
Swapnat Mazya - Marathi Romatic album composed Kedar-Vibhas & sung by Neha Rajpal, Swapnaja lele, Vishwajeet Borwankar, Mugdha Hasabnis.
संकल्पना
स्वप्नात माझ्या हा केदार-विभास या संगीतकार जोडीचा दुसरा आणि रोमँटीक अल्बम तुम्हा रसिकांसमोर घेऊन येताना मानबिंदू म्युझिक तर्फे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. गीतकार अमोल कशेळकर यांनी या अल्बमद्वारे मराठी संगीतसृष्टीत दमदार पदार्पण केलं आहे. या अल्बमचा लोकार्पण सोहळा मानबिंदू म्युझिक प्रस्तुत "आमची गाणी - मेलोडीयस गाण्यांची अविस्मरणीय ट्रीट" या कार्यक्रमात २९ डिसेंबर रोजी डोंबिवली येथे पार पडला. आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी हीने या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं होतं. या अल्बमचं अनावरण अगदी अनोख्या पद्धतीने झालं आणि ते म्हणजे कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या ७० वर्षाच्या पुढील आजी-आजोबांनी या अल्बमच अनावरण केलं. यावेळेस अल्बमधी संबंधित असलेल्या कलाकारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
या अल्बमची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील! त्यातलं पहिलं वैशिष्ट्य केदार-विभास या जोडीने गाण्यांच्या भाषेमधले केलेले प्रयोग. "दिल का ये आलम मेरा" या गाण्यात मराठी आणि हिंदी शब्द एकत्र आले आहेत तर "स्वप्नात माझ्या" या गाण्यात मराठी आणि इंग्रजी या भाषांचं मिश्रण आहे. त्यामुळे मराठीच्या जोडीला कधी थोडं हिंदी आणि थोडी इंग्लिश असणारी ही गाणी ऐकली की आजच्या तरुण पिढीच्या भाषेचं प्रतिनिधीत्व ही गाणी करतात असं आपल्याला जाणवतं! गाण्याचं "म्युझिक अरेंजेमेंट" म्हणजेच संगीत संयोजन देखील हाच "फील" कायम राखणारं आहे.
एकीकडे तरूण पिढीशी अशाप्रकारे "कनेक्ट" होणा-या केदार-विभास यांनी जुन्या पिढीशी असलेली नाळ देखील "जीवन संगीत" या गाण्याद्वारे कायम राखली आहे. नेहा राजपाल यांच्या आवाजातलं हे अतिशय गोड गाणं आणि त्यातल्या तितक्याच गोड बासरीची जादू अनुभवली की आपल्याला थेट "मालगुडी डेज" या अत्यंत लोकप्रिय जुन्या हिंदी सिरीयलच्या टायटल ट्रॅकची आठवण झाल्याशिवात रहात नाही.
थोडक्यात सांगायचं तर नेहा राजपाल, स्वप्नजा लेले, मुग्धा हसबनीस आणि झी सारेगमप महागायक विश्वजीत बोरवणकर या सारख्या कसदार, तरूण गायकांच्या गायकीने सजलेला, अनोख्या संगीत संयोजनाने वेगळेपण जपणारा हा अल्बम तुम्हाला आवडल्या शिवाय रहाणार नाही हे नक्की!
श्रेयनामावली
- संगीतकार: केदार विभास
- गीतकार: अमोल कशेळकर
- गायन: नेहा राजपाल, विश्वजीत बोरवणकर, स्वप्नजा लेले, मुग्धा हसबनीस
- प्रकाशन संस्था: मानबिंदू म्युझिक (सर्व हक्क सुरक्षित)
Download Noraml quality MP3 tracks
या अल्बममधील सगळ्या सहा गाण्यांचे Normal Quality MP3 songs (128KBPS) सवलतीच्या किमतीत येथून डाऊनलोड करा.
Download High Quality MP3 tracks
या अल्बममधील सगळ्या सहा गाण्यांचे High Quality Tracks (320KBPS ) सवलतीच्या किमतीत येथून डाऊनलोड करा.
Order A CD Online
भारतामध्ये कुठेही या अल्बमची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता!
गाणी ऐका आणि खरेदी करा
  |
![]() |
  Shopping cart |
You haven't chosen a song yet! Buy the songs you love and encourage this artist to serve you more. सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या! |
|
|
|
|
|
|
Average rating for album :या अल्बमचं सरासरी मानांकन : |
![]() ![]() ![]() ![]() ![]() |
(4.5 with 38 votes in 119 plays) | |
Download FREE karaoke (Music) MP3 tracks
प्रत्येकामध्ये कुठेतरी एक गायक/गायिका दडलेली असते असं आम्हाला नेहमी वाटत आलय! पण प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ करण्यासाठी वादक कलाकार असणं जवळपास अशक्य आहे. म्हणूनच मानबिंदू म्युझिक तर्फे या अल्बममधील सगळ्या गाण्यांचे Karoake(music) tracks आम्ही इथे Free Downloading साठी उपलब्ध करून देत आहोत; जेणेकरून तुम्हाला या अल्बममधील तुमची आवडती गाणी कुठेही सहज गाता यावीत आणि ती सुद्धा Original म्युझिकसह!
|
|
|
|
|
|
Order A CD - COD
(Pay Cash on Delivery)
महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅश ऑन डिल्हिवरीसाठी पद्धतीने CD घरपोच मिळवा. किंमत रु १९०/- .