संगीत संयोजन
: कमलेश
भडकमकर,
प्रशांत लळीत आणि संदेश हाटे
वादक :
पं. उमाशंकर शुक्ला,
विजय तांबे, मनिष कुलकर्णी, विजय शिवलकर, प्रभाकर
मोसमकर, अभिजीत नार्वेकर
झी 'सारेगमप
- स्वप्न स्वरांचे नवतारुण्याचे' विजेत्या महागायिका
संगीता चितळे
यांचा हा पहिलाच अल्बम. या अल्बम मध्ये वेस्टर्न, क्लासिकल,
फ़्यूजन अशा निरनिराळ्या प्रकारची एकूण ९ गाणी आहेत. विवेक चितळे यांनी प्रथमच संगीतकार म्हणून
पदार्पण केलं असलं तरीही त्यांनी लावलेल्या चालीत एक
वेगळेपण जाणवतं. त्यांनी संगीतबद्ध केलेलं, हंसध्वनी
रागावर आधारीत 'हे माझ्या
जीवलगा' हे गाणं शास्त्रीय
आणि वेस्टर्न म्युझिकचा उत्तम फ़्युजन असून आपली वेगळी छाप
सोडून जातं! 'धुके धुके
तरंगते' ह्या ही गाण्याला
उत्तम त-हेने संगीतबद्ध करून त्यांनी या गाण्यांचा गूढ
शब्दांना योग्य न्याय दिल्याचं जाणवतं. अभिजीत राणेंनी
संगीतबद्ध केलेली 'काळ्या
ढगांच्या कुशीत' आणि 'रंगत
येती तरंगत येती' ही दोन गाणी
नेहमीप्रमाणेच मेलोडीयस आहेत.
संगीतकार विवेक चितळे यांच्याशी
अल्बमबद्दल गप्पा मारत असताना त्यांनी सहज एक ह्रदयस्थ
आठवण सांगितली, "धुके धुके
तरंगते या
गाण्यामध्ये आम्ही ग्रुप व्हायोलीन्सचा वापर केला आहे.सध्या
व्हायोलिन्सचा वापर करणे खर्चिक असल्याने आजकाल
व्हायोलिन या वाद्याचा वापर संगीतनिर्मीतीत
पूर्वीच्या मानाने फार कमी होतो. या अल्बमसाठी काम
करणारे व्हायोलीन वादकही अनुभवी आणि वयाने
बुजूर्गच होते. या सगळ्यांनी प्रामुख्याने जुन्या
संगीतकारांकडे काम केलं आहे. त्यांना हे गाणं खूप आवडलं
व ते म्हणाले, "बहुत दिने के बाद एक मेलोडीयस Composition
सुनने को मिला है और गाया भी इतना सुरीला है की लतादीदी की
याद आ गयी.."