Advertisement

 

Advertisement

Marathi music Album|Marathi MP3 songs online|Marathi movie songs|Download ringtones
 
 
Share
संगीत हा आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा विषय... आपल्या मनातल्या प्रत्येक भावनेला वाट करून देणारा ! मग ती लहानपणीची नाच रे मोरा, सांग सांग भोलानाथ, मामाच्या गावला जाऊया अशी बालगीतं गाणारी अल्लड निरागसता असू दे; तरूणपणीची फ़ुलले रे क्षण माझे, मलमली तारुण्य माझे, का रे दुरावा अशी प्रणयभावना व्यक्त करणारी प्रेयसीची आर्त साद असू दे किंवा आयुष्याच्या संध्याकाळचा एकटेपणा व्यक्त करणारी अताशा असे हे मला काय होते, जन पळभर म्हणतील हाय हाय  असं गाणारी खिन्नता असू दे; जीवनातल्या अनेक सुखदु:खाच्या भावना तितक्याच परिणामकारक पद्धतीने केवळ सात स्वरातून व्यक्त करणारं विश्व म्हणजेच संगीत! संगीताला सुवर्णकाळ देणारी आणि याहूनही अधिक उंचीवर नेऊन ठेवणारी लतादीदी, आशाताई, पं भिमसेन जोशी, पं जितेंद्र अभिषेकी, श्री सुधीर फडके अशी रत्न आपल्याला मिळाली हे ही आपलं भाग्यच!

आजच्या काळातही हा वारसा बेला शेंडे, सावनी शेंडे, स्वप्निल बांदोडकर, राहूल देशपांडे यांसारख्या सुरेल गायकांनी आणि अजय-अतुल, सलील कुलकर्णी, कौशल इनामदार ह्या सारख्या संगीत दिग्दर्शकांनी यथार्थपणे चालू ठेवलाय.

"अगदी फ़्रेश !"

मानबिंदूवर ह्या अनोख्या संगीत विश्वाची तुम्हाला एक सफ़र घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे! त्यामुळे जुन्या, नवीन गाण्यांचे व्हिडीयोस, अन्य संकेस्थळांवरील डाऊनलोडींगच्या लिंक्स आणि त्या बरोबर नवीन येणा-या मराठी अल्बम्सची माहिती ह्या सगळ्या गोष्टींचं संकलन आम्ही केलय खास तुमच्यासाठी! चला तर मग मारू या एक फेरफटका...


आता तुमच्या आवडीचे मराठी अल्बम्स खरेदी करा मानबिंदूवर खालील पर्यायांसह!

  • गंध हलके हलके
    बेला शेंडे, वैशाली सामंत, मधुरा दातार, संगीता चितळे, अमृता काळे,पौलमी पेठे यांनी गायलेला आणि अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेला एक फ़्रेश अल्बम
  • संगीत मनमोही रे 
    श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेला आणि आरती अंकलेकर, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, अमृता सुभाष, वैशाली माडे, रिचा शर्मा आणि सुदेश भोसले यांनी गायलेला अल्बम

  • तुझा चेहरा
    झी सारेगमप महागायिका संगीता चितळे यांचा अल्बम
  • कृष्णबावरी राधा
    साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेला कृष्णगीतांचा अल्बम

तुमच्या आवडीच्या गाण्यांच्या Youtube वरील व्हिडीयोस चे संकलन खास तुमच्यासाठी..
जुन्या नवीन मराठी गाण्यांच्या डाऊनलोडींगसाठीच्या लिंक्स cooltoad च्या सौजन्याने देत आहोत.

[ टीप: ही गाणी डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही cooltoad चे सदस्य असणे अनिवार्य आहे!  ] [ Warning ]

 
 

अभिप्राय लिहा । संपर्क  । अटी आणि शर्ती । मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप

Connect with us on :  Facebook | Orkut | Twitter | Youtube

@ Maanbindu All Rights Reserved ,2008. Site best viewed in Microsoft Internet Explorer
@ Copyright : No Content can be re-produced on any other website without prior permission  Protected by Copyscape Online Copyright Checker

 

Maanbindu home page Marathi Movies : About new marathi movies Marathi Artists :  About young & very talented marathi artits Marathi Natak/plays, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : About new marathi music albums / new movie songs Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Easy Online Marathi Typing Tool Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Contac us