Marathi Album: Mast Shardiya Raat by Shreya Ghoshal - music.maanbindu.com

SocialTwist Tell-a-Friend

 
   

  • कवी
    डॉ. वसंत कृष्ण व-हाडपांडे
  • गायन :
    श्रेया घोषाल, सुरेश वाडकर, सुचित्रा भागवत आणि अभिजीत राण Open in new window
  • संगीत :
    अभिजीत राणे Open in new window
  • वादन
    पं उल्हास बापट, पं उमाशंकर शुक्ला, विजय तांबे, महेश खानोलकर, राजू साळवी, मनिष कुलकर्णी,अनिल करंजवकर,
  • संगीत संयोजन :
    प्रशांत लळीत
  • निवेदन :
    डॉ. गिरीश ऒक

'मस्त शारदीय रात', नावाप्रमाणेच मस्त गीतांचा हा नजराणा! उत्कृष्ट मराठी साहित्याचा राज्य पुरस्कार आणि आपल्या तरुणपणी खुद्द पं. जवाहरलाल नेहरूंच्याहस्ते पुरस्कार स्विकारणा-या जेष्ठ कवी कै. डॉ. वसंत कृष्ण व-हाडपांड  यांची काही गीते या अल्बमद्वारे लोकांपर्यंत पोहोचावी हा या अल्बममागचा मूळ हेतू!
'स्मृतीगंध' तर्फ़े प्रकाशित झालेल्या या अल्बममधली सगळीच गाणी सहज गुणगुणावीत अशीच आहेत. सुरेश वाडकरांची शास्त्रीय बाजाची आणि वेगवेगळ्या मूड्सची गाणी अप्रतिम आहेत.श्रेया घोषाल  या सध्याच्या लोकप्रिय पार्श्वगायिकेचा मधाळ आणि प्रसन्न स्वर हे या अल्बमचे आणखी एक वैशिष्ट्य! संगीतकार अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेली 'मेंदी भरल्या पाऊली' आणि 'मनात माझ्या वन पाचूचे' ही दोन अतिशय मेलोडीयस गाणी श्रेयाने गायली आहेत! या व्यतिरीक्त सुचित्रा भागवत आणि अभिजीत राणे यांच्या स्वरातील भावपूर्ण गीते आणि डॉ. गिरीश ओक ह्यांच्या निवेदनाने श्रवणीय झालेला हा अल्बम प्रत्येकाच्या संग्रही हवाच असा आहे!

 

   श्रेया घोषाल या अल्बम बद्दल सांगताना आणि अल्बम मधली काही गाणी सादर करताना..

 तसं पहाता अभिजीत राणेंन Open in new window संगीतबद्ध केलेली गाणी आजवर अनेक दिग्गजांनी गायली आहेत. त्यामुळे आता श्रेया बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता असं त्यांना विचारलं असता, ते म्हणतात "श्रेया खरोखर एक भन्नाट गायिका आहे. आमचं जेंव्हा रेकॉर्डींग होतं त्याच दिवशी ती सुप्रसिद्ध तामिळ संगीत दिग्दर्शक इलाय राजाकडे गाऊन आली होती. तामिळ भाषेतला ळ या शब्दाचा उच्चार आणि मराठी मधला उच्चार यामध्ये फ़रक आहे, तो तिने उत्तम सांभाळला. याव्यतिरीक्त मी स्वत: गायक असल्याने तिच्याकडून गाऊन घ्यायची असलेली गाणी मी आधी तिला गाऊन दाखवली.त्या गाण्याची चाल तर तिने पटकन आत्मसात केलीच पण श्रेया मूळ बंगाली असताना ही नवीन भाषा, त्याचा लहेजा तिने व्यवस्थित सांभाळले. गाताना आवाज कुठे सॉफ़्ट करायचा, कुठे नाही अशा छोट्या गोष्टी तिला रेकॉर्डींगच्या वेळेस पुन्हा सांगाव्या लागल्या नाहीत. तिची Grasping Power खरोखर जबरदस्त आहे!"

हा अल्बम खरेदी करण्यासाठी कृपया 99233 21884 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा seemah4@yahoo.co.in वर ई-मेल करावे [ Disclaimer ]

गाणी ऐकूया

Ring-tones

रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी  लिंकवर राईट क्लिक करा आणि  'Save Target as..' हा पर्याय निवडा

  • मेंदी भरल्या पाऊल

    रिंगटोन डाऊनलोड करा
    या कॉलरट्य़ून साठी Airtel वरून 55055410216 डायल करा
    व्होडाफ़ोन साठी CT 15003358 हा SMS 56789 वर पाठवा


  • कोसळले गगन जरी

    रिंगटोन डाऊनलोड करा


  • या कॉलरट्य़ून साठी Airtel वरून 55055410222 डायल करा
    व्होडाफ़ोन साठी CT 15003364 हा SMS 56789 वर पाठवा
 
* आपले अभिप्राय हे फक्त ह्या पानाशी/त्यावरील माहितीशी संबंधित असावेत. अन्य अभिप्राय लिहिण्यास येथे टिचकी मारा.
*  लॉगिन न करताही अभिप्राय लिहिणे शक्य आहे तरीही सहसा लॉगिन करूनच अभिप्राय लिहावेत. जेणेकरून गरज पडल्यास तुमचा अभिप्राय डिलीट करण्याची सोयही तुम्हाला वापरता येईल.लॉगिन करण्यास येथे टिचकी मारा.
*  गूगल च्या पद्धतीने म