Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists : About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us
Ye Priye Marathi music album by Vaishali Samant, Hrishikesh Ranade | Download MP3 songs

Ye Priye : Marathi Music album Sung by Hrishikesh Ranade, Vaishali Samant, Composed by Panu Ray, Surojit Ray

मराठी संगीताला आता बंगाली मिठाईचा गोडवा! ये प्रिये या अल्बमद्वारे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ बंगाली संगीतकार पानु रे आणि त्यांचा सुपूत्र सुरोजीत रे यांचे मराठी संगीतक्षेत्रात पदार्पण!

ह्रिषिकेश रानडे अल्बमबद्दल सांगताना

वैशाली सामंत अल्बमबद्दल सांगताना

संगीतकार पानु रे आणि सुरोजित रे यांची मुलाखत

ह्रिषिकेश रानडे संगीतकार पानु रें कडून शिकताना

वैशाली सांमत अल्बममधील गाणं गुणगुणताना

श्रेयनामावली

 • संगीतकार : पानु रे, सुरोजीत रे
 • गीतकार : प्राजक्ता पटवर्धन
 • स्वर : ह्रषिकेश रानडे आणि वैशाली सामंत
 • वाद्यवृंद रचना : देव चौहान
 • साउंड रेकोर्डींग : अजय आर्या
 • प्रकाशन संस्था : मानबिंदू म्युझिक

संकल्पना

"ये प्रिये.. गाणी त्या दोघांची" या अल्बमद्वारे मराठी संगीतरसिकांना एक वेगळी चव चाखायला मिळणार आहे आणि ती म्हणजे मराठी गीतांवर चढवलेल्या बंगाली स्वरसाजाची! या अल्बमद्वारे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध संगीतकार पानु रे आणि त्यांचे सुपूत्र सुरोजीत रे या दोन बंगाली संगीतकारांनी मराठीत पदार्पण केलयं. वयाच्या साठीच्या जवळपास असलेल्या पानु रे यांनी त्यांच्या तरूणपणी बॉम्बे टीव्ही मध्ये काम केलय.अनुप जलोटा, सुशमा श्रेष्टा, दिलराज कौर, सुधा मल्होत्रा, आलोक गांगुली, श्यामा चित्तर यासारखे यावेळचे सुप्रासिद्ध गायक कलाकार त्यांचे सहकारी होते. या पूर्वी गेल्या वर्षी प्रदर्शीत दोघांचा "जीबोनेर शुरे शाधा" म्हणजेच Decorated with music of life" हा बंगाली भाषेतील प्रेमगीतांचा अल्बम खूप गाजला होता.काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या "शिरडी मे चारो धाम" या हिंदी भक्तीगीतांच्या अल्बमलाही त्यांनी संगीत दिले आहे.

"ये प्रिये.. गाणी त्या दोघांची" या अल्बममध्ये ९ गाणी असून काही गाणी मॉर्डन तर काही गाणी सेमी क्लासिकल ढंगानी जाणारी आहेत! हृषिकेश आणि वैशाली यांनी गाणी उत्तम गायली असून त्यांचा आवाज Duet गाण्यासाठी एकमेकांना खूप साजेसा वाटतो. एकीकडे "चढलेली ही नशा" हे गीत तरूणाईला आकर्षित करणारं आहे तर दुसरीकडे "दिसे चांद सोवळा" किंवा "पाकळया रुसल्या" ही खास बंगाली बैठकीची सेमी-क्लासिकल गीत खास कानसेनांसाठी आहेत ! या अल्बमचं शीर्षक गीत "ये प्रिये" हे विरहगीत असून ते ऐकताना ए.आर रेहमानच्या "तू ही रे"ची आठवण आल्याशिवाय रहात नाही..

..चालीवर गीत लिहणं हे मुळातच अवघड काम पण गीतकार "प्राजक्ता पटवर्धन" हीने हे शिवधनुष्य लीलया पेललय! गंध हलके हलके या अल्बमच्या यशानंतर "प्राजक्ता पटवर्धन" हे नाव एक उत्तम गीतकार म्हणून नावारूपास येऊ लागलं आहे. उत्तम भाषासौंदर्य तिच्याकडे आहेच, पण स्वत: उत्तम गायिका असल्याने शब्दाचे योग्य वजन,लयबद्धता आणि तालाची जाण यांनी तिचं गीतलेखन अधिक समृद्ध झालं आहे! या अल्बममधली नऊच्या नऊ गाणी तिने चालींवर लिहली असून ही गाणी लिहीताना या ज्ञानाचा खूप फायदा झाल्याचं प्राजक्ता आवर्जून सांगते. म्हणूनच मुळ बंगाली संगीताला मराठी साज चढवण्यात आणि पर्यायाने अल्बम रसिकांपर्यंत पोहोचवण्यात तिचं योगदान खूप महत्वाचं आहे!

जाता जाता अगदी नेमक्या शब्दात सांगायचं झाल्यास, आजच्या कर्णकर्कश्श संगीतात रात्री झोपण्याअगोदर दिवे मालवून शांतपणे ऐकण्यासाठी नवीन मराठी गीतांची CD बरेच दिवस उपलब्ध नव्हती. ती जर तुम्हाला हवी असेल तर "ये प्रिये.. गाणी त्या दोघांची" खास तुमच्यासाठीच आहे!

Download Noraml quality MP3 tracks

या अल्बममधील सगळ्या नऊ गाण्यांचे Normal Quality Tracks (128KBPS ) सवलतीच्य किमतीत येथून डाऊनलोड करा.

Download High Quality MP3 tracks

या अल्बममधील सगळ्या नऊ गाण्यांचे High Quality Tracks (320KBPS ) सवलतीच्या किमतीत येथून डाऊनलोड करा.

Order A CD Online

भारतामध्ये कुठेही या अल्बमची CD तुम्ही कुरीयरद्वारे घरपोच मागवू शकता!

Rs 99/-

Order A CD - COD (Pay Cash on Delivery)

महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅश ऑन डिल्हिवरीसाठी पद्धतीने CD घरपोच मिळवण्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता SMS करा ०९९६०२८१०५५ या क्रमांकावर! किंमत रु १३०/- .

निवडक गाणी खरेदी करा!

 
ये प्रिये या अल्बममध्ये असलेल्या एकूण ९ गाण्यांपैकी काही निवडक गाणी खास मानबिंदूच्या रसिकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत!

 
  Shopping cart
सध्या तुम्ही एकही गाणं निवडलेलं नाही. नवीन मराठी गाणी खरेदी करून  मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या!

चढलेली ही नशा (159 Plays)
गायन : वैशाली सामंत, ह्रषिकेश रानडे | गीतकार : प्राजक्ता पटवर्धन
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.59 out of 34 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

ये प्रिये (154 Plays)
गायन : ह्रषिकेश रानडे | गीतकार : प्राजक्ता पटवर्धन
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.65 out of 48 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

पाकळ्या रुसल्या (76 Plays)
गायन : ह्रषिकेश रानडे | गीतकार : प्राजक्ता पटवर्धन
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.7 out of 20 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

दिसे चांद सोवळा (93 Plays)
गायन : ह्रषिकेश रानडे | गीतकार : प्राजक्ता पटवर्धन
तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? ता-यांवर क्लिक करून तुमचं मत कळवा!   (Average rating 4.81 out of 21 votes)
खरेदी करा >> Quality :
 (320 KBPS)   Rs 18 or $0.9
Set as your Caller Tune

या अल्बमचं सरासरी मानांकन :   (4.67 with 123 votes in 482 plays)

Download FREE karaoke (Music) MP3 tracks

प्रत्येकामध्ये कुठेतरी एक गायक/गायिका दडलेली असते असं आम्हाला नेहमी वाटत आलय! पण प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ करण्यासाठी वादक कलाकार असणं जवळपास अशक्य आहे. म्हणूनच मानबिंदू म्युझिक तर्फे या अल्बममधील सगळ्या गाण्यांचे Karoake(music) tracks आम्ही इथे Free Downloading साठी उपलब्ध करून देत आहोत; जेणेकरून तुम्हाला या अल्बममधील तुमची आवडती गाणी कुठेही सहज गाता यावीत आणि ती सुद्धा Original म्युझिकसह! ( ७ गाण्यांचे Karoake ट्रॅक्स CD मध्येही समाविष्ट आहेत!) 

चढलेली ही नशा (86 downloads)
ये प्रिये (91 downloads)
पाकळ्या रुसल्या (55 downloads)
दिसे चांद सोवळा (46 downloads)

वेबवर अन्यत्र उपलब्ध

मानबिंदू म्युझिक तर्फे हा अल्बम वेबवर अन्यत्र खालील ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे!"मानबिंदू म्युझिक शॉपी"च्या सहाय्याने २०० हून अधिक मराठी ब्लॉग्स/वेबसाईट्स वर!

मानबिंदू म्युझिकतर्फे हा अल्बम मुंबई, पुणे येथे खालील दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

 • महाराष्ट्र वॉच कंपनी, नक्षत्र मॉल, दादर(प- 022 - 24223011
 • इस्टर्न रेडीओ, महात्मा गांधी मार्ग, विलेपार्ले (पू) - (022) 26142366
 • साईनाथ म्युझिक, b/59, गोयल शॉपिंग सेंटर बोरीवली(प)
 • चोगले इलेक्ट्रॉनिक, बाभई नाका, बोरीवली (प)
 • न्यू सिंफनी, शॉंप नं ५, रौनक आर्केड, आईस फॅक्टरी जवळ, गोखले रोड, ठाणे (प) : (022) 25386978
 • जय गणेश म्युझिक सेंटर, तलावपाळी समोर, गॅलेरीया बिल्डींग, मूज रोड, ठाणे (प) : Phone : (022) 25333145 , 25412092
 • ऑडीयो मास्टर, ७ सुदर्शन चित्तरंजन दास रोड, राम नगर, डोंबिवली (ई) Phone : (0251) 2861407
 • राहुल इंटर्प्राईजेस, शिवाजी पुतळ्याजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली (पू) Phone : (0251) 2861599
 • पंकज टेलिव्हिडियोसेंटर, २५१, नारायणपेठ, लक्ष्मी रोड, पुणे. Phone : (020) 24454338 , 24450338
 • म्युझिक लवर्स, S.P. कॉलेज जवळ, पुणे.

नवीन मराठी संगीताच्या अपडेट्ससाठी आमच्याशी संपर्कात रहा फेसबुकवर!

अभिप्राय लिहा

मानबिंदूवर उपलब्ध असणारे अन्य अल्बम्स