संगीत हा आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा विषय...
आपल्या मनातल्या प्रत्येक भावनेला वाट करून देणारा ! मग ती
लहानपणीची नाच रे मोरा, सांग सांग भोलानाथ, मामाच्या गावला
जाऊया अशी बालगीतं गाणारी अल्लड निरागसता असू दे; तरूणपणीची
फ़ुलले रे क्षण माझे, मलमली तारुण्य माझे, का रे दुरावा अशी
प्रणयभावना व्यक्त करणारी प्रेयसीची आर्त साद
असू दे किंवा
आयुष्याच्या संध्याकाळचा एकटेपणा व्यक्त करणारी अताशा असे हे मला काय होते, जन पळभर म्हणतील हाय हाय असं गाणारी
खिन्नता असू दे; जीवनातल्या अनेक सुखदु:खाच्या भावना
तितक्याच परिणामकारक पद्धतीने केवळ सात स्वरातून व्यक्त
करणारं विश्व म्हणजेच संगीत!
संगीताला सुवर्णकाळ देणारी आणि याहूनही अधिक उंचीवर नेऊन
ठेवणारी लतादीदी, आशाताई, पं भिमसेन जोशी, पं जितेंद्र
अभिषेकी, श्री सुधीर फडके अशी रत्न आपल्याला मिळाली हे ही
आपलं भाग्यच!आजच्या काळातही हा वारसा बेला शेंडे, सावनी शेंडे,
स्वप्निलबांदोडकर, राहूल देशपांडे यांसारख्या सुरेल
गायकांनी आणि अजय-अतुल, सलील कुलकर्णी, कौशल इनामदार ह्या
सारख्या संगीत दिग्दर्शकांनी यथार्थपणे चालू ठेवलाय.मानबिंदूवर ह्या अनोख्या संगीत विश्वाची तुम्हाला एक सफ़र घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे! त्यामुळे जुन्या, नवीन गाण्यांचे
व्हिडीयोस, अन्य संकेस्थळांवरील डाऊनलोडींगच्या लिंक्स आणि त्या बरोबर नवीन येणा-या
मराठी अल्बम्सची माहिती ह्या सगळ्या गोष्टींचं संकलन आम्ही केलय खास तुमच्यासाठी!
चला तर मग मारू या एक फेरफटका...
अन्य मराठी अल्बम्स
हळवेपण  
मानवी भावभावनांचा कॅलिडोस्कोप असणारा एक
सुंदर मराठी अल्बम. संदीप खरेंच्या हस्ते या अल्बमचं प्रकाशन झालं.
पहिले वहिले प्रेम  
गर्लफ़्रेंडने बॉयफ़्रेंडला (किंवा बॉयफ़्रेंडने
गर्लफ़्रेंडला) गिफ़्ट द्यावा असा एक Sweet
Sweet, गुलाबी गुलाबी, Romantic अल्बम
आता उजाडेल  
सुरेश वाडकर, वैशाली माडे, मंदार आपटे
आणि श्रीरंग भावे यांनी गायलेला
नवीन
अल्बम
गंध हलके हलके
बेला शेंडे, वैशाली सामंत, मधुरा दातार, संगीता
चितळे, अमृता काळे,पौलमी पेठे यांनी गायलेला आणि
अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेला एक फ़्रेश
अल्बम
संगीत मनमोही रे
श्रीधर फडके यांनी
संगीतबद्ध केलेला आणि
आरती
अंकलेकर,
स्वप्नील बांदोडकर,
अवधूत
गुप्ते, अमृता सुभाष, वैशाली माडे,
रिचा शर्मा आणि सुदेश भोसले
यांनी गायलेला अल्बम
मस्त शारदीय रात
श्रेया घोषाल
आणि सुरेश वाडकर
यांनी
गायलेला मराठी अल्बम
तुझा चेहरा
झी सारेगमप महागायिका
संगीता चितळे
यांचा अल्बम
गर्द निळा गगनझुला
कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेला
अवीट गोडीचा अल्बम
कृष्णबावरी राधा
साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी
गायलेला कृष्णगीतांचा अल्बम
सारे तुझ्यात आहे
देवकी
पंडीत, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत यांनी गायलेला
अल्बम
१ सप्टेंबर २०११ पासून आत्तापर्यंत मानबिंदूवरील गाणी 12357 वेळा ऐकली गेली आणि
2646 वेळा रेटींग्स दिली गेली. तुम्ही मानबिंदूवरच्या गाण्यांना रेटींग्स दिलीत का? कारण तुमचे रेटींग्सच ठरवणार आहेत मानबिंदू टॉप १०!!