Spandan:Marathi music album|Download MP3 songs:Maanbindu.com
गायन
साधना सरगम, स्वप्नील
बांदोडकर, रविंद्र बिजूर
संगीतकार
केदार मुळे, विभास
हिर्लेकर
गीतकार
लीना कुलकर्णी, सुधीर बापट, विकास फडके
वादन
मनिष कुलकर्णी, विजय तांबे,
संदीप मयेकर, अजित वैद्य
संगीत संयोजन विनय राजवाडे
"स्पंदन-
Many moods of Romance"
हा केदार-विभास जोडीचा पहिलाच अल्बम! सुंदर गीतांना अनुरूप
चाली देण्याची आणि ती मित्र-मंडळींच्या मैफीलीत किंवा
छोट्या-मोठ्या समारंभात सादर करण्याची या दोघांनाही आवड.
यातूनच काही सुरेख चालींचा जन्म झाला. सहज गुणगुणाव्याश्या
वाटणा-या या चालींचं सगळ्यांकडूनच कौतुक व्हायला लागलं
आणि मग केदार-विभासला ध्यास लागले ते
स्वत: संगीतबद्ध केलेल्या गीतांचा स्वतंत्र अल्बम काढण्याचे!
प्रथमत: हे स्वप्न साकार होणार की
नाही या विषयी त्यांच्या मनात थोडीशी शंका होती. त्यासाठी तयार झालेल्या चाली त्यांनी जाणकारांना ऐकवल्या.
जाणकारांनीही जेंव्हा
त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तेंव्हा त्यांचा आत्मविश्वास
वाढला आणि हा अल्बम
करण्याच्या निर्णयावर त्यांनी शिक्कामोर्तब केले.
साधना सरगम अजूनही धारा मृगाच्या
हे गीत गाताना
हळुहळू त्यांच्या टीम मध्ये एक
एक मोहरा सामील व्ह्यायला लागला.
संगीत संयोजक विनय राजवाडे आले,
त्याबरोबरच इतर कसलेल्या वादकांची जुळवाजुळव झाली.
साधना सरगम, रविंद्र बिजूर
आणि स्वप्नील
बांदोडकर या सारख्या ख्यातनाम गायकांना त्यांनी आपल्या चाली
ऐकवल्या.
त्यांनाही त्या चाली खूप आवडल्या आणि आपण या अल्बमसाठी
गात असल्याची संमती दिली. बघता बघता या अल्बमचं रेकॉर्डींग झालं आणि "स्पंदन-
Many moods of Romance"
हा अतिशय सुंदर असा अल्बम तयार झाला!