Marathi Album: Krishna Bavari Radha by Swapnil Bandodkar - music.maanbindu.com

SocialTwist Tell-a-Friend

 • कवयित्री
  वृंदा भांबुरे
 • गायक
  साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर Open in new window, वैशाली सामंत
 • संगीत :
  अभिजीत राणे Open in new window
 • संगीत संयोजन :
   प्रशांत लळीत,अभिजीत नार्वेकर (ताल संयोजन)
 • वादक :
  पं.उल्हास बापट, पं.उमाशंकर शुक्ला, मनिष कुळकर्णी, योगेश मोरे, विजय शिवलकर, प्रभाकर मोसमकर,
 • कोरस :
  अदिती कुलकर्णी, नीता कानिटकर आणि भाग्यश्री महाजन
राधाकृष्णाच्या प्रणयगीतांनी आजवर अनेक रसिकांना मोहिनी घातलेली आहे. 'कृष्णबावरी राधा' हा अल्बम ऐकताना तीच तन्मयता आपल्याला जाणवते.

कवयित्री वृंदा भांबुरे यांनी गेल्या १५-१६ वर्षात अनेक विषयांवर विपुल गीतलेखन केले आहे. यातल्या राधा-कृष्णावर लिहिलेल्या १५ ते २० गीतांपैकी काही निवडक  गीतांना अभिजीत राणे यांनी चाली लावल्या आणि पहाता पहाता सुंदर असा अल्बम तयार झाला.

कवयित्री वृंदा भांबुरे यांनी लिहिलेल्या गीतांना यापूर्वी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी कै. ग.दि. माडगूळकर तसच ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्याकडूनही कौतुकाची थाप मिळाली आहे. अल्बमच्या प्रकाशनाच्या वेळीही ज्येष्ठ संगीतकार श्री. श्रीधर फडके यांनी त्यांच्या शब्दलालित्याचे विशेष कौतुक केले.

 

स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम आणि श्रीधर फडके या अल्बम बद्दल आपलं मत व्यक्त करताना..

फाऊंटन म्युझिक कंपनीतर्फे रिलीज झालेल्या या अल्बमच्या आठवणींबद्दल गीतकार आणि निर्मात्या वृंदा भांबुरे यांच्याशी गप्पा मारत असताना त्या म्हणतात, "माझ्या वडिलांच्या मराठी साहित्याच्या अभ्यासामुळे मला खरं तर कवितांची गोडी लागली. तसंच माझ्या आईने गायलेली सुरेल भजने आणि कृष्णगीते ऐकून राधाकृष्णाच्या प्रेमगीतांची निर्मीती करण्याची प्रेरणा मला झाली. थोडं विषयांतर करून सांगते; साधारणत: १९७० साली शाळेमध्ये झालेल्या स्नेहसंमेलनात मी राधा-कृष्ण या विषयावर एक गीत लिहून नृत्य बसवले होते. त्यावेळी तिथे ज्येष्ठ कवी कै. ग. दि. माडगूळकर ही हजर होते. त्यांना माझी ती कविता इतकी आवडली की त्यांनी माझ्याकडून ती कविता लिहिलेली वही घेतली आणि त्यावर स्वत:ची सही देखील केली. त्यांचाकडून मिळालेल्या प्रशंसा आणि आशीर्वादामुळे माझ्यातल्या सुप्त कवयित्रीला प्रेरणा मिळाली. त्यातूनच पुढे विविध विषयांवर काव्यनिर्मिती माझ्याकडून होत गेली.अभिजीतनेही शब्दातील आशयाचे सौंदर्य ऒळखून त्यानुसार सुरेख चालींची रचना केली म्हणूनच हा सुंदर अल्बम रुपास येऊ शकला!"

 
Share

हा अल्बम खरेदी करण्यासाठी कृपया 92219 02623 / 022-25630867 या क्रमांकांवर संपर्क साधावा (ऑनलाईन विक्रीसाठी हा अल्बम सध्या उपलब्ध नाही)

गाणी ऐकूया Ring-tones

सखे गं मंदीरी आले श्याम

खेळीया रे

 

 
 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker
Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists : About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us