"Gard Nila Gaganzula|Marathi music album|Download MP3 songs:Maanbindu.com"

SocialTwist Tell-a-Friend

 • गायक :
  सुरेश वाडकर, शिल्पा पै, ह्रषिकेश कामेरकर, उदेश उमप, हम्सिका अय्यर
 • संगीत :
  कौशल इनामदार
 • संगीत संयोजन :
   कमलेश भडकमकर
 • वादक :
  पं. उल्हास बापट (संतूर), विजय तांबे (बासरी), राजेंद्र सिंह (स्वरलिन), जयंत गोशार (गिटार), बास गिटार (अजय मदन), व्हायोलिन (महेश खानोलकर)
कवी अशोक बागवे यांनी लिहिलेल्या प्रणयगीतांना संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध करून रसिकांसमोर आणलेला अल्बम म्हणजे 'गर्द निळा गगनझुला'. हम्सिका अय्यर या मुळ तामिळ गायिकेने या अल्बम मधलं 'गर्द निळा गगनझुला' हे Title Track गायलयं. मुळ तामिळ असूनही हे गाणं पहिल्याच टेक मध्ये अगदी व्यवस्थित रेकॉर्ड झालं. या अल्बम मध्ये असलेलं 'वासाचा पयला' हे गावरान गाणंही या अल्बमची खासियत म्हणावी लागेल.पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम यामधला दुवा साधणारं हे गाणं मूळ संगमेश्वरी बोलीतलं असून प्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठ्ल उमप यांचा सुपुत्र  उदेश उमप याने गाण्याला अतिशय साजेसा गावरान बाज दिलाय.  त्यामुळे हे गाणं ऐकणं हा नक्कीच आपल्यामध्ये एक वेगळा अनुभव आहे. या व्यतिरीक्त 'सोनीयाच्या गाली' हे गाणं तसच 'चांदणे वळले कुशीवर' आणि तीव्र मध्यम स्वरांवर थांबणारं 'अशी दुपार' या दोन गझलाही या अल्बम मध्ये ऐकायला मिळतील.

श्रेयस तळपदेवर चित्रीत केलेला व्हिडीयो -- सोनियाच्या गाली

 या अल्बमच्या वेळच्या गमतीजमती बद्दल कौशल इनामदारांना छेडलं असता ते म्हणतात, " अल्बम बनवताना खूप मजेदार किस्से झाले, त्यातला एक सांगतो. अल्बमचं एकदा रेकॉर्डींग चाललं होतं, आम्ही सगळे कामात खूप गर्क होतो आणि रात्रीचे तब्बल दोन वाजले होते. त्यातही कहर म्हणजे या अल्बमचं संगीत संयोजन करणा-या कमलेश भडकमकर याचं दुस-या दिवशी लग्न होतं.  मला ते एकदम आठवलं आणि मी त्याला म्हटलं, अरे दोन वाजलेत आणि उद्या लग्न आहे नं तुझं !!??  पण तो ही कामात इतका गर्क होता की कामाच्या गडबडीत  ते ऐकून न ऐकल्यासारखं करत तो म्हणाला, हो... बघ ना यार, हे लग्न पण मध्येच आलयं.."

 
Share

गाणी ऐकूया

Ring-tones

गर्द निळा गगनझुला

वासाचा पयला

 

अल्बमची किंमत : ९९ रु. फक्त

Delivery :

 

Instant Download! (42 MB)

 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists : About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us