
फाऊंटन म्युझिक कंपनीतर्फे रिलीज झालेल्या या अल्बमच्या
आठवणींबद्दल गीतकार आणि निर्मात्या वृंदा
भांबुरे यांच्याशी गप्पा
मारत असताना त्या म्हणतात, "माझ्या
वडिलांच्या मराठी साहित्याच्या अभ्यासामुळे मला खरं तर
कवितांची गोडी लागली. तसंच माझ्या आईने गायलेली सुरेल भजने
आणि कृष्णगीते ऐकून राधाकृष्णाच्या प्रेमगीतांची निर्मीती
करण्याची प्रेरणा मला झाली. थोडं विषयांतर करून सांगते;
साधारणत: १९७० साली शाळेमध्ये झालेल्या स्नेहसंमेलनात मी
राधा-कृष्ण या विषयावर एक गीत लिहून नृत्य बसवले होते.
त्यावेळी तिथे ज्येष्ठ कवी कै. ग. दि. माडगूळकर ही हजर होते.
त्यांना माझी ती कविता इतकी आवडली की त्यांनी माझ्याकडून
ती कविता लिहिलेली वही घेतली आणि त्यावर स्वत:ची सही देखील
केली. त्यांचाकडून मिळालेल्या प्रशंसा आणि आशीर्वादामुळे
माझ्यातल्या सुप्त कवयित्रीला प्रेरणा मिळाली. त्यातूनच
पुढे विविध विषयांवर काव्यनिर्मिती माझ्याकडून होत
गेली.अभिजीतनेही शब्दातील आशयाचे सौंदर्य ऒळखून त्यानुसार
सुरेख चालींची रचना केली म्हणूनच हा सुंदर अल्बम रुपास येऊ
शकला!" |