Sangit ManMohi Re|Marathi music album|Download MP3 songs:Maanbindu.com
संगीत
मनमोही रे या अल्बमला बिग ९२.७ या FM
वाहिनीच्या 'सर्वोत्कृष्ट
म्युझिक अल्बम' आणि आरती अंकलीकरांना सर्वोत्कृष्ट
गायिका या पुरस्कारासाठी नामांकन
मिळाले
आहे!
संगीत :
श्रीधर फडके
कवी
सुरेश भट, संदीप खरे,
मंगेश पाडगावकर,
प्रवीण दवणे,
प्रसाद कुलकर्णी,
शिरीष देशपांडे,
नितीन आखवे
लोकप्रिय संगीतकार
श्री. श्रीधर
फडके यांच्या संगीताने सजलेला
संगीत मनमोही रे हा
अल्बम म्हणजे मराठी भावगीतातील एक समृद्ध पाऊलच जणू! आपल्या
वैशिष्टयपूर्ण संगीतशैलीने रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या
श्रीधरजींनी
या अल्बममध्ये शास्त्रोक्त संगीतापासून
पाश्चिमात्य संगीत सुरावटींपर्यंत अनेक छटांचा उपयोग केला
आहे!
रागदारी संगीतावर आधारलेले
संगीत मनमोही रे
हे टायटल ट्रॅक
आणि ऐसे गावे गीत
ही गाणी
आरती अंकलीकर टिकेकरांनी
या अल्बमसाठी गायली आहेत.
स्वप्नील
बांदोडकर ने गायलेली
बरे नाही अवेळी
ही कव्वाली
अप्रतिम झाली आहे तर
अवधूत
गुप्तेने
यॉडलिंग करत
गायलेलं
एकट्याने एकटे
हे गाणं थेट किशोरकुमारच्या काळात घेऊन जातं.
( हे गाणं आम्ही प्ले-लिस्ट खाली दिलेलं आहे. आवर्जून ऐका!)
याबरोबरच आगगडीच्या लयीत गुंफलेले आणि बंगाली वातावरणाची
आठवण करून देणारे
घुमे मेघु रे
हे गीत आणि
अमृता सुभाषने गायलेले १९६० च्या दशकातील क्लब नृत्याच्या
तालावर डोलायला
'ओ सायबा' लावणारे
हे गीत; अशी हटके गाणीही
यात आहेत.
स्टार माझा या वाहीनीने श्री श्रीधर फडके
यांची या अल्बमसंदर्भात
घेतलेली मुलाखत .
हिंदीतल्या सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका
रिचा शर्मा
यांनीही
या अल्बममध्ये गायलेल्या
राम तू शाम तू
या गझलेद्वारे मराठीत पदार्पण केलयं.
थोडक्यात काय तर चोखंदळ रसिकांसाठी हा अल्बम म्हणजे एक
पर्वणीच ठरणार आहे!
मध्यंतरी स्टार माझा या वाहीनीने श्री श्रीधर फडके
यांची या अल्बमसंदर्भात सुंदर मुलाखत घेतली होती. खास
मानबिंदूच्या रसिकांसाठी ती येथे देत आहोत..
या अल्बममधील
घुमे मेघु रे
हे गाणं अगदीच वेगळ्या ढंगाचं आहे!
फ़ार पूर्वीच्या काळात मराठीमध्ये जसे बरेच उकारान्त शब्द
वापरले जायचे तसे शब्द या गाण्यासाठी वापरले आहेत. त्यातच
या शब्दांना दिलेलं वेगवान संगीत आणि सुदेश भोसले यांची एस.
डी. बर्मन यांच्या स्टाईलची गायकी, यामुळे एक अभूतपूर्व
रसायनच तयार झालयं असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच हे
गाणं या अल्बमचं वैशिष्ट्य म्हणता येईल. या गाण्याबद्दल
श्रीधरजींना विचारलं असता ते म्हणतात,"
हे गाणं लिहिण्यासाठी मी प्रवीण दवणे
यांना सांगितलं की अशी कल्पना करा की तुम्ही एका आगगाडीत
बसले आहात. बाहेर पाऊस पडतोय. मन खूप आनंदी आहे आणि ते अगदी
पार भूतकाळात गेलय, अगदी ज्ञानेश्वरीच्या काळात! त्या
काळातले शब्द कसे उकारान्त असायचे त्या प्रकारचे शब्द मला
हवे आहेत! त्यांनी फार अप्रतिम शब्द लिहून दिले आहे,
त्यातच स्वप्नील आणि सुदेश दोघही फार उत्तम गायलेत,
म्हणूनच गाणंही फार छान झालयं!"