'मस्त शारदीय रात', नावाप्रमाणेच मस्त गीतांचा हा नजराणा!
उत्कृष्ट मराठी साहित्याचा राज्य पुरस्कार आणि आपल्या
तरुणपणी खुद्द पं. जवाहरलाल नेहरूंच्याहस्ते
पुरस्कार स्विकारणा-या
जेष्ठ कवी
कै. डॉ. वसंत कृष्ण व-हाडपांडे
यांची काही गीते या
अल्बमद्वारे लोकांपर्यंत पोहोचावी हा या अल्बममागचा मूळ
हेतू! 'स्मृतीगंध'
तर्फ़े प्रकाशित झालेल्या या अल्बममधली सगळीच गाणी सहज
गुणगुणावीत अशीच आहेत. सुरेश
वाडकरांची शास्त्रीय बाजाची आणि वेगवेगळ्या मूड्सची
गाणी अप्रतिम आहेत.श्रेया
घोषाल या सध्याच्या लोकप्रिय पार्श्वगायिकेचा
मधाळ आणि प्रसन्न स्वर हे या अल्बमचे
आणखी एक वैशिष्ट्य! संगीतकार
अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध
केलेली 'मेंदी
भरल्या पाउली' आणि 'मनात माझ्या वन
पाचूचे'
ही दोन अतिशय मेलोडीयस गाणी
श्रेयाने गायली आहेत!
या व्यतिरीक्त
सुचित्रा भागवत आणि अभिजीत
राणे यांच्या स्वरातील भावपूर्ण गीते आणि
डॉ. गिरीश ओक ह्यांच्या
निवेदनाने श्रवणीय झालेला हा अल्बम प्रत्येकाच्या संग्रही
हवाच असा आहे!
श्रेया
घोषाल या अल्बम बद्दल सांगताना
आणि अल्बम मधली काही गाणी सादर करताना..
तसं पहाता
अभिजीत राणेंनी संगीतबद्ध केलेली
गाणी आजवर अनेक दिग्गजांनी गायली आहेत. त्यामुळे आता श्रेया
बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता असं
त्यांना विचारलं असता, ते म्हणतात "श्रेया
खरोखर एक भन्नाट गायिका आहे. आमचं जेंव्हा रेकॉर्डींग होतं
त्याच दिवशी ती सुप्रसिद्ध तामिळ संगीत दिग्दर्शक इलाय
राजाकडे गाऊन आली होती. तामिळ भाषेतला ळ या शब्दाचा उच्चार
आणि मराठी मधला उच्चार यामध्ये फ़रक आहे, तो तिने उत्तम
सांभाळला. याव्यतिरीक्त मी स्वत: गायक असल्याने तिच्याकडून
गाऊन घ्यायची असलेली गाणी मी आधी तिला गाऊन दाखवली.त्या
गाण्याची चाल तर तिने पटकन आत्मसात केलीच पण श्रेया मूळ
बंगाली असताना ही नवीन भाषा, त्याचा लहेजा
तिने व्यवस्थित सांभाळले. गाताना आवाज कुठे सॉफ़्ट करायचा,
कुठे नाही अशा छोट्या गोष्टी तिला रेकॉर्डींगच्या वेळेस
पुन्हा सांगाव्या लागल्या नाहीत. तिची Grasping Power
खरोखर जबरदस्त आहे!"