
या अल्बमच्या आठवणींबद्दल गीतकार आणि निर्मात्या
जयश्री
कुळकर्णी अंबासकर
यांच्याशी गप्पा मारत असताना त्या म्हणतात, "हा अल्बम करत असताना इतके
हृदयस्पर्शी अनुभव आलेत ना की "आता पुढे काय" हा प्रश्न
पडायच्या आधीच उत्तर आमच्यापुढे तयार असायचं; म्हणजे
एखादी रेशीमलडी सरळ उलगडत जावी तसं हे सगळं घडत गेलं! रेकॉर्डींगच्या वेळचा एक अनुभव आठवतोय.आम्ही सगळे असे
पार्ल्याच्या बझ-इन स्टुडियोत तालवादकांसोबत बसलो होतो.
प्रशांत लळीत त्यांना नोटेशन सांगत होता, तेव्हा माझ्या असं
लक्षात आलं की "सारे तुझ्यात आहे" ह्या गझलमधे अभिजीतने
फ़क्त चारच शेर घेतले आहेत. मी त्याला म्हटलं, अरे गझलेत
कमीत कमी पाच शेर तरी असायला हवेत. तर अभिजीतने तिथल्या
इतक्या गोंधळात सुद्धा एक कडवं कंपोझ केलं आणि ते त्या
गाण्यातलं सगळ्यात जबरदस्त कडवं झालं!" |