Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists : Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Earn from Marathi Blogs,website,facebook Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 
तुमचं नाव इथे?
 
 
 
 
 
 
 

Advertisement

 
 
 
 
 
 
 
 
Swaradheesh: Bharat balavalli (http://bharat.maanbindu.com)
  SocialTwist Tell-a-Friend  

भरत बलवल्ली [ स्वराधीश या पदवीने सन्मानित गायक ]
Bharat Balvalli
: http://bharat.maanbindu.com

भरत बलवल्ली लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं व्यक्तिमत्व! पंडीत यशवंतबुवा जोशी आणि पंडीत  उल्हास कशाळकर अशा दिग्गजांकडून भरतने  शास्त्रीय गायनाचे प्राथमिक  धडे गिरवले आहेत. पंडीत तुळशीदास बोरकर यांच्याकडून त्याने हार्मोनियम वादनाचेही प्रशिक्षण घेतले आहे.

 वयाच्या फक्त १९ व्या वर्षी स्वराधीश ही पदवी जगदगुरू श्री शंकराचार्य करवीर विद्यापीठ आणि सूरमणी ही पदवी सुरसिंगार संसद या नावाजलेल्या संस्थांतर्फ़े त्याला मिळली आहे!

Abhijeet

प्रेक्षकांची पकड घेणारा आणि तीनही सप्तकात लीलया फिरणारा आवाज; विलंबीत, मध्य आणि द्रुत अशा सर्व लयीत त्यांच्या आवाजातून व्यक्त होणा-या भावना ही सर्व भरतची बलस्थानं आहेत. सध्या फक्त २२ वर्ष वय असलेल्या भरतने आतापर्यंत देश विदेशात सुमारे १५० हून अधिक मैफीली सादर केल्या असून लंडन मधल्या लेसिस्टर आणि कॉलीनडेल, स्वितझर्लंडमधल्या झ्युरीक, बाझल या परदेशातल्या मैफीली आणि स्वरांकीत मल्हार महोत्सव, दिनानाथ मंगेशकर स्मृती समारोह, पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव, पं मल्लिकार्जून मन्सूर स्मृती समारोह, पं बसवराज राजगुरू स्मृती समारोह, सानरसखा संगीत महोत्सव या भारतातल्या मैफीलींचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. या व्यतिरीक्त देणे मंगेशाचे हा पं. दीनानाथ मंगेशकरांच्या गीतांवर आधारीत कार्यक्रम आणि भक्तीरस हा अभंग, भजने, निर्गुणी भजने, दोहे इत्यादींचा समावेश असलेला हे ही कार्यक्रम भरत सादर करतो.

सर्व दिग्गजांनी मान्य केल्याप्रमाणे मा. दीनानाथ मंगेशकर ज्यापद्धतीने शास्रीय संगीत गायचे ती गायकी विलक्षण अवघड अशी गायकी आहे. भरतने या गायकीवर केवळ संशोधनच केलं नाही तर त्या गायकीचं शिवधनुष्य यथार्थपणे देणे मंगेशाचे या कार्यक्रमात पेलूनही दाखवलंय! याबद्दल खुद्द लतादीदी, आशाताई,  मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, ह्रद्ययनाथ मंगेशकर या मंगेशकर कुटंबातल्या पाचही भावंडानी याबद्दल त्यांचं खूप कौतुक केलंय आणि त्याचे विशेष आभारही मानले आहेत! या व्यतिरीक्त भरतला आतापर्यंत मिळालेल्या मानसन्मानांमध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे.

 • पंडीत विष्णू दिगंबर शास्त्री पुरस्कार
 • स्वर संस्कार, वाद्यसंगीतामध्ये पहिला क्रमांक आणि कै. विश्वनाथ पेंढारकर पुरस्कार
 • स्वरसाधना समिती लाईट क्लासिकल व्होकल्समध्ये प्रथम पारीतोषिक
 • महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन स्पर्धेत प्रथम पारितोषिक
 • कवी वसंत बापट गीत गौरव पुरस्कार
 • आझमाईश- रोटरी क्लब मुंबई तर्फ़े वाद्यसंगीत आणि लाईट क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार
 • ब्लू रिबन मूव्हमेन्ट, नॅशनल लेव्हल स्पर्धेत वाद्यसंगीत आणि हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार
 • कल्पकला सांस्कृतिक मंच, लाईट क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार (१९९७,९८,९९)
 • किरण - केसी कॉलेज फ़ेस्टीव्हल मध्ये लाईट क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार
 • मूड इंडीगो - आय.आय.टी तर्फ़े सादर केल्या जाणा-या फ़ेस्टीव्हल मध्ये हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार सतत दोन वर्ष
 • SNDT युनिव्हर्सिटी युथ फ़ेस्टीव्हल,  क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार
 • क्षितीज - रुपारेल कॉलेज  तर्फ़े सादर  केल्या जाणा-या फ़ेस्टीव्हल मध्ये लाईट क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार
 • मल्हार - सेंट झेवियर्स कॉलेज तर्फ़े सादर  केल्या जाणा-या फ़ेस्टीव्हल मध्ये लाईट क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार
 • फॅंटेसीज - SIES कॉलेज तर्फ़े सादर  केल्या जाणा-या फ़ेस्टीव्हल मध्ये लाईट क्लासिकल व्होकल्स मध्ये पहिला पुरस्कार

काही मान्यवरांनी भरतबद्दल दिलेल्या प्रतिक्रीया ..

श्री. श्रीनिवास खळे

पं. यशवंत देव

पं. उल्हास कशाळकर

Bharat Balvalli "भरत बलवल्ली सारख्या एखाद्या विशिष्ट गायकाने आजच्या काळात मराठी अभिजात नाट्यसंगीत शिकण्याचा छंद जोपासावा आणि मास्टर दीनानाथ यांच्या तेज:पुंज आणि लयदार गायकीचा अभ्यास करून ती गायकी समर्थपणे रसिकांसमोर सादर करावी हे खरोखरच अतिसाहस असणा-या कलावंताचे काम आहे.

संन्यस्त खड्ग आणि मानापमान या नाटकातील भरत बलवल्ली यांनी गायलेली पदे मी ऐकली आणि अक्षरश: मंत्रमुग्ध झालो. चि. भरतच्या या उपक्रमाचे मी कौतुक करतो कारण त्याला लाभलेला गळा ही परमेश्वराचीच देणगी आहे."

देणे मंगेशाचे हा कार्यक्रम आणि एकंदरीतच  अत्यंत अवघड अशी मा. दीनानाथ मंगेशकरांची गायकी सादर करण्याकडे तू कसं काय वळलास असं विचारल्यावर भरत म्हणतो,  "मी शास्त्रीय संगीत शिकत होतो आणि शास्त्रीय संगीताच्या मैफ़ीलीही सादर करायचो(.. अर्थात आताही करतो!). पण त्यावेळेस मा. दीनानाथ मंगेशकराच्या गायकीबद्दल खूप ऐकलं  होतं. याशिवाय ही गायकी खूप अवघड असून ब-याच गायकांनी प्रयत्न करूनही ती जमली नाही हे ही कानावर पडलं होतं. मला त्यावेळी असं वाटायचं की मा. दीनानाथ मंगेशकर हे कितीही मोठे गायक असले तरीही शेवटी एक माणूसच होते ना, मग त्यांना जे जमतं ते इतरांना का जमू नये? पण मी त्यांच गाणं मात्र  प्रत्यक्षात ऐकलं नव्हतं त्यामुळे यावर काही बोलण्याचा माझा अधिकारच नव्हता अन म्हणून मी काहीच बोलायचो नाही.. एके दिवशी वाटलं आपणही ऐकूया आणि प्रयत्नही करून पाहूया गायचा! या विचाराने त्यांचं पहिलं गाणं मी ऐकलं आणि कानावर विश्वास बसेना,अगदी थक्क झालो!  अगदी यंत्रवत गळा होता, कुठूनही कुठेही कसाही फिरायचा. वेड लावणारी अशक्य गायकी होती. त्या क्षणीच मलाही इतरांच आत्तपर्यंतचं म्हणणं पटू लागलं पण दुसर-याच क्षणी मी हे आव्हान स्विकारायचं ठरवलं. पुढचे एक वर्ष मी इतर काही न ऐकता फक्त त्यांचीच गायकी ऐकत राहीलो. सगळी गाणी हजारो वेळा ऐकली. तसं गाण्यामागे त्यांचा काय विचार असेल याचा विचार केला आणि रियाझाने एक एक पाऊल पुढे टाकत गेलो. कालांतराने मला स्वत:ला आत्मविश्वास आल्यावर त्यांच्या गाण्याची एक मैफ़ील सादर केली. या मैफीलीचे नंतर सी.डी. मध्ये रुपांतरण करण्यात आले, ती सी.डी. ऐकल्यावर लतादीदीने सांगितलं, 'बाबांचं गाणं इतक्या ताकदीने पेलताना मी आजतागायत कुणालाही पाहिलं नव्हतं! आमच्या बाबांचा वारसा इतक्या समर्थपणे चालवणारं आजच्या पिढीतही कुणी आहे, हे पाहून खरचं खूप आनंद होतोय. तुझे खूप आभार...'  माझ्यासाठी तो खूप मोठा दिवस होता! या सीडीची प्रस्तावना देखील मंगेशकर कुटूंबियांनीच लिहिली आहे."
 
Share
देणे मंगेशाचया कार्यक्रमात भरतने गायलेले 'झाले युवती मना' हे थक्क करणारं नाट्यपद आणि 'सुहास्य तुझे मनास मोही' या दोन्ही नाट्यपदांचे व्हिडीयोस खास मानबिंदूच्या रसिकांसाठी इथे देत आहोत. या व्यतिरीक्त राग पट बिहाग आणि राग शाहना कानडा हे अनवट रागही भरतने गायले आहेत, त्याचे ही सादरीकरण तुम्ही ऐकू शकता.
 
Video

गीत: झाले युवती मना

गीत: सुहास्य तुझे मनास मोही

Audio

राग पट बिहाग

 
(वेळ ३० मिनीटे २९ सेकंद)

राग शाहना कानडा


(वेळ ३७ मिनीटे ३८ सेकंद)

 

 
संगीत चित्रपट आम्ही शिल्पकार उद्याचे अन्य संपर्कात रहा
 
     
DID YOU KNOW?  
 
No Content can be re-produced on any other website without prior permission |  Protected by Copyscape Online Copyright Checker