Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us
Lilav Marathi music album by Shridhar Phadke | Download MP3 songs

Lilav - Marathi Music album by Composed by Shreedhar Phadke

श्रीधर फडके या अल्बमबद्दल दोन शब्द सांगताना..

श्रीधर फडके 'अफाट अंतर' हे गीत सादर करताना

श्रीधर फडके 'झुळूक तुझ्या दिसण्याची' हे गीत सादर करताना

गुरू ठाकूर अल्बमबद्दल आपलं मतं व्यक्त करताना

श्रेयनामावली

  • संगीतकार : श्रीधर फडके
  • गीतकार कुसुमाग्रज, शांता शेळके, प्रवीण दवणे, नितीन आखवे, गुरू ठाकूर
  • स्वर :  श्रीधर फडके, आरती अंकलीकर, आनंद भाटे, बेला शेंडे, प्रसेनजित कोसंबी, सुदेश भोसले
  • निर्मीती संस्था : VSS Multimedia
  • वाद्यवृंद रचना : अरविंद हसबनिस, शामराव कांबळे
  • रेकॉर्डींग : सत्यजित चिखले, बझ इन स्टुडीयो, विलेपार्ले
  • ऑनलाईन आणि मोबाईल डिस्ट्रीब्युशन : मानबिंदू म्युझिक

संकल्पना

संगीतकार श्रीधर फडके हे मराठी भावसंगीतातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व! ऋतु हिरवा, तेजोमय नादब्रम्ह, संगीत मनमोही रे अशा अनेक अल्बम्सनी मराठी मनाला गेली अनेक वर्षे घातलेली मोहीनी अजूनही तशीच आहे. यात भर म्हणून श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गीतांचा "लिलाव" हा नवीन अल्बम आपणासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आधीच्या पिढीतले ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज, कवयित्री शांता शेळके तसेच  आजच्या पिढीतील ज्येष्ठ कवी श्री. प्रवीण दवणे, नितीन आखवे  आणि तरूण गीतकार गुरू ठाकूर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गीतांचा हा अल्बम. या अल्बममधील आनंददायी गीतांबरोबरच १९३४ साली कुसुमाग्रजांनी लिहिलेली, शेतक-यांच्या भीषण प्रश्नांचे आणि वेदनांचे प्रत्ययकारी चित्रण करणारी लिलाव ही कविता आपल्याला नक्कीच अंतर्मुख करते. या कवितेतले सत्य आणखी गडद केले आहे ते गुरू ठाकूरांच्या प्रारंभीच्या चार ओळींनी! मनाला चटका लावणारे हे चित्र श्रीधरजींनी आपल्या संगीतातून समर्थपणे उभे केले आहे आणि तेच या अल्बमचं शीर्षक गीत म्हणून निवडण्यात आलय! याबरोबरच  "तुझ्या पापण्यांच्या आत" आणि "झुळूक तुझ्या दिसण्याची" ही खास 'श्रीधर फडके टच' असलेली भावगीते आपल्याला विशेष आनंद देऊन जातात. नुकतेच बालगंधर्व या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले गायक श्री. आनंद भाटे यांनी गायलेले "मागण्यास मी आलो जे", आरती अंकलीकरांनी गायलेले शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारे "गगना गंध आला" हे गीत , बेला शेंडेने गायलेलं "घुमघुम घुमघुम घुमता वनी" ही गाणी देखील खास ते गायक नजरेसमोर ठेऊन श्रीधरजींनी संगीतबद्ध केल्याचं आपल्याला जाणवतं. त्याचप्रमाणे कुठलही तालवाद्य न वापरतां केवळ व्हायोलीन्स, पियानो आणि स्पॅनिश गिटार वापरून केलेलं आणि साधारण १९६० सालच्या संगीताची आठवण करून देणारं, सुदेश भोसलेंच्या भरदार आवाजातलं "अफाट अंतर" हे गाणं देखील विशेषच! या सगळ्यामुळे श्रीधरजींचा हा ही अल्बम मराठी संगीत रसिकांसाठी 'फिस्ट' ठरेल हे मात्र नक्की!

Download Noraml quality MP3 tracks

या अल्बममधील  सगळ्या आठही गाण्यांचे  Normal Quality Tracks (128KBPS ) सवलतीच्य किमतीत येथून डाऊनलोड करा.

Download High Quality MP3 tracks

या अल्बममधील  सगळ्या आठही गाण्यांचे  High Quality Tracks (320KBPS ) सवलतीच्य किमतीत येथून डाऊनलोड करा.

Order A CD

भारतामध्ये कुठेही या अल्बमची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता!

Rs 100/-

निवडक गाणी खरेदी करा!

 
  Shopping cart
सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून  मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या!

तुझ्या पापण्याचा आत (188 Plays)
गायन : श्रीधर फडके | गीतकार : कुसुमाग्रज
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.5 out of 20 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

गगना गंध आला (237 Plays)
गायन : आरती अंकलीकर | गीतकार : शांता शेळके
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.53 out of 30 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

मागण्यास आलो जे (153 Plays)
गायन : आनंद भाटे | गीतकार : प्रवीण दवणे
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.47 out of 17 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

घुम घुम घुमता वनी (137 Plays)
गायन : बेला शेंडे | गीतकार : प्रवीण दवणे
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.0 out of 13 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

झुळूक तुझ्या दिसण्याची (137 Plays)
गायन : श्रीधर फडके | गीतकार : प्रवीण दवणे
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.33 out of 12 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

अफाट अंतर (89 Plays)
गायन : सुदेश भोसले | गीतकार : प्रवीण दवणे
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.14 out of 7 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

लिलाव (137 Plays)
गायन : प्रसेनजित कोसंबी | गीतकार : गुरु ठाकूर, कुसुमाग्रज
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.38 out of 21 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

इतिहास कालचा (91 Plays)
गायन : श्रीधर फडके | गीतकार : नितीन आखवे
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.0 out of 12 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 20 or $0.95
Set as your Caller Tune

या अल्बमचं सरासरी मानांकन :   (4.36 with 132 votes in 1169 plays)

वेबवर अन्यत्र उपलब्ध

मानबिंदू म्युझिक तर्फे हा अल्बम वेबवर अन्यत्र खालील ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे!
"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने २०० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!


मानबिंदूवर उपलब्ध असणारे अन्य अल्बम्स


अभिप्राय लिहा