Halavepan:Marathi music album|Download Halavepan MP3|Order Halavepan CD
SocialTwist Tell-a-Friend
संकल्पना गाणी ऐकूया
आठवणीतल्या आठवणी ऑनलाईन खरेदी करा
Halavepan download MP3 songs, order CD
Halavepan
  • संगीत आणि गायन:
    सुधांशु जोशी
  • गीतकार :
    अभिजीत दाते
  • संगीत संयोजन :
    उदय चितळे, सुधांशु जोशी
  • ताल संयोजन :
    श्रीकांत राईलकर
  • गिटार :
    अमोघ दांडेकर
  • ध्वनीमुद्रण, मिक्सींग :
    परीक्षित कुलकर्णी

"हळवेपण" हा काव्या क्रिएशन्स प्रस्तुत करत असलेला सुधांशु जोशी आणि अभिजीत दाते या संगीतकार-कवी जोडीचा पहिलाच अल्बम.

"हळवेपण" बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, हा मानवी भावभावनांचा कॅलिडोस्कोप आहे, ज्यात डोकावल्यावर प्रेम, विरह, आर्तता, हतबलता आणि आशावादाची नक्षी दिसून येईल. नावाप्रमाणेच विविध भावनांचं हळवं रूप या अल्बममधल्या सगळ्याच गाण्यांमध्ये दिसतं. तिच्या आठवणीत रमतानाचं 'तुझी आठवण बरी', 'प्रेम' आणि 'पाऊस' यात अद्वैत व्यक्त करणारं 'पाऊस', आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना अलगद ओठावर येणारं 'गेली जिंदगी' आणि जीवनातल्या सार्‍या भावनांचा कोलाज असलेली 'कितीसा' ही गझल, या सार्‍यातच अभिजीतचे शब्द आणि सुधांशुचे स्वर हातात हात घालून सामोरे येतात.

सुप्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांनी हळवेपण च्या प्रकाशनावेळी दिलेली मनसोक्त दाद.

प्रथमच संगीतकार म्हणून पदार्पण करणार्‍या सुधांशुच्या चालीत एक नावीन्य जाणवतं. त्याने संगीतबद्ध केलेलं, लाईट रॉक प्रकारातलं 'बरेच काही', 'बोसा बीट्स' वर बेतलेलं ६०-७० च्या दशकाची आठवण करून देणारं 'बेत आहे' आणि मेलडीत चिंब भिजवून टाकेल असं 'पावसाने' ही गाणी आपली वेगळी छाप सोडून जातात. 'गेली जिंदगी' गझलेचा शास्त्रीय साज आणि 'कितीसा' या गैरमुसलसल गझलेचा फ्युजन बाज त्यातल्या शब्दांना योग्य न्याय देऊन जातो.

या अल्बमचं प्रकाशन सुप्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांच्या शुभहस्ते नुकतच पार पडलं. त्यांनीही या अल्बमला अतिशय दिलखुलास अशी दाद दिली. सुधांशु, अभिजीत या जोडीबद्दल बोलताना संदीप खरे म्हणाले "फार कमी वेळा असं होतं की समोरची व्यक्ती भेटल्यावर ती आपल्यासारखीच, समधर्मीय आहे असं जाणवतं. या दोघांच्या बाबतीत मला असं जाणवलं म्हणूनच मी आज प्रकाशनासाठी इथे आलो."  

 [ Go to top ]
 
Share

अल्बममधील निवडक गाणी खरेदी करा! NEW



रसिकांना या अल्बममधील गाण्याचा जास्त चांगल्या पद्धतीने आस्वाद घेता यावा म्हणून सुधांशु जोशीने फक्त High Quality (320 Kbps) गाणीच ऑनलाईन डाऊनलोड ठेवावीत आणि ती ही सवलतीच्या किमतीत  असा आग्रह आमच्याकडे धरला. त्यामुळे आम्ही ही गाणी प्रत्येकी १५ रु अथवा $ ०.८ इतक्या कमी किमतीत खास मानबिंदूच्या रसिकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. तसच अल्बममधील सगळी ९ गाणी ,९९ रु किंवा $३ मध्ये ऑनालाईन डाऊनलोड साठी उपलब्ध आहेत.

 
  Shopping cart
सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून  मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या!

बरेच काही (333 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.0 out of 32 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

बेत आहे (134 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.16 out of 19 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

हळवेपण (206 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.55 out of 31 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

तुझी आठवण (122 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.5 out of 20 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

पाऊस (102 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.39 out of 18 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

गेली जिंदगी (104 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.67 out of 15 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

पावसाने (85 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.83 out of 12 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

कितीसा (94 Plays)
गायन : सुधांशु जोशीजोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.54 out of 13 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

पावसाने (इन्स्ट्रुमेंटल) (50 Plays)
गायन : सुधांशु जोशी | गीतकार : अभिजीत दाते
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.71 out of 7 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 15 or $0.8

या अल्बमधली गाणी आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रीणींबरोबर नक्की शेअर करा!
या अल्बमचं सरासरी मानांकन :   (4.41 with 167 votes in 1230 plays)

संपूर्ण अल्बम खरेदी करा, किंमत रू ९९ फक्त!


CD ऑर्डर करा   सगळ्या गाण्यांच्या MP3 डाऊनलोड करा
Delivery :
  (320 kbps)
Rs 99 Only! USD 3 Only! Rs 99 Only!
 

हा अल्बम तुम्ही खालील पर्यांयांसह ऑनलाईन खरेदी करू शकता. [ Go to top ]
Online Payment Options

 गायक, संगीतकार सुधांशु जोशी अल्बमबद्दल आठवणी सांगताना

सुधांशु जोशीचा हा संगीतकार म्हणून पहिलाच अल्बम असल्याने या अल्बमच्या त्याच्या काही खास आठवणी आहेत! तो म्हणतो, "गाणी कुठली घ्यायची हे ठरल्यापासून ते One and only संदीप खरे यांच्या हस्ते अल्बमचं प्रकाशन हा 'हळवेपण'चा गेल्या वर्षभरातला प्रवास आठवायचा म्हटला तर तो सुखद, सुकर आणि स्वप्नवतच होता असं मी म्हणेन. या प्रवासात वेगवेगळ्या वळणांवर ट्रॅक रेकॉर्डींग, रिदम-साईड रिदमचं प्रोग्रॅमिंग,  स्टुडीअऑमधलं अकोस्टीक रेकॉर्डींग, व्हॉईस रेकॉर्डींग आणि मिक्सींग असे अनेक टप्पे एकामागून एक सहज येत गेले. विशेष म्हणजे या प्रवासात मला मार्गदर्शक सहप्रवासी ताकदीचे लाभले. त्यामुळे प्रवास मोठा असला तरी कुठे खाचखळगे, गतिरोधक असे लागले नाहीत :)

यातल्या दोन घटना विशेष सांगाव्याशा वाटतात. पहिली म्हणजे 'बरेच काही' या गाण्यासाठी गिटारचं रेकॉर्डींग सुरू होतं. अमोघ दांडेकरने पहिला एक ते दीड तास गाण्याचा कॉर्ड चार्ट समजावून घेतला आणि वाजवला. या संपूर्ण ट्रॅकचं नंतर DT म्हणजे डबल ट्रॅक करायचं ठरलं  आणि अमोघने केवळ एका टेक मध्ये अख्ख्या गाण्याचा DT जसाच्या तसा वाजवला आणि मी थक्क झालो. हा माणूस अजय अतुल बरोबर किंवा सारेगमप मध्ये का वाजवतो हे मला तेंव्हा कळलं. यातली दुसरी घटना म्हणजे श्रीकांत राईलकरांनी केवळ ८ दिवसात केलेलं १४ गाण्यांचं केलेलं रिदमचं प्रोग्रॅमिंग आणि नंतरच्या नवव्या दिवशी एकाच दिवसात सगळ्या गाण्यांचं केलेलं स्टुडीओतलं रेकॉर्डींग तितकच थक्क करणारं होतं.  एकूणच माझ्या सगळ्या गाण्यांना उदय चितळे सर, अमोघ, परीक्षित, श्रीकांत यातल्या प्रत्येकाने आपलं करून  मोलाचं योगदान दिल आहे. म्हणूनच एक चांगला अल्बम मला रसिकांना देता आला असं मी म्हणेन."

[ Go to top ]

 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us