Advertisement
गायक म्हणून अशी यशस्वी वाटचाल सुरू असताना दुस-या बाजूस अभिजीतमधला संगीतकार अनाहूतपणे आकार घ्यायला लागला होता. एके दिवशी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या 'राधा' या काव्यसंग्रहातील काही कवितांना त्याने सहज चाली लावल्या आणि त्या पाडगावकरांना ऐकवल्या. पाडगावकरांना त्या चाली खूप आवडल्या आणि त्यातूनच संगीतकार अभिजीतचा 'सोनसांजरी धून' हा पहिला अल्बम २००४ साली प्रकाशीत झाला. त्यानंतर २००६ साली मस्त शारदीय रात (गायक सुरेश वाडकर, सुचित्रा भागवत आणि श्रेया घोषाल) हा अल्बम आणि २००७ साली शांता शेळके, ना. धो, महानोर यांच्या कवितांवर आधारीत 'झुला' हा अल्बम (गायक संगीता चितळे, सुचित्रा भागवत, वृषाली पाटील, अभिजीत राणे आणि स्वप्नील बांदोडकर) प्रकाशित झाला.
२००८ हे साल अभिजीतसाठी विशेष ठरले. या साली अभिजीतचे तीन अल्बम प्रसिद्ध झाले. त्यात स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत आणि देवकी पंडीत यांच्या स्वरांनी सजलेला सारे तुझ्यात आहे साधना सरगम, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकरने गायलेला कृष्णबावरी राधा हा अल्बम आणि अगदी अलिकडेच प्रसिद्ध झालेला झी सारेगमपच्या विजेत्या संगीता चितळे यांच्या तुझा चेहरा या अल्बम्सचा समावेश आहे!
नुकताच अभिजीतचा गंध हलके हलके हा अल्बम रिलीज झालाय!
अनेक मोठ्या नामवंत गायकांनी अभिजीतच्या चालींना आपल्या स्वरांची साथ दिली आहे. त्यात श्रेया घोषाल , देवकी पंडीत, सुरेश वाडकर, साधना सरगम, वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार आणि स्वप्नील बांदोडकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो.
Video
Audio
गीत: सारे तुझ्यात आहे [ अल्बम: सारे तुझ्यात आहे ]
गीत: ऒला वारा [ अल्बम: सारे तुझ्यात आहे ]