येता, निळा डोह फेसाळतो. पापण्यांच्या तिरावर, भरतीचा
पूर येतो' हे प्राजक्ताचे शब्द,
अभिजीत
राणेंनी दिलेलें
हृद्य संगीत, व्हायोलिनचे आर्त स्वर आणि
अमृता काळे हिचा ओथंबलेला आवाज यांनी तयार झालेलं विरह गीत
जिव्हारी लागणारं झालय आणि ते या अल्बमचं खास वैशिष्ट्य
म्हणायला हरकत नाही! ( हे गाणं प्लेलिस्ट मध्ये खाली दिलं
असून ते आवर्जून ऐका!)
.याव्यतिरीक्त झी सारेगमप महागायिका
संगीता चितळे
यांनी गायलेलं
पंख लागले
हे गाणं,
मधुरा दातारने
गायलेलं
धुंदीत प्रिया
आणि
मनात माझ्या
ही गाणी,
पौलमी पेठेचा
सहभाग असलेला
पाऊस ओला
हे गाणं आणि खास
वैशाली सामंत
स्टाईलची
रातीला या
आणि
रात मधुमती
ही सगळीच गाणी
अप्रतिम झाली आहेत!
या अल्बममधील नभं कसं
दूर दूर.. हे गाणं
खास चर्चेत आहे.
या गाण्याबद्दल प्राजक्ताला विचारलं असता ती म्हणते,
" हे गाणं खरतर
चालीवर लिहिलं गेलयं. अभिजीतने मला चाल ऐकवली..
आणि मी विचार करत बसले! यावर काय लिहिणार? मग डोळे बंद
करून विचार
केला तेंव्हा डोळ्यासमोर मी कुठेतरी
डोंगरावर उभी आहे आणि दुरून पावसाचे ढग येताना दिसतायत असं
काहीसं चित्र आलं.
मग "नभं कसं दूर दूर निळ-काळं घनभर दिसतय गं, मन माझं थेंब थेंब
होऊन सारं भिजतय गं" हे शब्द सुचले. अभिजीतने नंतर ती संपूर्ण चाल आणि माझे
शब्द म्युझिकसह मला पाठवले. मला ते इतकं आवडलं की
त्यावेळेस अगदी मी घरभर नाचले होते!.. नंतर हे गाणं
बेलाच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि तिने त्या गाण्याचं
अक्षरश: सोनं केलय
हे काही वेगळ सांगायची गरज नाही!"